शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सोशल मीडियाचे (अ)सामाजिकरण--जागर -रविवार विशेष

By वसंत भोसले | Updated: August 27, 2017 01:21 IST

वसंत भोसले---आंबोलीहून सावंतवाडीत उतरणाºया घाटात भली मोठी दरड कोसळली आहे. जोरदार पाऊस चालू आहे. परिणामी वाहतूक बंद पडली असल्याचा मेसेज गेल्या बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता. तो बनावट होता. मेसेज टाकणाºयाला यातून काय मिळाले. नागरिकांना त्रास दिल्याचा आसुरी आनंद? ही गुन्हेगारी स्वरूपाची विकृती आहे.लोकमतचे नागपूरचे ज्येष्ठ सहकारी सोपान पांढरीपांडे यांचा सर्व ...

ठळक मुद्देनागरिकांना त्रास दिल्याचा आसुरी आनंद? ही गुन्हेगारी स्वरूपाची विकृती आहे. हिंसाचाराच्या मार्गाने संताप व्यक्त करण्याची पद्धत ही अराजकतेकडे घेऊन जाणारी आहे.नव्या तंत्रज्ञानाचा वापर माणसाबरोबरच निसर्गाच्या संवर्धनासाठी, जीवप्राण्यांच्या कल्याणासाठी केला, तर जीवन अधिक सुखकर होईल.

