शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

चाचा चौधरी की कहानी

By संदीप प्रधान | Updated: June 8, 2018 01:55 IST

चाचा चौधरी आपल्या घरी बसलेले असतात. त्यांची पत्नी बीनी ऊर्फ चाची लाकूड घेऊन रॉकेटच्या मागे लागलेली असते. रॉकेटने सकाळपासून चार हापूस आंब्यांचा फडशा पाडलेला असल्याने चाचीचे पित्त खवळलेले असते.

चाचा चौधरी आपल्या घरी बसलेले असतात. त्यांची पत्नी बीनी ऊर्फ चाची लाकूड घेऊन रॉकेटच्या मागे लागलेली असते. रॉकेटने सकाळपासून चार हापूस आंब्यांचा फडशा पाडलेला असल्याने चाचीचे पित्त खवळलेले असते. हा शाकाहारी कुत्रा पाळण्यापेक्षा कुठलाही मांसाहारी प्राणी पाळणे परवडले असते, अशी तिची बडबड सुरू असते. कोपऱ्यात बसलेला अवाढव्य देहयष्टीचा साबू समोर १०८ चपात्यांची चळत आणि १२ किलो हलवा घेऊन त्यावर ताव मारत बसलेला असतो. त्याला पाहताच चाचीचा चेहरा आणखी वेडावाकडा होतो.चाचा, मला कंटाळा आलाय या संसाराचा. हा रॉकेट आणि हा साबू यांची काही व्यवस्था लावा. यांच्याकरिता करून करून मी पार थकून गेलेय. त्यात तुम्ही नमोंच्या योजनांची माहिती गावभर करण्याकरिता पुस्तक छापायला परवानगी दिल्यापासून शालेय विद्यार्थी मला पाहताच हळूच कुजबुजतात आणि फिदी फिदी हसतात. परवा तर सोशल मीडियावर मला काहींनी ट्रोल केलं. तेवढ्यात दरवाजावरील बेल वाजते. चाची दरवाजा उघडते ना उघडते तोच रावसाहेब दानवे, विनोद तावडे वगैरे मंडळी घरात येऊन सोफ्यावर पटापट बसतात. पाठोपाठ अमित शहा रुमालाने घाम टिपत प्रवेश करतात. अचानक घरात झालेल्या या घुसखोरीमुळे चाची बावचळून जाते. रॉकेट भुंकू लागतो. चाचा लगबगीनं आपला लाल रंगाचा फेटा डोक्यावर ठेवतात. साबू मात्र हलव्यावर ताव मारण्यात गुंग असतो. घरचे झाले थोडे म्हणून घुसले बाहेरचे, अशी बडबड करीत चाची स्वयंपाकघराकडे वळते. लागलीच रावसाहेब दानवे चाचांना हस्तांदोलन करीत बोलतात... हॅलो मिस्टर चाचा चौधरी मिट अवर नॅशनल प्रेसिडेंट अमितभाई शहा. तावडे रावसाहेबांच्या कानात कुजबुजतात. चाचा जरी हिंदी भाषिक असले तरी पक्के मराठी आहेत. चाचा उसका क्या हैना. माधुरी दीक्षितजी के घरसे निकले तो हम लोगो को चाय की तल्लफ आयी. इतने मे कोई बोला की, चाचा इधरीच रहते है. तो हम आपके घर शिरे. चाचा जोरात बोलतात अगं शिरा टाक गं यांना. चाची बोलते... चाचा, रवा आणायला खाली उतरावे लागेल. पण तुम्ही मागच्या महिन्याचेच पैसे दिले नाहीत तर तो तुम्हाला काय जिन्नस देणार. जळणाची लाकडंही संपत आलीेत. चाचीचे शब्द ऐकून सारेच गोरेमोरे झाले. ते रोजचच आहे. पण तुम्ही आले होते कशासाठी? चाचा पुसतात. आमचं लोकसंपर्क अभियान सुरू झालंय त्याकरिता आलो. तेवढ्यात चाची बाहेर येते. या निमित्तानं का होईना तुम्हाला लोकांची आठवण झाली. पेट्रोलचे भाव वाढल्यानं गेली कित्येक दिवसात यांनी मला स्कुटरवरून फिरवून आणलेली नाही. जीएसटी लागू झाल्यापासून आम्ही हॉटेलचे तोंड बघितलेलं नाही.नोटाबंदीनंतर यांनी मला नवीन कपडालत्ता केलेला नाही आणि १५ लाख खात्यात जमा न केल्यानं माझी सारी स्वप्नं चक्काचूर झाल्येत. चाची डोळ्याला पदर लावते. घरात बांधलेल्या शौचालयाला सहा महिने पाणी नाही आणि उज्ज्वला योजनेत नावं नोंदवून गॅस घरी आलेला नाही. चाचीची टकळी सुरू असताना चाचाने हळूच साºयांना घराबाहेर काढले. आता थेट ‘मातोश्री’वरच जा, असे म्हणत डोळा घातला.- संदीप प्रधान(तिरकस)

टॅग्स :Politicsराजकारण