शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्राणाच्या गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 06:26 IST

प्रवाही शक्ती असल्याने प्राणाला गती असते. या दोन प्रकारच्या असतात. पहिलीला अंतर्मुख गती म्हणतात. तर दुसरी बहिर्मुख गती म्हणून ओळखली जाते.

प्रवाही शक्ती असल्याने प्राणाला गती असते. या दोन प्रकारच्या असतात. पहिलीला अंतर्मुख गती म्हणतात. तर दुसरी बहिर्मुख गती म्हणून ओळखली जाते. पहिल्या गतीद्वारे प्राण शरीरात सुषुम्नेमार्गे प्रवेश करतात. सुषुम्ना ही नाकाच्या मध्यभागी असलेली मुख्य नाडी. नंतर तो (मेंदूतील) नाडी केंद्रात संकलित होऊन क्रियाशील नाड्यांच्या माध्यमातून शारीरिक क्रियांना उपयोगी पडतो. ज्ञानेंद्रियांकडून कर्मेंद्रियांकडे असा अंतर्गत प्रवास हा अंतर्मुख प्रवास/प्रवाह. कर्मेंद्रियांकडून प्राणातले शरीर पोषक भाग साठविणे, वापरातून कर्मेंद्रियांची विहित कार्ये करणे यासाठी उपयोगात आणला जातो. वापरानं निरुपयोगी झालेला भाग प्रश्वासातून शरीराबाहेर बहिर्मुख गतीने परत पाठविला जातो. माणसाच्या सगळ्या शारीरिक क्रिया आणि मनोव्यापार प्राणामुळे कार्यान्वित होतात आणि कार्यरत राहतात. प्राण एवढा महत्त्वाचा आहे.मादक पदार्थांमुळे शरीराची कार्यशक्ती किंचित काळ वाढून शारीरिक, मानसिक, बौद्धिक कार्यशक्ती प्रबळ झाल्यासारखी भासते. ध्यानातून, मंत्रजपामुळे महाप्राणाचे संपादन (मिळविणे) आणि संवर्धन (साठा) होऊन एक वेगळीच नशा अनुभवायला येते. मात्र ही नशा ज्ञानकोषांची ज्ञान ग्रहण शक्ती वाढविते. भौतिक मादक द्रव्यं ही ज्ञानतंतूंची हानी करून ज्ञानकोषांच्या कार्यात अडथळा, पूर्ण रूकावट आणतात. पण ध्यान-नशा ज्ञानतंतंूना सकारात्मकपणे उत्तेजित करत असल्यामुळे ते बळकट होऊन ज्ञानकोष जोमानं कार्यरत होतात. भौतिक मादक पदार्थ शरीराची कार्यशक्ती, बुद्धीचं तेज, हृदयबळ तात्पुरतं वाढवतात असा भास होतो. अंतत: हे पदार्थ या सर्वांची हानीच करतात. ध्यान-नशेमुळे शारीरिक कार्यशक्ती, बौद्धिक तेज, हृदयांतर्गत बळ कायमचं वाढतं. ध्यान धारणेमुळे शरीरकोषात सकारात्मक बदल होऊन ही बळं वाढती राहतात.मादक पदार्थाची नशा इंद्रियांचा उन्माद वाढविते. प्राणसंपादन, वर्धनातून आलेली नशा इंद्रियातील असल्यानं अलौकिक असते. भौतिक पदार्थांची नशा उतरूनही जाते. प्राणांपासून साठलेली नशा शरीर, मन, बुद्धी यांत भरून राहते. ही नशा (वास्तविक हिला नशा म्हणण्यानं प्राणशक्तीचा अवमान करणं आहे) निर्दोष असते. निर्विकार (कोणताही विकार उत्पन्न न करणारी) असते. प्राणसंपादन, वर्धनातून जो आनंद मिळतो तो दिव्य आनंद! म्हणूनच तो ब्रह्मानंद समजला जातो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक