शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

दक्षिणही भ्रष्टाचाराच्या नव्या गर्तेत

By admin | Updated: April 20, 2017 02:41 IST

देशातली उत्तरेकडची राज्ये जेवढी भ्रष्ट तेवढीच दक्षिणेतील राज्येही भ्रष्टाचाराने लिप्त आहेत. त्यातल्या काहींची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला आली तर काहींची अजून पुरती यायची आहेत

देशातली उत्तरेकडची राज्ये जेवढी भ्रष्ट तेवढीच दक्षिणेतील राज्येही भ्रष्टाचाराने लिप्त आहेत. त्यातल्या काहींची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला आली तर काहींची अजून पुरती यायची आहेत, एवढेच. जयललिता, शशिकला आणि त्यांचे पुतणे दिनकरन यांनी तामिळनाडूचे नाव यासंदर्भात सर्वतोमुखी करून दक्षिण भारताच्या इतिहासाला एक काळेकुट्ट पानच स्वतंत्रपणे जोडले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत जयललितांच्या बंगल्यावर व अनेक निवासांवर आर्थिक नियंत्रण विभागाने घातलेल्या धाडीत कोट्यवधींची बेहिशेबी रोकड मिळाली. हजारो साड्या आणि हजारोंच्या संख्येने पादत्राणे, दागिन्यांचे मोठे साठे आणि त्याखेरीज त्यांनी खरेदी केलेली घरे व जमिनी यांचाही मोठा तपशील हाती आला. त्या साऱ्या किटाळातून जयललिता कशा सुटल्या याची रोचक कहाणी अजून गुलदस्त्यात राहिली आहे. त्यांच्याच सहकारी व त्यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचा ध्यास घेतलेल्या शशिकला तशाच आरोपापायी आता कर्नाटकच्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरचे आरोपही जयललिता यांच्यावरील आरोपांवर ताण करणारे आणि एवढ्या साध्या दिसणाऱ्या बाई देशाच्या व जनतेच्या केवढ्या मोठ्या संपत्तीचा अपहार करू शकतात हे सांगणारी आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजकारण करणारे त्यांचे पुतणे दिनकरन यांनी प्रत्यक्ष निवडणूक आयोगालाच ६० कोटी रुपयांची लाच, आपल्या पक्षाला ‘दोन पाने’ हे जयललितांच्या अण्णाद्रमुक या पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी देऊ केल्याचे उघड होऊन तो सत्पुरुषही आता तुरुंगाच्या वाटेवर आहे. तिकडच्या करुणानिधींचा द्रमुक हा पक्षही या प्रकारात मागे नाही. ए.राजा या त्याच्या मंत्र्याने व कणिमोळी या करुणानिधींच्या कन्येने किती हजार कोटींचा भ्रष्टाचार त्यांच्या सत्ताकाळात केला हेही जगजाहीर आहे. या दोन्ही पक्षांतील भ्रष्टाचार शिरोमणींना तामिळनाडूची साक्षर जनता नेतेपदी का निवडते आणि त्यांच्यातील काहींना पार दैवतांचा दर्जा कशी देते, हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय ठरावा असा आहे. शशिकला व दिनकरन यांची अशी वाट लागल्यानंतर आणि जयललिता यांना त्यांच्या मृत्यूमुळे शिक्षा करता येत नाही हे निश्चित झाल्यानंतर अण्णाद्रमुक या पक्षाच्या, शशिकला व पनीरसेल्वम या दोन शकलांचे एकीकरण करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. राजकीय एकीकरणासाठी प्रयत्न करणारे हे गट पक्षाच्या शुद्धीकरणासाठी कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत हे येथे लक्षात घ्यायचे आहे. भ्रष्ट असो वा तुरुंगवास, तो आपल्याजवळ येण्याने आपली ताकद वाढत असेल तर त्याचे स्वागत करायचे हा कित्ता आता देशाच्या राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षांनीही गिरविणे सुरू केले आहे. परिणामी भ्रष्टाचार आहे आणि तो खपवून घेतला जात आहे, तोवर जयललिता, शशिकला किंवा दिनकरन यांना आणि ए. राजापासून कणिमोळींपर्यंतच्या कुणालाही राजकीय मरण नाही, हे उघड आहे. पंजाबचे बादल पितापुत्र, उत्तर प्रदेशचे मुलायमसिंह पुत्र, पौत्र, बंधू, जावई व इतर आणि बिहारचे लालूप्रसाद या भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्यांनाही या देशात तसे राजकीय मरण आले नव्हते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर, उमा भारती, कल्याणसिंह आणि ऋतुंभरा इत्यादींनाही त्यांच्यावरील राजकीय, सामाजिक व धार्मिक अपराधांपासून मुक्तता आहे. खुनापासून खंडणीखोरीपर्यंतचे आरोप डोक्यावर असणारी माणसे ज्या देशात राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षपदी येतात, तेथे याहून काही वेगळे व्हायचेही नसते. बंगालमधील सारदा घोटाळा, मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळा, महाराष्ट्रातील खडसे घोटाळा किंवा केंद्र व राजस्थानातील ललित मोदी घोटाळा या साऱ्यांचीच या संदर्भात नोंद घ्यावी लागणार आहे. दक्षिणेतील राजकारणात नेतृत्वाविषयीचा भक्तिभाव आहे. तो थेट पेरियर रामस्वामींपासून अण्णादुरार्इंपर्यंत आणि एम.जी.आर.यांच्यापासून करुणानिधींपर्यंत साऱ्यांच्या वाट्याला आला आहे. ही राजकीय अंधश्रद्धा जोवर संपत नाही, तोवर दक्षिणेतल्या भ्रष्टाचाराचाही शेवट होणार नाही. कायदे लागले, बेड्या पडल्या आणि गजाआड राहूनही आसारामबापूंना त्यांचा शिष्यगण जसा सोडत नाही तोच या पुढाऱ्यांच्या राजकारणातल्या भाग्यशाली असण्याचा प्रकार आहे. शशिकला तुरुंगात आणि दिनकरन तुरुंगाच्या वाटेवर असताना त्या दोघांना व त्यांच्या कुटुंबातील साऱ्यांना पक्षाबाहेर काढाल, तरच अण्णाद्रमुक या पक्षात ऐक्य घडून येईल अशी भूमिका त्याच्या दुसऱ्या शकलाचे नेते पनीरसेल्वम यांनी घेतली असल्याने काही काळ त्या राज्यात एक अस्थिरता राहणार आहे. मात्र भ्रष्टाचार व त्यातून आलेला पैसा हे साऱ्यांना जोडणारे जगातले सर्वात मजबूत सिमेंट आहे. त्याचा परिणाम व चमत्कार येत्या काही दिवसात तामिळनाडूमध्ये दिसेल याविषयी कुणाच्या मनात शंका राहू नये. मात्र हा सारा लोकशाहीला लावला जाणारा कलंक आहे हेही त्या राजवटीतल्या कुणी विसरण्याचे कारण नाही. जयललिता, शशिकला आणि दिनकरन यांच्या तीन धड्यांनंतर तरी दक्षिणेला राजकीय शुद्धतेचे भान यावे ही अपेक्षा.