शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सीमोल्लंघनातील शुक्राचार्य.!

By admin | Updated: October 4, 2014 01:07 IST

‘सामाजिक न्यायाचे भारतीय प्रणोते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (1891-1956) या वास्तूमध्ये 1921-22 या काळात राहात होते.

‘सामाजिक न्यायाचे भारतीय प्रणोते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (1891-1956) या वास्तूमध्ये 1921-22 या काळात राहात होते. भारतात जेव्हा अस्पृश्यता होती आणि तिथे ब्रिटिशांचे शासन होते, तेव्हा या व्यवस्थेचे निर्दालन करण्यासाठी इथे                डॉ. आंबेडकरांनी अभ्यास केला. आमचे नमन..!’
अशी पाटी इंग्लिश पुरातत्त्व विभागाने मान्य केलेल्या लंडनच्या 1क्, किंग हेन्री मार्गावरील या डौलदार वास्तूवर बसविली आहे. त्या ऐतिहासिक वास्तूच्या भारतीय मालकीचा लढा सध्या सुरू आहे. अब्जावधींचे आर्थिक घोळ ज्या देशात सहज पचवले गेले, तिथे निव्वळ चाळीस कोटी रुपयांत ही पवित्र वास्तू खरेदी करण्यासाठी कागदी पतंग उडत आहेत आणि निवडणुकीच्या फुटकळ राजकारणात चुरचुर झालेल्या महाराष्ट्रातील दलित नेत्यांना हल्ली महामानवांच्या कर्तृत्वाचाही विसर पडू लागल्याचे दिसू लागले आहे.
ज्या महामानवाने जगाला ‘माणूस’ या शब्दाची ओळख करून दिली, ज्याने गावकुसाबाहेरील माणसांना मानाचे ताट वाढून देण्याची किमया घडविली, त्याला ही नेतेमंडळी राजकारणाची पोळी भाजण्यासाठी विसरत चालल्याचे दिसून येते. बाहेरची माणसे आपल्याला आंबेडकरांचे मोठेपण सांगतात, तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील घराबाबतही असेच होत आहे. डॉ. आंबेडकर हे 1921-22 दरम्यान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना ते 1क्, किंग हेन्री रोड, लंडन येथे राहत होते. ही वास्तू ऐतिहासिक ठेवा असल्याने तिचे स्मारक म्हणून जतन करण्यासाठी ब्रिटनच्या फेडरेशन ऑफ आंबेडकर्स अॅण्ड बुद्धिस्ट ऑर्गनायङोशनने (फोबो) महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाकडे एक प्रस्ताव दिला. तो राज्य सरकारने स्वीकारला, आणि सुमारे चाळीस कोटी रुपयांत (4 मिलियन पौंड) ही ऐतिहासिक वास्तू सरकारला देण्यास या इमारतीचा मालक तयार झाला. परदेशी वास्तू खरेदी करण्यासाठी केंद्राची परवानगी लागते, त्यासाठी राज्याने केंद्राला पत्र दिले, आणि मुंबईतील ब्रिटनच्या उच्चयुक्तांनाही ते दिले गेले. सप्टेंबरच्या प्रारंभातील ही पत्रोपत्री सुरू असतानाच नितीन राऊत या तत्कालीन मंत्र्यांनी ‘आंबेडकरांचे लंडन येथील घर सरकार विकत घेत आहे.’ अशी हाकाटी पिटून श्रेयाची पहिली लढाई जिंकली. डोळ्यांसमोर राज्यातील निवडणुका आहेत, तिच्याशी या घटनेचा संबंध जोडू नका असे सांगण्यास ते विसरले नाहीत. पण मुळात राऊत बोलले तेव्हा कशातच काही नव्हते! सरकारी पत्रव्यवहारही पुढे सरकला नव्हता. जो काय पुढाकार होता, तो लंडन फोबोने घेतला होता. सरकारचे डोळे फोबोने उघडून मध्यस्थाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळेच पैशाची चणचण असूनही तो मालक दोन महिन्यांची मुदत देऊन थांबण्यास तयार झाला. पण महिना उलटूनही या ऐतिहासिक वास्तूच्या खरेदीसाठी ना राज्य हलले नाही केंद्र!! शंभर दिवसांची आरती जोराजोरात म्हणत असताना केंद्र सरकारचा राज्याशी व्यवहार व समन्वय गतिमान नाही, याचे