शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यामुळे काही पुरुष पीडित हे मान्य; पण महिलांसाठी असलेले कायदे नको ही धारणा चुकीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 07:35 IST

गेल्या महिन्यात अतुल सुभाष या आयटी इंजिनीअरने आणि पुनीत खुराना या तरुण उद्योजकाने आत्महत्या केली. दोघांनाही आत्महत्येला प्रवृत्त करणारे प्रमुख कारण एकच, ते म्हणजे पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी चालवलेला छळ. त्यानिमित्ताने...

ॲड. रमा सरोदे, ह्युमन राइट्स पॅनेलिस्ट

अतुल सुभाष या आयटी इंजिनीअरने आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा गैरवापर होतो का, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सर्रासपणे या कायद्यांचा गैरवापर केला जातो, असा पुरुषांचा समज आहे. त्यांचा हा विचार मला धोक्याचा वाटतो. केवळ महिलांसाठीच असलेल्या कायद्यांचा गैरवापर होतो का?  नाही... सर्वच कायद्यांचा गैरवापर होत असतो. महिलांसाठी असलेले कायदे हे सामाजिक आहेत. त्यांच्याकडे केवळ महिलांचे कायदे म्हणून पाहणे अयोग्य ठरले. हा कायद्यामुळे काही पुरुष पीडित असतील, हे मान्य आहे. पण, हे कायदेच नको, ही धारणा चुकीची आहे. या कायद्यांना महिला विरुद्ध पुरुष, असे रंग कोणी देऊ नये.

आपला समाज पितृसत्ताक असल्याने महिलांनी कसे वागावे, कसे राहावे, तिने नोकरी करावी की नाही, वयाच्या कितव्या वर्षी कोणाबरोबर लग्न करावे, याचा निर्णय घरातले पुरुष घेत असतात. या निर्णय प्रक्रियेत फारच कमी वेळा महिलांचा सहभाग असतो. या पुरुषप्रधान संस्कृतीत महिला व पुरुष दोघांवरही त्याचा  पगडा आहे. त्यामुळे आपल्यावर अत्याचार होतो आहे, हेसुद्धा बऱ्याच स्त्रियांना कळत नाही. एखादे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचते. पण, तसा अत्याचार सहन करणारी ती एक नसते तर अशा अनेक महिला  कोणतीही तक्रार न करता अत्याचार निमूटपणे सहन करत असतात. अत्याचाराला कंटाळलेल्या असतील तरी महिला माहेरच्या पाठबळाशिवाय सहसा एकटीने कोणताच निर्णय घेत नाहीत. त्यांनी माहेरी परतावे की सासरीच अत्याचार सहन करत राहावे, नवऱ्यापासून घटस्फोट घ्यावा की नाही? त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल करावे, इथपासून सर्व निर्णय प्रक्रियेत एक पुरुष सहभागी असतोच.

वकील म्हणून माझा अनुभव आहे की, अनेक बायका त्यांच्या नवऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास इच्छुक नसतात. आपल्या नवऱ्याने तुरुंगात जावे, अशी त्यांची इच्छा नसते. महिलांसाठी असलेले कायदे एकप्रकारे सामाजिक कायदे आहेत. त्यांच्यावर होत असलेले कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी अशा कायद्यांची आवश्यकता वाटते. त्यांच्यावरील हिंसेचे प्रमाण वाढू लागले. आकडेवारीद्वारे हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा कायद्यांची गरज भासली. महिलांना हक्काचा निवारा मिळावा, संरक्षण मिळावे, मुलांपासून दूर केले जाऊ नये म्हणून २००५ चा दिवाणी स्वरूपाचा कौटुंबिक कायदा तयार केला.

कायद्यात पोटगी आणि देखभालीच्या खर्चाची तरतूद असल्याने बायका वाट्टेल तेवढे पैसे मागतात, असा लोकांचा गैरसमज आहे. दोघेही कमावते असतील तर सर्वोच्च न्यायालयाने दोघांच्याही मालमत्ता आणि कर्ज याबाबत प्रतिज्ञापत्रात तपशिलात माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. कोणीही येऊन मनमानी रक्कम मागू शकत नाही. कोणावर किती जबाबदारी आहे, तो काय कमावतो आणि अन्य बाबींचा सारासार विचार करून पोटगीची रक्कम  ठरविली जाते.  काही बायका तर पोटगीची रक्कम नको केवळ सुटका करा, असे म्हणणाऱ्याही आहेत.

कौटुंबिक हिंसाचार त्याचबरोबर घटस्फोटाच्या केसेस सुरू असतील आणि घटस्फोटाचे प्रकरण सामंजस्याने सोडवायचे असेल तर बरेचदा अट घातली जाते की, कौटुंबिक हिंसाचार व अन्य प्रकरणे मागे घे. कोर्टकचेरीतून सुटका हवी असल्याने महिला अट मान्य करतात. मात्र, आयपीसी ४९८ (अ) अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेतला जाऊ शकत नाही म्हणून महिलेला खोटी साक्ष द्यावी लागते आणि आपल्यावर अत्याचार झाला नाही. रागाच्या भरात आपण अशी तक्रार केली, असे न्यायालयाला सांगते. आपोआपच नवरा सुटतो. त्याचा अर्थ महिलेने कायद्याचा गैरवापर केला असा होत नाही. रोजंदारीवर काम करणाऱ्या पुरुषांच्यामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे, असे अभ्यासातून दिसते. त्यासाठी दारू पिणे, कामावरील तणाव अशा बाबी कारणीभूत आहेत. 

अतुल आणि पुनीतच्या निमित्ताने पुरुषांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न चर्चेला आला आहे. त्यासाठी जुन्या बुरसटलेल्या रुढी सोडून लिंगभेदाच्या पलीकडे जावे लागेल. तरच स्वस्थ कुटुंब निर्माण होईल. उपाययोजना म्हणून दाम्पत्याने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय