शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

मामांच्या मळ्यावर...बारामतीला आणायचं ताळ्यावर!

By सचिन जवळकोटे | Updated: November 4, 2018 15:57 IST

आज वसुबारस. दिवाळीची सुरुवात जाहली. घरात-घरात पेटल्या पणत्या. अंगणा-अंगणात रंगल्या रांगोळ्या... पण याच दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली राजकीय नेत्यांच्या आतषबाजीला.

सचिन जवळकोटे

आज वसुबारस. दिवाळीची सुरुवात जाहली. घरात-घरात पेटल्या पणत्या. अंगणा-अंगणात रंगल्या रांगोळ्या... पण याच दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली राजकीय नेत्यांच्या आतषबाजीला. माढा लोकसभेला अकलूजकर अन् फलटणकरांच्या विरोधात येऊ लागलीय खूप मोठी फौज एकत्र. या राजनाट्याची मैफल रंगली रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत. तेही टेंभुर्णीत संजयमामांच्या मळ्यावर... त्यात ठरलं म्हणे थोरले काका बारामतीकर अन् थोरले दादा अकलूजकर यांना आणायचं ताळ्यावर.

शनिवारी दुपारी म्हसवड, फलटण, सांगला, बार्शी अन् माळशिरसच्या अलिशान गाड्या टेंभुर्णीच्या दिशेनं निघाल्या. सुरुवातीला म्हसवडमधली ‘जयाभाव’ची गाडी शिंगणापूर घाटातून खाली उतरून फलटणच्या गाडीची वाट पाहू लागली. तिकडून आली निंबाळकरांच्या ‘रणजितदादां’ची गाडी. यात होते दिगंबरही. (नेहमीप्रमाणं..)

यानंतर ‘जयाभाव’नी त्यांची गाडी स्वत: चालवत रणजितदादांशी केली माढा लोकसभेची चर्चा. रस्त्यातले खड्डे चुुकवत केली राजकीय अडथळ्यांची चर्चा. बोलत बोलत दोघे टेंभुर्णीत पोहोचले. बाकीची मंडळी यायला वेळ होता.

जलाशयातल्या बोटीत संजयमामांचं सारथ्य 

तोपर्यंत जयाभाव अन् रणजितदादांना घेऊन संजयमामा इथल्याच जलाशयावर गेले. तिथल्या त्यांच्या अलिशान अन् महागड्या बोटीत या चौघांनी मस्त सफर केली. बोटीचं सारथ्य स्वत: मामांनी केलं. दोन रथी-महारथी मागं बसले. हे पाहून अनेकांना ‘कृष्णनीती’चीही आठवण आली. ‘कुणाला कसं बुडवायचं.. कुणाला कसं पाणी पाजायचं?’ याचीही छानपैकी या सर्वांनी पाण्यावरच्या सफरीत चर्चा केली. अंधार झाला. सारे मामांच्या फार्म हाऊसवर आले. तोपर्यंत बाकीचीही मंडळी तिथं जमलेली. सांगोल्याचे शहाजीबापू, माळशिरसचे उत्तमराव अन् बार्शीचे राजाभाऊ आलेले. फक्त पंढरपूरचे प्रशांतपंत पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात अडकल्याने इच्छा असूनही येऊ शकले नाहीत.  झालं... या साऱ्यांची गुप्त मिटींग सुरू झाली. चर्चेला वेगवेगळे विषय पुरविले जाऊ लागले. सोबतीला झणझणीत रस्साही ओढला जाऊ लागला. रात्री उशिरापर्यंत खलबतं रंगली. 

‘संजूबाबां’च्या नावामुळं जयाभाव सटकलेले.. 

संजयमामा, शहाजीबापू, उत्तमराव अन् राजाभाऊंच्या डोक्यात एकच नाव भिनलेलं.. ओन्ली अकलूजकर... तर जयाभाव अन् रणजितदादांच्या डोळ्यासमोर होते केवळ फलटणकर... कारण शनिवारीच फलटणमध्ये दूध उत्पादकांच्या सोहळ्यात अनेकांनी ‘संजूबाबां’च्या नावाची माढ्यासाठी जाहीर वाच्यता केलेली. यात सोलापूर जिल्ह्यातीलही बरीच मंडळी जमलेली.

‘फलटणचे थोरले राजे विधानपरिषदेत, तर संजूबाबा म्हणे आता लोकसभेत...,’अशी व्यवस्थित जुळणी फलटण पालिकेतल्या ‘पिटूबाबां’नी केलेली. हे ऐकून फलटणचे रणजितदादा दचकलेले, तर जयाभाव सटकलेले. काहीही करून यंदा अकलूज अन् फलटणच्या मनसबदारांची घराणेशाही सत्तेपासून दूर ठेवायचीच, याचा निर्धार संजयमामांच्या फार्म हाऊसवर घेतला गेला. 

शहाजीबापू, उत्तमराव किंवा रणजितदादाच उमेदवार

माढा लोकसभेला विजयदादा असतील किंवा रणजितदादा... रामराजे असतील किंवा संजीवराजे...पण आपल्याकडून एकच खमक्या उमेदवार देण्यावर या साऱ्यांचं एकमत झालं. सुरुवातीला शहाजीबापू अन् उत्तमरावांच्या नावावर चर्चा झाली. या दोघांशिवाय फलटणच्या ‘रणजितदादां’च्या उमेदवारीवरही बरीच गणितं मांडली गेली. अखेर या तिघांपैकीच एक उमेदवार फायनल करायचं, यावर साऱ्यांचं शिक्कामोर्तब झालं. ‘या ग्रुपचा पक्ष कोणता अन् चिन्ह कोणतं.. हे मात्र शेवटच्या क्षणी ठरवू या,’ म्हणत सारे बैठकीतून उठले. रस्सा संपला, चर्चाही संपली. मामांच्या मळ्यातून बाहेर पडले. यावेळी कुणीतरी एकजण हळूच गुणगुणला, ‘मामाच्या मळ्यामंदी राजकारणाचं पाणी वाहतं...घड्याळ्याचे काटे मोडायला नवा गट फुलतो!’

(लेखक ‘सोलापूर लोकमत’चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Baramatiबारामती