शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

साखरपेरणी

By admin | Updated: June 11, 2015 00:24 IST

राज्यातील यंदाचा ऊसाचा गळित हंगाम ऐतिहासिक ठरला. तब्बल ९५० लाख टन ऊसाचे गाळप आणि १०० लाख टनाच्या वर साखरेचे विक्रमी उत्पादन झाले

विजय बाविस्कर -

राज्यातील यंदाचा ऊसाचा गळित हंगाम ऐतिहासिक ठरला. तब्बल ९५० लाख टन ऊसाचे गाळप आणि १०० लाख टनाच्या वर साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. एखाद्या उद्योगासाठी ही खरी तर गौरवाची गोष्ट. परंतु, यामुळे साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही अडचणीत आले आहेत. राज्यातील साखर पट्ट्यात अस्वस्थता आहे. साखरउद्योगावर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेससह या विषयावर आपले राजकारण साकारणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची तयारी केली आहे. परंतु, मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्याची कोणाची तयारी नाही. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या महिन्यात साखर परिषद झाली. माजी कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील झाडून सारे साखर कारखानदार उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली. त्याच्यापुढे जाऊन केंद्राने सहा हजार कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा कालच केलीे. यंदाच्या वर्षी त्यामुळे किमान आधारभूत किंमत देणे कारखान्यांना शक्य होईल. राज्यातील १००च्या वर कारखाने पुढील वर्षी आपला गाळप हंगामच सुरू करू शकणार नव्हते, त्यांच्यापुढील प्रश्नही सुटेल. परंतु, ही तात्पुरती मलमपट्टी झाली. काही साखर कारखाने कोणत्याही मदतीशिवाय एफआरपी देऊ शकले. त्यांना हे कसे साध्य झाले याचा विचार होणार आहे का? आर्थिक शिस्त व उपपदार्थ निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले, बाकीच्यांना ते का शक्य नाही? राज्यातील सहकारी साखर उद्योग शताब्दी साजरी करीत आहे. मात्र, अद्यापही उद्योग म्हणून तो उभा राहू शकलेला नाही. बाजारपेठेचे हेलकावे सहन करू शकत नाही. ऊसाचे उत्पादन जास्त झाले तरी प्रश्न आणि कमी आले तरी संकट ही परिस्थिती आहे. प्रत्येक वेळी शासनाच्या तिजोरीवर डोळा ठेवून पॅकेज मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या साखर कारखान्यांना उद्योग तरी म्हणायचे का? राज्यातील केवळ १६ टक्के शेती बागायती आहे. त्यातही १० टक्के शेतीतच ऊस उत्पादन होते. उर्वरीत ८४ टक्के शेतकरी मान्सूनच्या लहरीपणावर अवलंबून असतो. शरद पवार यांच्यासारखा शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणविणाऱ्यापासून ते सहकार उद्योगातील गैरप्रवृत्तींवर टीका करून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षापर्यंत कोणीही या शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, हेच दुर्दैव आहे. लोकसहभागाला सार्वजनिक तिलांजलीविकास योजनातील लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील पाणीयोजनांसाठीही १० टक्के लोकवर्गणीची अट आहे. अगदी छोट्या, आदिवासी भागांतील गावांमध्येही ग्रामसभा होतात. त्याच धर्तीवर शहरी भागातील विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद असतानाही नगरसेवकांकडून क्षेत्रसभा घेतल्या जात नाहीत. वर्षातून किमान चार सभा होणे गरजेचे असून त्यामध्ये भविष्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. पुण्यातील तब्बल १५१ नगरसेवकांनी गेल्या तीन वर्षांत एकही क्षेत्रसभा घेतली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार केवळ या एका कारणावरून त्यांचे पद रद्द होऊ शकते, हे ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात उघडकीस आणले. राज्यातील सर्वच महापालिकात थोड्या-अधिक फरकाने हीच स्थिती आहे. मात्र, एरवी साध्या प्रश्नांवरून सभागृहाचे आखाडे करणाऱ्या नगरसेवकांना याचे गम्य वाटत नाही. महापालिका असो, की विधानसभा किंवा देशाची संसद असो, पेन्शन, भत्त्यांसारख्या लाभ आणि स्वार्थ यासाठी पक्षभेद विसरून लोकप्रतिनिधींची एकजूट होते. मात्र, या विषयावर बोलायला कोणीही तयार नाही. वास्तविक महापालिका आयुक्तांच्या एका निर्णयाने या नगरसेवकांचे पद रद्द होऊ शकते. पण, ते देखील धाडस दाखवित नाहीत. कायदा केवळ सामान्य माणसासाठीच आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणारे दबावातून काम करतात, हेच यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.