भांडे फुटले. महिनाभरात प्रस्ताव जैसे थे असल्याने फोबोने राज्य सरकारशी संपर्क केला, तर इकडे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने कोणताच निर्णय होऊ शकणार नाही असे सांगून प्रशासनाने काखा वर केल्या. अशा कोलाटउडय़ांनी मध्यस्थ असलेल्या फोबोचा श्वास गुदमरला नसेल तरच नवल! तिकडे मालक व्यवहाराची घाई करू लागला. त्याने इस्टेट एजंट नेमून मिळेल त्या किमतीत (3.1 मिलियन) वास्तू विकण्याची तयारी सुरू केली. ही घडामोड एजंटने अधिकृतपणो फोबोला कळवली, आणि सारेच पर्याय संपल्यावर अखेर फोबोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 23 सप्टेंबरला पत्र देऊन सारा घटनाक्रम कळवून लक्ष घालण्याची विनंती केली. केंद्र व राज्य यांच्यात आता पत्रोपत्री सुरू झाली. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट असली तरी, निवडणुकीमुळे खापरासाठी डोकेही शोधले जाईल. डॉ. आंबेडकरांचे वारस प्रकाश आंबेडकर, आंबेडकरांच्या नावावरच राजकीय हयात घालविलेले रा. सू. गवई, त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई, राज्यसभा सदस्य रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे सारेच या मुद्द्यावर गप्पगार आहेत. आरंभशुरी घोषणा करून डॉ. नितीन राऊतही आता निवडणुकीत मग्न झाले. कंठशोष करणारे आंबेडकरी विचारवंतही काही बोलत नाहीत. गेलेत कुठे सारे? ते सध्या विविध पक्षांच्या कुबडय़ा घेऊन मतांच्या चाचपणीत व नंतरच्या खुर्चीसाठी व्यस्त आहेत. लंडनच्या त्या वास्तूमध्ये बाबासाहेबांचे स्मारक होईल व भारतातून तिथे जाणा:या होतकरू विद्याथ्र्याना आश्रय दिला जाईल. फोबोने आपण काय करू शकतो, त्या योजनाही पंतप्रधानांना कळविल्या आहेत. पण सध्या तरी हे सीमोल्लंघन शुक्राचार्यानी अडविले आहे. हे घर मिळवायचेच या ध्यासाने राजकारण बाजूला ठेवून सा:यांनी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा, बाबासाहेबांच्या सा:या लेकरांचा हा करंटेपणा ठरेल.
बकुळीच्या झाडाखालील सूर
 महाराष्ट्र सदनाच्या डेरेदार बकुळीच्या झाडाखाली गजलनवाज भीमराव पांचाळे यांची मैफल रंगली. मराठी, हिंदी व उर्दूचे शब्द नक्षत्र राजधानीच्या आकाशात बहरले. पस्तीस वर्षाच्या गायकीच्या काळात दोन वेळाच व आताही आठ वर्षाच्या मध्यंतरानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या निमंत्रणावरून पांचाळे आले होते. भाषा या केवळ संवादासाठी असतात, त्या विसंवाद कधीच निर्माण करत नाहीत. माणसे विसंवादाचे कारण ठरतात. नवरी, लग्न आणि गरीबी, महागाई हे सारे चटका लावणारे विषय आणि तळागाळातील लोकांचे जगणो काव्यात येत नसेल तर आधुनिक काव्याचा उपयोग काय, हा या मैफलीतील आशय समृद्ध करणारा होता. रसिक दिल्लीकरांसह बकुळीची फुले त्यांच्या अविट शब्दांना अलगद दाद देत होती. रात्रीचा समय वातावरणाची दस्तक देत होता. दिवसभर ऑक्टोबर हिटची झाक असली तरी सायंकाळनंतर दिल्लीवर गारव्याची तटबंदी होते. पांचाळेंनी हेही शब्दांतून मांडले आणि त्यातून अलवार दिल्लीची नजाकतही सहज समोर आली..
थंडी हवाँ के झोकें, चलतें है हलके हलके
ऐसे में दिल ना तोडो, वादे करो ना कलके
क्या शहर है तुम्हारा, बहुरूपीयों की नगरी
मिलते है लोग अक्सर, चेहरे बदल बदल कें..
नक्कीच, दिल्ली यापेक्षा वेगळी नाही !
 
 रघुनाथ पांडे
विशेष प्रतिनिधी, 
लोकमत समूह, नवी दिल्ली