शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘शिवशाही’ची बाजारगाडी होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:31 IST

परिवहन महामंडळात ४६० शिवशाही बस दाखल होणार आहेत. त्यासाठी महामंडळाने १७५ कोटी रुपये खर्चाची तयारी केली आहे.

परिवहन महामंडळात ४६० शिवशाही बस दाखल होणार आहेत. त्यासाठी महामंडळाने १७५ कोटी रुपये खर्चाची तयारी केली आहे. महामंडळाने बसची गुणवत्ता तसेच सेवा आणि वाजवी तिकीट दर याचा मेळ बसवला तर शिवशाही महामंडळाला उर्जितावस्था आणू शकते पण याचा मेळ बसवला नाही तर शिवशाहीची अवस्थाही हिरकणीसारखी होऊन ती बाजारगाडी होऊ शकते.राज्य परिवहन महामंडळाने शिवनेरी बसचा प्रयोग करून पाहिला पण तो फसल्यानंतर आता शिवशाही बस आणली असून, ती बºयापैकी परवडणारी व आरामदायी आहे. केवळ लालपरीच्या पलीकडे न जाणाºया राज्य परिवहन महामंडळाला १९८२ साली मिळालेल्या एशियाड बसनंतर परिवहन महामंडळाने आरामदायी सेवा देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या बसेसनाही चांगला प्रतिसाद मिळाला. पण कालांतराने मोडकळीस आलेल्या बसचा केवळ रंगच आरामदायी राहिला. तरीही त्याच गाड्या आरामदायी गाड्या म्हणून प्रवाशांकडून आरामदायीचे भाडे घेतले जाऊ लागले. तेव्हा प्रवाशांनी अशा आरामदायीकडे पाठ फिरवली. मग त्यांचा लाल रंग करण्यात आला आणि कालांतराने त्या गाड्या खेडेगावात बाजारगाड्या म्हणून धावू लागल्या. आजही त्या गाड्या काही ठिकाणी धावत असून त्यांच्या सीट आरामदायी आहेत. त्यानंतर महामंडळाने कोकणातील एका खासगी कंपनीकडून हिरकणी गाड्या बांधून घेतल्या. त्या गाड्या तर अक्षरश: पाच वर्षांतच बाजारगाडीपेक्षा कुचकामी निघाल्या. १९८२ साली महामंडळाला मिळालेल्या गाड्यांचा सांगाडा दणकट आणि सीट आजही आरामदायी वाटतात. पण हिरकणी गाड्यामधून प्रवास करताना प्रवाशांना कधीच आराम वाटला नाही. अगदी दगडावर बसून प्रवास केल्यासारखे वाटते. रात्रीच्या वेळी या गाडीतून प्रवासी डोके टेकवून न झोपता खांदा टेकून झोपतात. त्यामुळे या गाड्यांकडे प्रवाशांनी अक्षरश: पाठ फिरवली. हिरकणीच्या तुलनेत आता महामंडळाने शिवशाही ही खºया अर्थाने आरामदायी आणि वातानुकूलित बस आणली आहे. राज्यात ज्या मार्गावर ही बस धावते आहे तिला बºयापैकी उत्पन्न मिळत आहे. खासगीच्या आणि हिरकणीच्या तुलनेत तिचे तिकीट दरही परवडणारे आहेत. हीच सेवा हेच तिकीट दर कायम ठेवले तर प्रवासी तिच्यापासून दूर जाणार नाहीत. एशियाड गाडीने मिळवलेली प्रतिष्ठा हिरकणीने इतकी घालवली की एशियाड बाजारगाडी झाली तरी तिची सीट आरामदायी होती पण हिरकणीची नवीन आसनेही आरामदायी वाटली नाहीत. यापुढे हिरकणी बस बनवताना परिवहन महामंडळाचे अधिकारी व आरटीओचे अधिकारी यांना त्या गाडीतून रात्री २५० किलोमीटर प्रवास करण्याची सक्ती करावी म्हणजे आरामदायी कशाला म्हणतात ते कळेल. आता महामंडळात ४६० शिवशाही बस दाखल होणार आहेत. पण त्या खासगी कंपनीकडून बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी महामंडळाने १७५ कोटी रुपये खर्चाची तयारी केली आहे. महामंडळाने बसची गुणवत्ता तसेच सेवा आणि वाजवी तिकीट दर याचा मेळ बसवला तर शिवशाही महामंडळाला उर्जितावस्था आणू शकते पण याचा मेळ बसवला नाही तर शिवशाहीची अवस्थाही हिरकणीसारखी होऊन ती बाजारगाडी होऊ शकते. तसे झाले तर लालपरीला मान वर करणे अवघड होऊन बसेल.