शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

स्मृतीबाई, आरोपांच्या खंडनाची कशासाठी इतकी घाई?

By admin | Updated: January 23, 2016 03:49 IST

हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात रोहित चक्रवर्ती वेमुला या दलित संशोधक विद्यार्थ्याने आत्महत्त्या केली.

सुरेश भटेवरा, (राजकीय संपादक, लोकमत)हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात रोहित चक्रवर्ती वेमुला या दलित संशोधक विद्यार्थ्याने आत्महत्त्या केली. देशभर त्याचे पडसाद उमटले. एकीकडे डॉ. आंबेडकरांची देश-परदेशातली स्मारके पुनरुज्जीवित करण्याचा धडाका महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने लावला आहे. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने संसदेत राज्यघटनेविषयी कृतज्ञता सत्राचे विशेष आयोजन करण्यात आले. तथापि हैदराबादला रोहितच्या लक्षवेधी आत्महत्त्येमुळे मात्र या साऱ्या मोहिमेवर बोळा फिरला. मोदी सरकार आणि भाजपवर दलित विरोधी सरकार अशा नव्या प्रतिमेचे या निमित्ताने प्रत्यारोपण झाले.हैदराबाद केंद्रीय विद्यापीठात रोहित वेमुला हा जीवशास्त्राचा संशोधक. विज्ञान लेखक होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. जीवनावर पे्रम करणारा रोहित आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता होता. याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर या संघटनेने हैदराबाद विद्यापीठात निदर्शने केली. अभाविपच्या कार्यकर्त्यांशी त्यांची बाचाबाची झाली. चौकशी समितीने सदर प्रकरणात रोहित व त्याच्या चार सहकाऱ्यांना सुरुवातीला निर्दाेष ठरवले, मात्र वैचारिकदृष्ट्या आंबेडकर विद्यार्थी संघटना मोदी सरकारच्या विरोधात असल्यामुळे अभाविपला ते सहन होत नव्हते. आम्हाला मान्य नसलेली भूमिका घेणाऱ्यांना अतिरेकी व देशद्रोही ठरवून धडा शिकवला जाईल, अशा गैरवाजवी अहंकारातून अभाविप व त्यांचे पाठीराखे हात धुवून रोहित व त्याच्या सहकाऱ्यांमागे लागले. स्थानिक खासदार व मंत्री बंडारू दत्तात्रेयांनी रोहित व त्याच्या संघटनेला देशद्रोही ठरवणारी तक्रार लेखी स्वरूपात स्मृती इराणींकडे केली. दत्तात्रेयांच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाने विद्यापीठावर दबाव आणणारी पत्रमालिका सुरू केली. विद्यापीठ प्रशासनाने गेल्या पाच-सात महिन्यांपासून मग त्यांचा छळ सुरू केला. सर्वप्रथम रोहितची पाठ्यवृत्ती बंद झाली. पाठोपाठ रोहितसह पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करून वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले. दैनंदिन उदरनिर्वाहाच्या संकटासह वसतिगृहाबाहेर एका तंबूत राहण्याची पाळी रोहितवर आली. या संघर्षात त्याला निराशेने ग्रासले व आत्महत्त्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत नेले, असे सांगितले जाते. हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरुअप्पा राव सुरुवातीला मंत्रालयाच्या पत्रांना दाद देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तथापि मजबुरीमुळे आपल्याला पाच जणांच्या निलंबनाचा निर्णय घ्यावा लागला, असे या घटनेनंतर अप्पा रावांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. हैदराबाद विद्यापीठात गेल्या दहा वर्षात नऊ दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्त्या केल्या. चेन्नईत काही महिन्यांपूर्वी असेच घडले. आपल्या विरोधातला विचार आणि आवाज दडपण्याची हडेलहप्पी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून तर उजव्या विचारसरणीच्या संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत.