शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

पशुपक्ष्यांना फटका!

By admin | Updated: December 21, 2014 00:23 IST

जसा फटका जमिनीला, पिकाला आणि शेतकरी वर्गाला बसतो, तसाच किंवा तेवढाच गारपिटीचा फटका पशुपक्ष्यांनाही बसतो.

वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात दरवर्षी गारपीट होते आहे. त्याचा जसा फटका जमिनीला, पिकाला आणि शेतकरी वर्गाला बसतो, तसाच किंवा तेवढाच गारपिटीचा फटका पशुपक्ष्यांनाही बसतो. दुर्दैवाने गारपिटीमध्ये ज्यांना स्वत:चे संरक्षण करता येत नाही, अशा पशुपक्ष्यांचा मृत्यू होतो आहे.रपीट होण्यापूर्वी वातावरणात बदल होत असतात. हे बदल काही प्रमाणात पशुपक्षी, किटक, सरपटणारे जीव यांना कळत असतात. कालांतराने पशू गुहेचा आसरा घेतात आणि सरपटणारे जीव बिळांचा आसरा घेतात. शिवाय काही पक्षी वातावरणातील बदल लक्षात येताच संबंधित ठिकाणांहून उडून जातात. परंतु जे पक्षी झाडांवर घरटी करून राहतात. उदा. बगळे, कावळे, मैना, पोपट आणि करकोचा अशा पक्ष्यांचा गारपिटीच्या फटक्याने मृत्यू होतो. कारण हे पक्षी घरट्यातील अंडी, आपली पिल्ले यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. तर काही पक्षी शेकडोच्या संख्येने झाडावरच रात्र काढतात. अशावेळी या गारपिटीचा त्यांना देखील वाईट फटका बसतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत स्थलांतरित पक्षी आपल्याकडे येत असतात. हजारो मैलांचा प्रवास करून हे पक्षी आपल्याकडे दाखल होत असतात. एवढ्या मोठ्या प्रवासाने ते थकलेले आणि भुकेलेले असतात. या पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणपक्ष्यांचा समावेश असतो. याच काळात ते विश्रांतीसाठी एखाद्या तलावात उतरले आणि रात्रीच्या वेळेस गारपीट झाली तर त्यांना गारांच्या माऱ्यामुळे उडता येत नाही. वातावरणातील बदलाचा परिणाम सहन न झाल्याने काही कीटकांच्या प्रजातींचा अंत होतो. काही फुलपाखरे सुद्धा अशा बदलत्या वातावरणात तग धरू शकत नाहीत. गारपिटीचा परिणाम जसा मनुष्य प्राण्यावर होतो तसा तो पशुपक्ष्यांवर आणि जैविक विविधतेवरही होत असतो.(लेखक निसर्गमित्र आहेत.)विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात फेब्रुवारी ते मे २०१४ दरम्यान गारपीट झाली. या गारपिटीमुळे पशुपक्ष्यांनाही जीव गमवावा लागला. विविध प्रकारच्या २६ पक्ष्यांच्या प्रजाती आणि ९ प्रकारच्या सस्तन प्राण्यांना या गारपिटीचा फटका बसला, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अहवालात नमूद करण्यात आले. या गारपिटीच्या तडाख्यात ६५ हजारांपेक्षा अधिक पक्षी आणि शेकडो सस्तन प्राण्यांचा मृत्यू झाला. अनेक पक्षी जखमी झाले गारांचा आकार १-२ इंच इतका होता. मैना, चिमण्या, पोपट या पक्ष्यांच्या मृत्यूची संख्या अधिक होती. मोकळ्या जागेत राहणाऱ्या भारतीय प्रकारच्या काळविटांचाही गारपिटीने मृत्यू झाल्याची नोंद अहवालात आहे. मानवी वास्तव्याच्या परिसरात आढळणाऱ्या मैना, घुबड यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. कोकिळा, बुलबुल, बगळा आणि मधमाशा यांच्या मृत्यूची संख्या मोठी आहे.- विजय अवसरे