शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
3
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
4
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
5
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
6
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
7
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
10
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
11
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
12
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
13
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
14
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
15
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
16
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
17
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
18
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
19
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
20
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू

विशेष लेख: भयंकर भूकंपातही ताठ उभ्या तैवानचे ‘सिक्रेट’

By shrimant mane | Published: April 06, 2024 11:14 AM

Taiwan Earthquakes: गेल्या २५ वर्षांमधील सर्वांत मोठा भूकंप, रिक्टर स्केलवर ७.४ नोंद, त्सुनामीचा इशारा.. तरीही अतिशय अल्प जीवितहानी ! तैवानने हे कसे साधले असेल?

- श्रीमंत माने( संपादक, लोकमत, नागपूर) 

परवा बुधवारी सकाळी तैवानला हादरवून सोडणाऱ्या भूकंपानंतर वॉलिन सिटीमध्ये ४५ अंशांच्या कोनात रस्त्यावर ओणवी झालेल्या एका दहा-बारा मजल्यांच्या इमारतीचे छायाचित्र समोर आले तेव्हा अनेकांच्या काळजात धस्स झाले. कारण, पंचवीस वर्षांमधील सर्वांत मोठा भूकंप, रिक्टर स्केलवर ७.४ नोंद, त्सुनामीचा इशारा यानंतर जीवित व वित्तहानीची कल्पनादेखील अंगावर काटा आणणारी असते. पण, त्याचवेळी राजधानी तैपेईमधील ‘तैपेई-१०१’ ही सर्वाधिक उंचीची इमारत मात्र सुरक्षित राहिली. 

नावाप्रमाणेच १०१ मजल्यांची आणि तब्बल १६६७ फूट उंचीची ही इमारत २००४ पर्यंत जगातील सर्वाधिक गगनचुंबी इमारत म्हणून ओळखली जायची. तैपेईतील मेट्रो मार्गांनीही जागा सोडली अशा एरव्ही विध्वंसकारी ठरणाऱ्या मोठ्या भूकंपातही ही इमारत सुरक्षित राहण्याचे कारण तिच्या मध्यभागी ८७ ते ९२ व्या मजल्यापर्यंत तब्बल ६६० टन वजनांचा एक पोलादी लोलक टांगता ठेवलेला आहे. असा पेंड्यूलम मध्यभागी टांगता ठेवणे हे भूकंपशोषक बांधकामाच्या विविध तंत्रांपैकी एक तंत्र आहे. तळमजल्यावर खांब न टाकणे, संपूर्ण इमारतीची रचना शिसे व रबरापासून बनलेल्या बॉल बेअरिंगवर आधारित तरंगत्या पायावर उभी करणे, आरसीसी बांधकाम अथवा मोठ्या इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर धक्काशोषक असे आणखी काही उपाय आहेत. एकंदरित ताठ, मजबूत व तरीही लवचिक असे भूकंपरोधक इमारत बांधकामाचे सूत्र आहे.

तैवानच्या भूकंपात शेकडो जखमी झाले असले तरी मृतांची संख्या ९ हे अशा तंत्राचे वापर व त्यातून भूकंपरोधक इमारतींचे यश आहे. बुधवारी सकाळी लोक नित्यनेमाने कामासाठी तयार होत असताना हा भूकंप झाला. त्याचे केंद्र वॉलिन प्रांतात होते व त्यापासून वॉलिन सिटी हे तिथले मुख्य शहर अवघ्या ११ मैलांवर आहे. तैपेई किंवा न्यू तैपई या राजधानीतही भूकंपाचे धक्के जाणवले. पण, काही वेळातच जनजीवन सुरळीत झाले. वाहतूक पुन्हा सुरू झाली. आई-वडील मुलामुलींना शाळेत सोडायला निघाल्याचे, नोकरदार कामावर चालल्याचे दिसले. 

भूकंपाची तीव्रता डोंगराळ भागात अधिक होती. रेल्वे, रस्ते डोंगररांगांमधून जातात. अनेक जण खाणींमध्ये काम करतात. डोंगराळ भागात भूकंपामुळे रस्ते व रेल्वे बोगद्यांच्या तोंडावर दरडी कोसळल्या. काही लोक खाणींमध्ये अडकले. यंत्रणेने तत्काळ त्यांची सुटका केली. वॉलिन सिटीचे महापौर तर कुबड्या घेऊन मदतकार्याचे नेतृत्व करताना दिसले. कारण, आधीच्या भूकंपात त्यांनी पाय गमावला आहे. या साऱ्यातून जगाने आदर्श घ्यावा, अशा आपत्ती व्यवस्थापनाची नोंद झाली. जगभरातून तैवानची जनता व प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. तैवानला हे साधले कारण बांधकामाचे अत्यंत कठाेर कायदे, अत्यंत प्रभावी सेस्मोलॉजिकल नेटवर्क आणि अखेरच्या घटकापर्यंत पाझरलेले भूकंपविषयक लोकशिक्षण, ही या आपत्ती व्यवस्थापनाची त्रिसूत्री आहे.

