शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईक

By admin | Updated: October 7, 2016 02:32 IST

चित्त एकाग्र करून लक्ष्यावर नेमका हल्ला करणे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. अलीकडे उदयाला आलेले हे एक आश्चर्यकारक तंत्र. पूर्वी आॅपरेशन करताना डॉक्टरांना बरीच कापाकापी करावी लागत असे

चित्त एकाग्र करून लक्ष्यावर नेमका हल्ला करणे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. अलीकडे उदयाला आलेले हे एक आश्चर्यकारक तंत्र. पूर्वी आॅपरेशन करताना डॉक्टरांना बरीच कापाकापी करावी लागत असे, रक्त खूप जाई, टाकेही खूप पडत. आता आवश्यक तेव्हढा भाग नेमका काढून लगेच मोकळे होता येते. आधुनिक वैद्यक व्यवसायातील हे तंत्र युद्धशास्त्रातही वापरले जाते हे या निमित्ताने सगळ्यांना समजले.अर्जुनाला पोपटाचा फक्त डोळा दिसावा, हा वैदिक काळातील सर्जिकल स्ट्राईकच्या शिकवणुकीचा पहिला पुरावा म्हणता येईल. स्वयंवराच्या वेळी पाण्यातील प्रतिबिंब पाहून वरील फिरत्या माशाचा डोळा फोडणे हे तर अधिक अवघड आॅपरेशन, पण तेही अर्जुनाने यशस्वी करून दाखवले. एकलव्याने तर दुसरी कोणतीही इजा होऊ न देता त्या कुत्र्याच्या तोंडात अशा खुबीने बाण मारले की त्याचा फक्त आवाजच बंद झाला होता ! माणसाच्या प्रतिभेची आणि कर्तृत्वाची सर्जिकल स्ट्राईकशी संबंधित अशी अनेक उदाहरणे दाखवून देता येतील. सर्जिकल स्ट्राईकचे अनेक फायदे असतात. समस्या नेमकी लक्षात घेऊन तिचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो, त्यावरील अचूक उपाय शोधून काढावा लागतो, त्या उपायाची बिनचूक अंमलबजावणी करावी लागते, जेवढी शक्ती खर्च करावी लागणार आहे तेवढीच खर्च करणे शक्य होते आणि समस्येच्या मुळावर घाव घालून ती कायमची नाहिशी करता येते.हे तंत्र माणसाला जसे समरांगणात वापरता येते तसेच दैनंदिन जीवनातही वापरता आले पाहिजे. एका अर्थी जीवनाची लढाई लढताना माणूस परिस्थिती नुसार वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करीत असतोच. कधी तो जिंकतो, कधी हरतो तर कधी त्याला तह करावा लागतो. पण जर त्याने जीवनातही जाणीवपूर्वक सर्जिकल स्ट्राईक तंत्राचा वापर करायचे ठरवले तर विजयश्री त्याच्या गळ्यात माळ घालणार ही अगदी काळ्या दगडावरची रेघ !साधू-संतांनी म्हटल्याप्रमाणे कामक्रोधादि षड्रिपू दैनंदिन जीवनात घडोघडी माणसासमोर उभे ठाकलेले असतात. त्यांना या तंत्राचा वापर करून माणूस कायमचे नेस्तनाबूत करू शकतो. मनातील भीती नाहिशी करणे, वैफल्य दूर करणे, असाध्य आजारांशी सामना करणे, आयएएसच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे किंवा आॅलिंपिकमधील मेडल मिळवणे यासारख्या, पुरुषार्थाला आव्हान देणाऱ्या कामी सर्जिकल स्ट्राईकसारखा मित्र सोबतीला घेणे यासारखी दुसरी स्ट्रॅटेजी असू शकत नाही. भारतीय लष्कराने या तंत्राचा वापर पितृपक्षात कुट्ट काळ्या रात्री करावा यासारखे, झापडबंद समाजाचे डोळे उघडणारे दुसरे उदाहरण सापडणार नाही.