रोहितच्या आत्महत्त्येचा देशभर कोलाहल सुरू झाल्यावर बंडारू दत्तात्रेयांच्या विरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आली. अशा शोकसंतप्त वातावरणात बुधवारी स्मृती इराणींनी आपल्यावरील आरोपांचे खंडन करण्यासाठी पत्रपरिषदेला संबोधित केले. ‘हा मुद्दा दलित व गैरदलित विषयाशी संबंधित नाही. रोहितच्या आत्महत्त्येला विरोधकांनी विनाकारण जातीचा रंग चढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. रोहित दलित नव्हता तर मागासवर्गीय होता. यादव असल्यामुळे बंडारू दत्तात्रेयदेखील मागासवर्गीयच आहेत. चौकशी समितीच्या निष्कर्षांनुसार विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई नियमानुसार योग्यच होती. रोहितच्या कथित सुसाईड नोटमध्ये कोणतीही संस्था, पक्ष अथवा अधिकाऱ्यांचा उल्लेख नाही.’ असे आरोपांचे खंडन स्मृतीबार्इंनी पत्रपरिषदेत केले. बंडारू दत्तात्रेयांचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. स्मृती इराणींच्या प्रत्येक विधानाचा समाचार घेत, त्यातील विसंगती पुराव्यांसह काँग्रेस प्रवक्त्यांनी आपल्या वार्तालापात मांडल्या. रोहित आंध्रातल्या माला जातीत जन्मला आहे. राज्यघटनेनुसार ही जात दलित वर्गात मोडते. तत्कालीन आंध्र प्रदेश सरकारने रोहितला दिलेले जात प्रमाणपत्रही इराणींच्या पत्रपरिषदेनंतर लगेच सामोरे आले. रोहित दलित असल्याचाच हा सबळ पुरावा होता. इराणींच्या पत्रपरिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी हैदराबाद विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या निलंबनाचा निर्णय तात्काळ मागे घेतला. पूर्वीचा निर्णय चुकीचा होता, ही एकप्रकारे त्याची जाहीर कबुलीच होती.काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रस्तुत घटनेनंतर स्वतंत्रपणे हैदराबादला गेले. सांत्वनासाठी रोहितच्या कुटुंबीयांना भेटले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदी सरकारच्या मनोवृत्तीवर चौफेर टीकेचे प्रहार दोघांनी केले. नितीशकुमारांनीही या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदवला. देशभर संतापाची लाट उसळली आहे. हैदराबादच्या दुर्घटनेचे लंगडे समर्थन ऐकण्याच्या मन:स्थितीत सध्या कोणीही नाही. अशा संतप्त वातावरणात स्मृती इराणींनी घाईगर्दीत पत्रपरिषदेचा आटापिटा केला. चौकशी पूर्ण होण्याआधीच निष्कर्ष जाहीर केले, ते सर्वथा अयोग्य होते. काही काळ वाट पहाणे त्यापेक्षा अधिक उचित ठरले असते.स्मृती इराणी आणि त्यांच्या कामकाज पद्धतीतून उद्भवलेले वाद तसे नवे नाहीत. दिल्ली विद्यापीठाला विश्वासात न घेता, विद्यापीठाचा बहुचर्चित चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम इराणींनी यूजीसीच्या माध्यमातून रद्दबातल ठरवला. इराणींच्या आदेशानंतर त्या आदेशाचे पत्र यूजीसी अध्यक्षांनी मध्यरात्री टाइप केले होते. आयआयटी दिल्लीचे संचालक आर. शेगावकर, आयआयटी मुंबईचे संचालक व विख्यात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनीही इराणींच्या अनावश्यक हस्तक्षेपाचे कारण देतच आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षपदी इराणींनी रा.स्व. संघाशी थेट संबंध असलेले स्थानिक नेते विश्राम जामदारांची अशीच घिसाडघाईने नियुक्ती केली. मनुष्यबळ मंत्रालयाच्या प्रस्तावित आयआयएम विधेयकावरही देशातल्या प्रमुख आयआयएमचे मतभेद सामोरे आले. भाजपाच्या काही नेत्यांनी अलिगड मुस्लीम विद्यापीठ व जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठांचा अल्पसंख्य दर्जा हटवण्याच्या मागण्या जाहीरपणे सुरू केल्या आहेत. त्यानंतरही इराणींनी त्याचा प्रतिवाद करणारा खुलासा आजतागायत केलेला नाही. इराणींच्या कथित पदव्यांचा वाद भरपूर गाजला असून, सध्या तो न्यायप्रविष्ट आहे. ताज्या प्रकरणात काँग्रेसने स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रेय व विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रोहित जीवानिशी गेला. त्याच्या आत्महत्त्येचे राजकारण मात्र देशभर पेटले आहे. अशा वातावरणात केवळ नव्या आरोपांच्या खंडनासाठी अनेक वाद पूर्वीच ओढवून घेतलेल्या स्मृती इराणींनी रोहितच्या आत्महत्त्येवर भाष्य करून नेमके काय साधले?