शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

सुषमाबाईंचा ‘ललित’ मानवतावाद

By admin | Updated: June 16, 2015 03:55 IST

वाजपेयींच्या मंत्रिमंडळात असताना संयतपणे वागणाऱ्या, विरोधी पक्षाच्या नेतेपदावर असताना बेफाट बोलणाऱ्या आणि नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात

वाजपेयींच्या मंत्रिमंडळात असताना संयतपणे वागणाऱ्या, विरोधी पक्षाच्या नेतेपदावर असताना बेफाट बोलणाऱ्या आणि नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रखात्याच्या मंत्रीपदावर असताना खालच्या मानेने वावरणाऱ्या सुषमा स्वराज एकाएकी माध्यमांच्या ऐरणीवर आणि राजकारणाच्या प्रखर प्रकाशझोतात एका अतिशय संशयास्पद व्यवहारामुळे आलेल्या परवा दिसल्या. देशाला ७०० कोटी रुपयांनी गंडविणाऱ्या आणि कायद्यापासून स्वत:ची सुटका करण्यासाठी फरार होऊन इंग्लंडमध्ये वास्तव्याला असणाऱ्या ललित मोदी या ‘आयपीएल’च्या आयुक्ताला, त्याच्याजवळ रीतसर पासपोर्ट नसतानाही इंग्लंडहून पोर्तुगालला जायला सुषमा स्वराज यांनी मदत केली व तसे करताना आपले मंत्रालयच नव्हे तर स्वत:चे व्यक्तिगत संबंधही त्यांनी वापरले. आयपीएल हे तसेही क्रिकेटच्या जगतातले एक संशयास्पद गौडबंगाल आहे. त्यात वावरणाऱ्या या ललित मोदीवर ७०० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. तो या आयपीएलमध्ये असताना त्याच्यासोबतच्या खुर्चीवर क्रिकेटचे सामने हंसतखेळत पाहणाऱ्या सुषमाबाईंची छायाचित्रे देशाने दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यावर पाहिली आहेत. आपल्यावर आरोप होताच बऱ्याच काळापूर्वी कायद्याच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला हा ललित मोदी आता इंग्लंडमध्ये आहे. त्याच्या पत्नीचे पोर्तुगालमध्ये कॅन्सरचे आॅपरेशन व्हायचे आहे. त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या हमीपत्रावर सही करायला त्याला त्या देशात जायचे आहे आणि तशी सोय त्याच्याजवळ नियमित पासपोर्ट नसतानाही सुषमाबाईंनी त्याला करून दिली आहे. आताच्या माहितीनुसार पोर्तुगालमध्ये पत्नीच्या आॅपरेशनपूर्वी द्यावयाच्या हमीपत्रावर पतीची सही घेण्याची तरतूद पोर्तुगालच्या कायद्यातच नाही. तरीही ललित मोदीला ही सवलत देताना इंग्लडमधील ज्या वजनदार व्यक्तींचा सुषमाबाईंनी वापर केला त्याच व्यक्तीने सुषमाबाईंच्या पुतण्याला इंग्लंडच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठीही मदत केल्याचे आता उघड झाले आहे. तात्पर्य, सुषमा ‘ललित’ आयपीएल आणि पासपोर्टचा अनियमित व्यवहार असा हा एकूण प्रकार आहे. ‘ललित मोदीला मी केलेली मदत केवळ मानवतावादी भूमिकेतून केली असल्याचे’ सुषमाबाईंचे सांगणे आहे. मात्र त्यातून अनेक प्रश्न उद््भवले आहेत आणि ते विचारलेही जात आहेत. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी ललित मोदीच्या सोबतच्या खुर्चीवर सुषमाबाईंनी बसणे हा प्रश्न मानवतावादात बसणारा होता काय? त्याच्यावर ७०० कोटींच्या अपहाराचा आरोप असताना त्याला देशाच्या सर्वोच्च पातळीवरून मदत केवळ मानवतावादामुळे दिली जाऊ शकते काय? देशाच्या तुरुंगात असलेल्या शेकडो आरोपींच्या घरात कॅन्सरचे पेशंट््स आहेत. त्या साऱ्यांना केंद्र सरकार याच मानवतावादी भूमिकेतून असे सहाय्य करणार आहे काय? विदेशात दडलेला काळा पैसा देशात आणण्यासाठी नरेंद्र मोदी आकांताने ओरडत असताना दुसऱ्या मोदीचा हा अपहार सहकार्य करण्यासाठी योग्य ठरतो काय? सुषमाबाईंचे यजमान व कन्या हे दोघेही वकिलीच्या व्यवसायात असून ते या ललित मोदीच्या बचाव पक्षाचे काम करीत आहेत. त्या बचावाचा सुषमाबाईंच्या मानवतावादाशी असलेला संबंध कोणता? सरकार ‘मानवी’ भूमिकेतून दया दाखवणार असेल तर याहून कमी प्रतीचे व लहान श्रीमंतीचे अपराध करणाऱ्यांबाबत सुषमाबाई व त्यांचे सरकार असेच वागणार आहे काय? या प्रश्नाची उत्तरे त्यांच्याजवळ नाहीत आणि मानवतावाद या आता सवंग झालेल्या शब्दाखेरीज बचावाचा दुसरा कोणताही पवित्रा त्यांच्याजवळ नाही. ललित मोदी या संशयास्पद इसमाला भारतात परत येऊन आपला पासपोर्ट रीतसर करून घ्यायला सुषमाबाई सांगू शकल्या असत्या की नाही? देशात गुन्हे करून विदेशात आश्रय घेणाऱ्या दाऊदपासून सईदपर्यंतच्या गुन्हेगारांना आपण तशी आमंत्रणे देत आहोतच की नाही? की सुषमाबाईंचा मानवतावाद या ललित मोदीपुरताच मर्यादित व एकांगी आहे? सुषमा स्वराज या तशाही मुळातल्या संघ परिवाराशी संबंधित वा भाजपच्या कार्यकर्त्या नाहीत. जॉर्ज फर्नांडिसांच्या आग्रहावरून त्या जुन्या समाजवाद्यांमधून भाजपात आल्या आहेत. त्यांच्या आताच्या अडचणीत त्यांना पाठिंबा द्यायला पुढे झालेल्या समाजवादी पक्षाचे त्यांच्याशी असलेले हे कनेक्शन नीट लक्षात घ्यावे असेही आहेतच. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सुषमाबाईंना संरक्षण देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र तो असमर्थनीयच नव्हे तर दुबळाही आहे. देशातील किती गुन्हेगारांबाबत ही माणसे असे उदारपण दाखविणार आहेत? आणि देशाचा गृहमंत्रीच देशाला शेकडो कोटींनी गंडविणाऱ्याला दिलेल्या संशयास्पद मदतीचे समर्थन करीत असेल तर त्याच्याकडून कोणत्या कायद्याच्या अंमलबजावणीची अपेक्षा जनतेने करायची असते? सामान्य माणसांच्या मनातली सुषमाबाईंची प्रतिमा शालीनतेची व स्वच्छतेची आहे. पण त्या आयपीएलमधील अपराध्यांशी अशा जुळल्या असण्याची बातमी त्यांच्या या प्रतिमेला धक्का देणारी आहे व त्या प्रतिमेला गेलेला तडा कधीही भरून न निघणारा आहे.