वसंत भोसले---आंबोलीहून सावंतवाडीत उतरणाºया घाटात भली मोठी दरड कोसळली आहे. जोरदार पाऊस चालू आहे. परिणामी वाहतूक बंद पडली असल्याचा मेसेज गेल्या बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता. तो बनावट होता. मेसेज टाकणाºयाला यातून काय मिळाले. नागरिकांना त्रास दिल्याचा आसुरी आनंद? ही गुन्हेगारी स्वरूपाची विकृती आहे.लोकमतचे नागपूरचे ज्येष्ठ सहकारी सोपान पांढरीपांडे यांचा सर्व आवृत्त्यांना कार्यालयीन कामासाठी भेटीगाठींचा दौरा होता. कोल्हापूरची बैठक आटोपून निपाणी-आंबोलीमार्गे गोव्याकडे ते निघाले होते. निपाणीच्या स्तवनिधी घाटात दुपारचे जेवण घेण्यासाठी थांबले होते. दोन दिवसांनी गणेशोत्सवाची सुरुवात होणार असल्याने मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग तसेच गोव्याचे नागरिक घरी परतत होते. त्यापैकी बहुतांश लोक याच घाटात जेवणासाठी थांबले होते. दहा-पंधरा गाड्या होत्या. सर्वांच्या चेहºयावर चिंता होती ती व्हॉटस्अ‍ॅपवरील एका मेसेजची. त्यांची चर्चा पांढरीपांडे यांच्याही कानावर पडली. एकाने मेसेज वाचून दाखविला. तो मेसेज सांगत होता की, आंबोलीहून सावंतवाडीत उतरणाºया घाटात भली मोठी दरड कोसळली आहे. जोरदार पाऊस चालू आहे. परिणामी वाहतूक बंद पडली आहे. त्या मेसेजबरोबरच दरडी कोसळतानाचा व्हिडीओही अपलोड करण्यात आला होता. उगाच लोकांनी गैरविश्वास दाखवायला नको, म्हणून खबरदारी घेतली असेल. ज्या ठिकाणाहून दरड कोसळली आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर एक धबधबाही दिसतो आहे. सर्व काही स्तब्ध झाले. पहाटे उठून मुंबई, पुणे सोडून निम्मा रस्ता पादाक्रांत (गाडीने) करीत आलेल्यांना या मेसेजमुळे पुढील नियोजन करणे सोपे झाले. गोव्याला जाणाºयांना आंबोली घाटाऐवजी, बेळगावहून चोरला घाट पकडता येईल. कणकवली किंवा सिंधुदुर्गला जाणाºयांना परत निपाणीला येऊन राधानगरीमार्गे फोंडा घाटातून उतरता येऊ शकते.याच दरम्यान सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम प्रसारमाध्यमांसाठी निवेदन तयार करून वितरित करीत होते. त्यात ते म्हणत होते की, आंबोली घाटात दरड कोसळलेली नाही. वाहतूक व्यवस्थित चालू आहे. सोशल मीडियावर व्हॉटस्-अ‍ॅपच्या माध्यमातून वृत्त पसरविण्यात येत आहे. ते पूर्णत: निराधार आहे. ती एक अफवा आहे. गणेशोत्सवासाठी कोकण आणि गोव्याकडे प्रवास करू इच्छिणाºयांनी या मार्गाचा सर्रास वापर करावा.अशा या सोशल मीडियाचे काय करावे? कोकण आणि गोव्यातील माणूस नोकरी, कामधंदा तसेच व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात राहतो. विशेषत: मुंबई, पुणे आणि कोल्हापूर परिसरात मोठ्या संख्येने हे लोक राहतात. गणेशोत्सवात घरी गणपतीची आरास करून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. गावाच्या बाहेर राहणाºयांना गावची ओढ काय असते ती कळते.कोकण किंवा गोव्यातील लोक सार्वजनिक गणपतीपेक्षा घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करुन भव्य-दिव्य आरास करतात. भक्तिभावाने पूजा-अर्चा करतात, गावातील नातेवाईकांची भेट घेतात, मित्रांना भेटतात. एकाच गावातील, पण कोण पुण्यात राहतो, कोण मुंबईत काम करतो. त्यांच्या गाठीभेटी होतात. कोकण किंवा गोव्यातील गणेशोत्सव हा उर्वरित महाराष्ट्रातील गणेशोत्सवापेक्षा वेगळाच असतो. महिना-महिना अगोदर त्याचे नियोजन केलेले असते. गावात भजने होतात, जेवणं होतात, गाठीभेटी होतात. त्यांचे गावाकडे जाणं हे फारच अंतरीच्या ओढीचा मामला असतो. शिवाय मान्सूनच्या पावसाचा जोर ओसरलेला असतो. सुमारे दोन-अडीच महिन्याच्या पावसाने संपूर्ण कोकणपट्टा हिरवागार शालू नेसावा, विविध प्रकारच्या फुलांनी आणि भुरभुर उडणाºया पाखरांनी त्यावर नक्षीकाम करावे, असे आल्हाददायक वातावरण असते.अशा या मंगलदायी प्रसंगी गावाची वेस गाठू पाहणाºयांच्या पायात साप सोडण्याचे काम कोण करीत असते? वास्तविक काळ बदलला आहे. पूर्वी गावाकडे जाण्यास रस्ता नव्हता, घरात गाडी नव्हती. संपूर्ण रात्रभर प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येत असेल तेथून गावोगावी (प्रसंगी) चालत लोक जात असत. गावात वीज नव्हती, घरं साधीच होती. मान्सूनच्या पावसाच्या तडाख्याने ती ओलीचिंब झालेली असायची. शहरातही अर्धशिक्षित मंडळी मोठ्या हुद्द्यांवर असायची नाहीत. बहुतांश लोक कापड गिरण्यांत कामगार म्हणूनच काम करीत असायचे. तुटपुंज्या पगारातून साठवलेली पुंजी घेऊन गावी जात असत.आता काळ थोडा बदलला आहे. वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्ते झालेत, वीज आली आहे, घरांना सिमेंट लागलं आहे आणि आत फरशी बसविलेली आहे. फ्रीजही आला आहे. मोबाईल टॉवरही जवळपास आहे. बहुतांश गावात रेंज येते आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर, गगनबावडा ते कणकवली आणि रत्नागिरीमार्गे परत येत असताना रस्त्यावर गाड्यांची गर्दीच गर्दी दिसत होती.

