शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सत्याची व विवेकाची कास न धरता सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:11 IST

सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच राहणे स्वाभाविक असते.

ज्या समाजातील लोक आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी सत्याची व विवेकाची कास न धरता आपण आधुनिक विचारांचे आणि विज्ञानवादी असल्याचा आव आणतात; परंतु प्रत्यक्षात सर्व प्रकारच्या भोंदूपणाचे जीवन जगतात असा समाज वैचारिकदृष्ट्या खुजाच राहणे स्वाभाविक असते. वैचारिकदृष्ट्या तसेच समाजसुधारणेच्या बाबतीत सर्वात प्रगत राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिले जाते. यासाठी समाजसुधारकांच्या अनेक पिढ्याही खर्ची पडल्याचे दाखले इतिहासात नमूद आहेत. असे असतानाही या समाजातील काही घटक आजही शेकडो वर्षांपूर्वीच्या मानसिकतेतच गुरफटून राहताना दिसणार असेल तर समाजधुरीणींचे प्रयत्न निष्फळ ठरले की लोकांची ओंजळ थिटी पडली, असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहू नये.महाराष्ट्राची भूमी तशी साधुसंतांच्या वास्तव्याने संपन्न झालेली आहे. या प्रदेशाला पुरातन रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी, अंधश्रद्धेला कायमस्वरूपी मूठमाती देण्यासाठी अनेक सुधारकांनी आयुष्य वेचले. राष्टÑ, राज्य सुसंस्कृत व्हावे, वैचारिक संपन्नता वाढीस लागावी आणि मानवजात गुण्यागोविंदाने नांदावी, हाच त्यांचा निर्मळ उद्देश त्यामागे होता. हा उद्देश अपवाद वगळता सर्वांच्याच मनात झिरपू न शकल्यानेच आजही बहुतांशी वर्गजादूटोणा, करणी, मूठ मारणे, चेटकीण असणे अशा भ्रामक कल्पनांना चिटकून बसलेला दिसून येतो. त्यात खतपाणी घालण्याचे काम संशयी वृत्तीने केले आहे. वास्तविक संशय ही एक पीडाच असून, यापायी अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली आहेत. काहींना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एका वृद्धाने केलेली आत्महत्यादेखील याच प्रकारात मोडणारी आहे. धामणकुंड गावातील मोलमजुरी करून गुजराण करणाºया पांडू धर्मा चौधरी या ७७ वर्षीय इसमावर भुताटकीचे देव असल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गावातील माणसे व जनावरांचे अकाली मृत्यू होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. गावकºयांकडून होणाºया या मानसिक जाचाला वैतागून गाव सोडून निघून गेलेल्या त्या वृद्धाला गावदेवाच्या पूजेच्या निमित्ताने गावात पुन्हा बोलावले गेले असता संयोगाने त्याच दिवशी गावातील एक रेडा मृत्युमुखी पडला. त्याचेही खापर या वृद्धावर फोडण्यात आल्याने त्याने अखेर आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. एकीकडे महाराष्टÑ विचारांनी आणि संस्कारांनी प्रगत होत असल्याच्या हाकाट्या पिटल्या जात असताना दुसरीकडे त्याउलट घटना जर घडत राहणार असतील तर या वृद्धाचा मृत्यू हा अप्रागतिक विचारांचाच बळी म्हणावा लागेल. २०१३ मध्ये राज्य शासनाने जादूटोणाविरोधी विधेयक संमत करूनही हे प्रकार थांबू शकलेले नाहीत. याचा अर्थ या विधेयकाच्या कठोर अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या की हा कायदा अद्याप लोकांपर्यंत पोहचलाच नाही, अशी शंका यावी.जादूटोण्याच्या संशयामुळे केवळ या चौधरी नामक वृद्धालाच त्रास झाला असे नव्हे, अशा घटना महाराष्टÑात अनेक ठिकाणी घडल्या असून, आजही ती शृंखला कायम आहे. कोठे भुतीण असल्याच्या संशयावरून महिलांना विवस्र करून मारहाण करण्यात आली आहे, तर कोणावर झाडाला बांधून अमानुषपणे अत्याचार करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या घटना म्हणजे पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाºया राज्यासाठी शोभादायी म्हणता येऊ नयेत.