शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

छावण्यांसाठी राजकीय स्पर्धा

By admin | Updated: April 9, 2016 01:14 IST

जनावरांच्या छावण्या मंजूर करण्यासाठी नगर जिल्ह्यात राजकीय स्पर्धा सुरु झाली आहे. छावण्या मंजूर करा अन्यथा गावोगावी मोर्चे काढू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

जनावरांच्या छावण्या मंजूर करण्यासाठी नगर जिल्ह्यात राजकीय स्पर्धा सुरु झाली आहे. छावण्या मंजूर करा अन्यथा गावोगावी मोर्चे काढू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. गत आठवड्यात अनेक तालुक्यांत असे मोर्चे निघाले देखील. दोन्ही कॉंग्रेसचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते. छावण्यांचे श्रेय शिवसेनेला मिळायला नको म्हणून पालकमंत्री प्रा. राम शिंदे व भाजपाच्या जिल्ह्यातील आमदारांनी घाईघाईने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रालयात भेटून छावण्या मंजूर करण्याचा आदेश काढायला लावला. मंत्रालयाने काढलेला हा आदेश मोठा मजेशीर आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यात खात्री करुन आवश्यकता असेल तेथे छावण्या सुरु कराव्यात, असे हा आदेश सांगतो. विभागीय आयुक्तांनी त्यांना मिळालेले हे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केले आहेत. ‘जिल्ह्यात दिलेल्या भेटींच्या वेळी चारा उपलब्धता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे चारा उपलब्ध आहे त्यांची जनावरे छावणीत येणार नाहीत, याची खात्री करुन छावण्या सुरु करा’, असा आदेश त्यांनी काढला आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याची गवताची गंजी तपासायची का, असा पेच जिल्हाधिकाऱ्यांसमोर आहे. छावण्यांची खरोखरच गरज आहे का, हाच कळीचा मुद्दा आहे. जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत चारा पुरेल, असा अहवाल यापूर्वी पशुसंवर्धन विभागाने दिला होता. हा अहवाल पाहून लोकप्रतिनिधींचे पित्त खवळले. हा अहवाल चुकीचा असल्याची चौफेर टीका झाली. त्यामुळे महसूल व पशुसंवर्धन विभागाने पुन्हा तपासणी केली. या सुधारित अहवालातही एप्रिलमध्ये बहुतांश ठिकाणी चाऱ्याची उपलब्धता दिसली. त्यामुळे प्रशासन छावण्या सुरु करण्यासच तयार नव्हते. मात्र, दिवसेंदिवस राजकीय दबाव वाढतो आहे. एरव्ही आम्ही तालुक्याचे कसे नंदनवन केले याचे दाखले देणारे नेते आता आमचा तालुका सर्वाधिक उजाड कसा आहे, हे सांगण्यासाठी आघाडीवर आहेत. जिल्ह्यात टँकरची संख्या ५८८ वर गेली आहे. यावर्षी जिल्ह्यात १९ साखर कारखाने सुरु होते. जिल्ह्याचा दक्षिण भाग हा अवर्षणप्रवण आहे. मात्र, तेथेही सहकारी व खासगी कारखान्यांचे पीक आले आहे. एकीकडे साखर कारखाने वाढताहेत आणि दुसरीकडे टँकरही. नेत्यांना मात्र यात विसंगती वाटत नाही. जिल्ह्यातील टँकरची संख्या पाहून विभागीय आयुक्तही चकीत झाले. सोलापूर व नगर जिल्ह्यात गतवर्षी जवळपास सारखाच पाऊस झाला. मात्र, सोलापूर जिल्ह्यात सध्या केवळ १७ टँकर सुरु आहेत. उसाला पाणी मिळते मग प्यायला का नाही, असा थेट सवाल तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला. हाच सवाल नगर जिल्ह्यालाही लागू पडतो. दुष्काळाचे कायमस्वरुपी निर्मूलन करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची जी कामे सुरु आहेत, त्यात लोकसहभाग अत्यंत कमी असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आहे. मात्र, ही बाब एकही राजकीय पक्ष गांभीर्याने घेत नाही. जेवढी शक्ती मोर्चात खर्च होते तेवढी लोकसहभागात दिली तरी जलसंधारणाची मोठी कामे उभी राहतील. पण मग छावणीला मुकावे लागेल. हिवरेबाजार हे गावही दुष्काळी तालुक्यात आहे. यावर्षी पिण्याचे पाणी कमी पडेल म्हणून गावात आता कुठलेही पीक घ्यायचे नाही, विहिरींचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवायचे हा निर्णय या गावाने घेतला. या गावाला टँकर व छावणीची गरज वाटत नाही. हा हिवरेबाजार पॅटर्न आपल्या गावात राबवावा हे एकाही नेत्याला अद्याप वाटलेले नाही. जिल्ह्यात एका गावाने बोअरबंदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी ज्या तारखेला होणार होती त्याच्या आतच निम्मे गाव बोअर मारुन मोकळे झाले. दुष्काळाशी लढण्याची गावोगावची नीती अशी आहे. - सुधीर लंके