मुंबई आणि पुण्याकडून जाणाºया गाड्यांची रांगच रांग दिसत होती. रेल्वे गाड्या भरून ओसंडत होत्या. एस. टी. गाडीत कधी नव्हे ते स्टँडिंग प्रवास करणारे प्रवासी दिसत होते. प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता. चालक वगळता बाकीचे मोबाईलवरच चाळे करीत बसल्याचे दिसत होते. हा सर्व अलीकडचा बदल आहे. माणसांचा वेग वाढला, संपर्क वाढला. वाटेत धबधब्याचे छायाचित्र काढून मुंबईला मित्राला कौतुकाने पाठवून ‘पहा आमचा कोकण कसा सुंदर असा!’ असेही तो म्हणत असणार. मात्र अशा नव्या युगात आंबोली घाटात दरड कोसळल्याची खोटी माहिती देऊन लोकांचा मानसिक छळ करण्याचा अधिकार कोणी दिला? याउलट खरोखरच दरड कोसळली असती आणि मुंबई ते पुणे, सातारा, कºहाड, कोल्हापूर, निपाणीमार्गे आंबोलीकडे जाणाºया माणसाला पटापट समजले असते, तर किती बरं झालं असतं. निपाणीपासून पुण्यापर्यंत वाटेत प्रवासात असणाºयांना राधानगरीमार्गेच गाडी वळवून सिंधुदुर्ग गाठता आले असते. गोव्याला जाणाºयांना पुढे सरकता आले असते. आपण निघालेल्या मार्गात अडथळा आहे, तर तो मार्ग वेळीच बदलण्यासाठी एका मोबाईलचा उपयुक्त वापर झाला असता. अशाप्रकारे माणसाला मार्गदर्शन, मदत करण्यासाठी या नव्या तंत्राचा वापर करता येऊ शकतो. त्याऐवजी खोटी माहिती पसरवून लोकांना भयभीत करून सोडल्याने काय साध्य होते?आंबोलीत दरड कोसळली नव्हती. जो व्हिडिओ या बातमीला जोडला होता, तो आणखीन कुठला तरी खोटाच होता. तो आंबोलीच्या घाटाचा नव्हताच. लोकांनी फोनाफोनी करावी आणि त्यांचे बिल वाढावे, यासाठी कोणी केले असेल का? याचे काहीही उत्तर सापडत नाही, पण ही गुन्हेगारी स्वरूपाची विकृती निश्चित आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर माणसाबरोबरच निसर्गाच्या संवर्धनासाठी, जीवप्राण्यांच्या कल्याणासाठी केला, तर जीवन अधिक सुखकर होईल.मोबाईलचा अतिवापर करणाºयांना कॉल येतो. तुम्हाला लॉटरी लागली आहे, गाडी मिळणार आहे, पैसा मिळणार आहे. पैसा मिळणार आहे, पण त्यासाठी सात हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. खाते नंबर दिला जातो. लोक त्या खात्यावर पैसे जमा करतात. गाडी मिळत नाही, किंवा लॉटरीचे पैसे मिळत नाहीत. तेव्हा कळते की आपण फसविले गेलो आहोत. तुमच्या खिशात मोबाईल आहे, त्यावर कोणीही कॉल करतो आणि आपण विश्वास ठेवतो.

दिल्लीकडील एखाद्या बॅँकेच्या खात्यात पैसे भरुनही रिकामे होतो. हा सर्व नव्या तंत्रज्ञानाचा चमत्कार करीत फसविले जाते. त्याऐवजी आपण असले पैसे स्वीकारायचे नाहीत, ते आपल्या कष्टाचे नाहीत, फुकटचे पैसे घेणे हराम आहे, असे आपण मनाशी का नाही ठरवित? तंत्रज्ञान आले म्हणून माणुसकी किंवा सभ्यता येत नाही, तर ती अंगीकारावी लागते. समाजातील इतरांचाही सहानुभूतीने विचार करावा. गाडी कशीही चालविणार, कोठेही, हॉर्न वाजविणार, इतरांना त्रास होणार नाही, याचा तरी गणेशोत्सवासारख्या आनंदाच्या उत्सवात विचार करायला काय हरकत आहे.अन्यथा काय होईल? तथाकथित सोशल मीडिया म्हणून जो तयार झाला आहे, त्यातील ‘सोशल’ या शब्दाला काही अर्थ राहणार नाही. आपण समाज म्हणून काही बंधने पाळतो, नियम, नीतिमत्ता, मूल्ये पाळतो, ती जपतो, त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करतो. त्यावरच समाज मार्गक्रमण करीत असतो. त्याऐवजी सोशल मीडियावरील वर्तनासारखे बेजबाबदार वर्तन करू लागलो, तर समाजात अराजकता माजेल.ता. क.- हा लेख लिहित होतो तो दिवस शुक्रवारचा होता. हरयाणातील पंचकुळा परिसरात अराजकी परिस्थिती उद्भवली होती. ज्यांना गुरू मानले, त्यांच्यावर गुन्हा केल्याचा आळ घातला गेला होता, असे सिद्ध झाले नसते, तर संयमाने का होईना संताप व्यक्त करणे समजू शकलो असतो; पण ज्यांना गुरुस्थानी मानलं, त्यांनी घनघोर अपराध केला आहे, हे सिद्ध झाले. ज्या व्यवस्थेने ते सर्व ठरविले, तो निर्णयच आणि व्यवस्थाच मान्य नाही, असे मानून हिंसाचाराच्या मार्गाने संताप व्यक्त करण्याची पद्धत ही अराजकतेकडे घेऊन जाणारी आहे.