यापैकी इमारतींचे बांधकाम हा विषय तैवान, तसेच जपान, इटली देश किंवा अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतांनी गंभीर्याने हाताळल्याचे मानले जाते. कारण, भूकंपामुळे माणसे मरत नाहीत, तर ती इमारतींखाली दबून मरतात, हे या नैसर्गिक आपत्तीचे वास्तव आहे. भूगर्भातील प्रत्येक हालचालींच्या नोंदी ठेवणारी वैज्ञानिक व्यवस्था हे त्यापुढचे पाऊल आहे. आधुनिक विज्ञानात त्यासाठी कृमी, कीटक, प्राणी, पक्षी यांसारख्या निसर्ग अधिक जवळून अनुभवणाऱ्या घटकांचे सतत निरीक्षण, त्याच्या नोंदी आणि अनेक वर्षांच्या त्या नोंदीच्या आधारे अनुमान हे सूत्र राबविले जाते. जपान किंवा इटलीमध्ये त्यावर आधारित अद्ययावत यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत. त्या तोडीचे सेस्मोलॉजिकल नेटवर्क तैवानमध्ये कार्यरत आहे. भूकंप प्रतिबंधक त्रिसूत्रीमधील लोकशिक्षणाचा तिसरा मुद्दा थेट नागरिकांना व्यवस्थेत सहभागी करून घेणारा आहे. शाळा-महाविद्यालये, कामांच्या ठिकाणी ‘क्वेकड्रील’ हा तैवानमध्ये सतत चालणारा उपक्रम आहे. 

तैवानला भूकंप नवे नाहीत. कारण हा जेमतेम ३६ हजार चौरस किलोमीटर व अडीच कोटींपेक्षा कमी लोकसंख्येचा देश ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीव्र भूकंपप्रवण टापूच्या काठावर आहे. समुद्राखालील पॅसिफिक सी-प्लेट व युरेशियन प्लेट सतत एकमेकांवर आदळत असतात. त्यामुळे सतत भूकंप होतात. १९८० पासून रिक्टर स्केलवर ४ किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रता असलेल्या तब्बल दोन हजार भूकंपांची नोंद झाली आहे. त्यातील शंभर भूकंपांची तीव्रता तर ५.५ पेक्षा अधिक होती. रिक्टर स्केलवर ७.७ नोंद असलेला २१ सप्टेंबर १९९९ चा भूकंप सर्वाधिक विनाशकारी होता. त्यात २४०० जणांचे बळी गेले. एक लाखाहून अधिक लोक जायबंदी झाले. हजारो इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. ती आपत्ती तैवानसाठी वेदनादायी होतीच. पण, त्यापेक्षा अधिक वेदना होत्या त्या जगभरातून झालेल्या टीकेच्या. विशेषत: भूकंपानंतर शिथिल राहिलेली सरकारी यंत्रणा त्या टीकेचे लक्ष्य होती. मदतकार्य उशिरा सुरू झाले. वैद्यकीय पथके पोहोचायलाच कित्येक तास लागले. वेळेवर उपचार न झाल्याने अनेकांचे जीव गेले. तो भूकंप व टीकेपासून तैवानने धडा घेतला. नवा आपत्ती प्रतिबंध व संरक्षण कायदा आणला. भूकंपाची माहिती तत्काळ पोहोचविणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. इमारत बांधकामांत नवतंत्राचा वापर अनिवार्य करण्यात आला. धोकादायक इमारती बांधणाऱ्यांवर कायद्याचा अंकुश लावला गेला. २०१६ मधील एक उदाहरण वैशिष्ट्यपूर्ण आहे. तैनान भागात भूकंप झाला. एक सतरा मजली इमारत कोसळली. त्यात अनेकांचे जीव गेले. ती इमारत योग्य त्या तंत्राचा वापर करून बांधण्यात आली नसल्याने पाच जणांविरुद्ध खटला भरला गेला व त्यांना तुरुंगवास झाला. अशा कारवायांमधूनच सार्वजनिक शिस्त येते. अप्रत्यक्ष लोकशिक्षणही घडते आणि आपल्याकडील मुंबई स्पिरीट म्हणतात तशी अस्मानी असो की मानवनिर्मित, कोणत्याही संकटावेळी आवश्यक असलेले सामूहिक भान तयार होते. हे भानच शेकडो, हजारो लोकांचे जीव वाचविते.shrimant.mane@lokmat.com

टॅग्स :EarthquakeभूकंपInternationalआंतरराष्ट्रीय