शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्टेन्ट किमतींची चिंता

By admin | Updated: June 28, 2017 00:16 IST

सध्या मोदींच्या अमेरिका दौऱ्याची चर्चा होताना दिसते़ ट्रम्प भेटीतून काय निष्पन्न होईल ते यथावकाश कळेलच, मात्र या दौऱ्याच्या सुरुवातीला अमेरिकेतील काही बड्या वैद्यकीय

सध्या मोदींच्या अमेरिका दौऱ्याची चर्चा होताना दिसते़ ट्रम्प भेटीतून काय निष्पन्न होईल ते यथावकाश कळेलच, मात्र या दौऱ्याच्या सुरुवातीला अमेरिकेतील काही बड्या वैद्यकीय कंपन्यांच्या प्रमुखांनी मोदींची भेट घेतली़ त्याची दखल प्रसारमाध्यमात तितकी दिसली नाही़ या बैठकीत अ‍ॅन्जिओप्लास्टीसाठी लागणाऱ्या ‘स्टेन्ट’बाबत चर्चा झाली़ भारत सरकारने स्टेन्टची किंमत कमी केल्याने या कंपन्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ भारत सरकारचे औषधांसंदर्भात असेच धोरण राहिले, तर भविष्यात आम्हाला गुंतवणूक करणे अवघड जाईल, असा इशारा या कंपन्यांनी दिला़ अमेरिकेतील बड्या कंपन्यांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक भारतात आहे़ तेथील वैद्यकीय कंपन्या राजकीय पक्षांच्या मोठ्या देणगीदार आहेत़ अमेरिकेच्या कायदे मंडळाचेही या कंपन्यांना झुकते माप मिळते. भारत सरकारने स्टेन्टच्या किमती कमी करण्यावर कायदे मंडळानेही आक्षेप नोंदवला. विशेष म्हणजे तसे रीतसर पत्र त्यांनी तेथील सरकारला धाडले़ भारत सरकारने किंमतीबाबत असा हस्तक्षेप केल्यास सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते, असा युक्तिवादही कायदे मंडळाने केला आहे. भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम होईल, असे कायदे मंडळाने पत्रात स्पष्टपणे म्हटलेले आहे़ काही महिन्यांपूर्वी स्टेन्टच्या किमतींचे गौडबंगाल उघडकीस आले. त्यानंतर भारत सरकारने त्यात हस्तक्षेप केला. परिणामी स्टेन्टच्या किमती धक्कादायकरीत्या खाली आल्या. त्यातून रुग्णांची होणारी लूट काहीप्रमाणात थांबल्याचे चित्रही निर्माण झाले. मात्र आता भारतात गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकन वैद्यकीय कंपन्यांनी या कमी झालेल्या स्टेन्टच्या किमतींवर आक्षेप नोंदवला आहे. वैद्यकीय क्षेत्रात ‘जायंट’ असलेल्या या कंपन्यांच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा स्टेन्टच्या किमतीबाबत सरकारला विचार करणे भाग पडू शकते. अमेरिकेतील कायदे मंडळाचा पाठिंबा या कंपन्यांना आहेच, आता त्यापाठोपाठ भारत सरकारही अमेरिकन कंपन्यांसमोर झुकल्यास त्याचा भुर्दंड पुन्हा एकदा सर्वसामान्यांना सोसावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदींसोबत अमेरिकन वैद्यकीय कंपन्यांच्या झालेल्या बैठकीचे परिणाम येत्या काही दिवसात दिसतीलच़