शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

एस.टी. फायद्यात कधी अन् कशी येणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:58 IST

१८००० बस आणि दररोज ६० लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची जबाबदारी एक लाख चार हजार कर्मचाऱ्यांवर आहे. एस.टी.कडून किती कर मिळतो याबरोबरच एक लाख चार हजार कर्मचाºयांचे कुटुंब कसे जगते याचाही विचार सरकारने केला पाहिजे.

- बाळासाहेब बोचरे‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेले राज्य परिवहन महामंडळ फायद्यात येईल आणि आपला पगार वाढेल ही आशा घेऊन बसलेल्या परिवहनच्या कर्मचाºयांच्या पदरी वर्षानुवर्षे निराशाच पडत आहे. कारण वर्षानुवर्षे महामंडळ तोट्यातच आहे. गेल्या पाच वर्षात २२१४ कोटींचा तोटा महामंडळाला झाला आहे. भविष्यात तोटा कमी होण्याची चिन्हे नाहीत. तोटा कमी करण्याची धोरणेही राबवली जात नाहीत. उलट तोटा वाढण्याच्या दृष्टीनेच पावले उचलली जात आहेत.राज्य शासनही कधीच एसटीकडे सहानुभूतीने पहात नाही. एस.टी.कडून किती कर राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो याकडेच राज्य शासनाचे लक्ष आहे. बसमध्ये वायफाय हा चेष्टेचा विषय झाला आहे. गणवेशाचेही गौडबंगालच आहे. शिवशाही नावाची खासगी बस आमच्या मानगुटीवर बसते ही काय अशी भीती कर्मचाºयांना आहे. सरकारने कर कमी करण्याचा कधी विचार केला नाही किंवा एस.टी.ला डिझेलमध्ये सवलत दिली नाही. व्यावसायिक वाहनाप्रमाणे सगळे कर भरायचे आणि तोट्यात असली तरी सेवा द्यायची. रात्रंदिवस घराबाहेर असलेल्या चालक-वाहकांंना आपण काय वागणूक देतो. किती भत्ता देतो. त्यांचे निवारे कसे आहेत याचा कधी विचारच केलेला नाही. चालक-वाहकांना वाटेतला हॉटेलवाला गरमागरम जेवण देत होता. त्यातही एस.टी.ने मन घातले आणि हॉटेलवाल्याकडून प्रतिगाडी शुल्क वसूल करण्यास सुरुवात केल्याने त्या हॉटेलमध्ये आज चालक-वाहकांना कुणी पाणीही मोफत देत नाही.महामंडळाची बसस्थानके म्हणजे बाजार तळ करून ठेवली आहेत. त्यामधून मोठ्या प्रमाणात भाडे वसूल होते. बसस्थानकावरील जाहिराती, बसमधील जाहिराती हा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. पार्सलचेही उत्पन्न चांगले आहे. तरीही एस. टी. तोट्यातच आहे. आता शिवशाहीमध्ये एस. टी.ने मोठी गुंतवणूक केली आहे. ५०० गाड्यांपैकी काही गाड्या या खासगी अन् भाडे तत्त्वावर घेतल्या आहेत. यामध्ये फायदा होतो की तोटा हे काळच ठरवेल. पण सध्याचा ५५० कोटींचा तोटा कमी करणे आणि पगारवाढ करणे याबाबत महामंडळ किंवा सरकारने कसलेच धोरण आखलेले नाही. भाडेवाढ हा केवळ एकच पर्याय महामंडळासमोर आहे. पण भाडेवाढ करून आपण खासगी वाहतुकीला मोठे करत आहोत हे महामंडळाच्या लक्षात आलेले नाही. प्रवासाचे अंतर, एस.टी.चे भाडे आणि एस.टी.ची उपलब्धता याचा विचार करता सर्वसामान्यालाही खासगी चारचाकी गाड्या परवडू लागल्या आहेत. त्यामुळे आज सर्वात अगोदर आपले कुटुंब वाचविण्याची वेळ महामंडळावर आली आहे. ज्या जिल्ह्यात एस.टी. तोट्यात आहे त्या जिल्ह्याच्या आरटीओंवर काही जबाबदारी टाकली तरी पुरेसे आहे. खासगीवर अंकुश आणि एस.टी.ने व्यवसायिक धोरण राबवले अन् सरकारने सहानुभूतीने पाहिले तरच एस.टी. वाचणार आहे आणि तरच कर्मचाºयांना भवितव्य आहे. १८००० बस आणि दररोज ६० लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची जबाबदारी एक लाख चार हजार कर्मचाºयांवर आहे. एस.टी. कडून किती कर मिळतो याबरोबरच एक लाख चार हजार कर्मचाºयांचे कुटुंब कसे जगते याचाही विचार सरकारने केला पाहिजे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप