शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

शेवग्याचं झाड आणि म्हातारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:54 IST

​​​​​​​दादासाहेब मोठे गोष्टीवेल्हाळ. सतत गोष्टी सांगण्याचा त्यांना शौक. आजही ते असेच मावशीकडे आले.

- अतुल कुलकर्णीदादासाहेब मोठे गोष्टीवेल्हाळ. सतत गोष्टी सांगण्याचा त्यांना शौक. आजही ते असेच मावशीकडे आले. म्हातारी दिसली की तिला म्हणाले, चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हातारीला पण काम नव्हते. ती म्हणाली सांगा आणि दादासाहेब सुरू झाले. एका गावात एक सुखी कुटुंब राहत होते. सगळे भाऊ-बहीण गुण्यागोविंदाने नांदत होते. त्या घरात एकेदिवशी एक साधू आला. त्याने घरात दोन-चार दिवस मुक्काम केला. घरातले कर्ते पुरुष सकाळी उठायचे. परसबागेत शेवग्याच्या शेंगाचे झाड होते. घरातल्या तरुणांचा एकच कार्यक्रम असे. सकाळी उठून झाडाजवळ जायचे. शेंगा तोडायचे. बाजारात नेऊन शेंगा विकायच्या आणि येणाऱ्या पैशात घरचं सामानसुमान घेऊन ते परत यायचे. ते पाहून साधूने त्या तरुणाला विचारले...बाबारे हे किती दिवस चालूयं?- अनेक वर्षांपासून चालूयं.पण तुम्हाला दुसरं नवीन काही करावं असं वाटत नाही का? किती दिवस याच झाडाच्या शेंगा तोडत आयुष्य काढणार? त्यावर त्या तरुणाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तो म्हणाला, चालूयं. आता तर माझा मुलगादेखील याच झाडाच्या शेंगा तोडायला मदत करतो आणि तो पण माझ्यासोबत बाजारात येतो. तोही या झाडावरच गुजराण करतो. साधू काही बोलला नाही. रात्री सगळे झोपल्यावर साधूने शेवग्याच्या झाडाखाली अ‍ॅसिड टाकले. झाड उभ्या उभ्या जळून गेले. सकाळी सगळे उठले. शेंगा तोडायला गेले तर झाडं कोसळले. होत्या तेवढ्या शेंगा सगळ्यांनी तोडून घेतल्या आणि दुसºया दिवसापासून सगळे काम शोधायला लागले. कुणी कुठे तर कुणी कुठे काम शोधू लागले. कालांतराने तोच साधू पुन्हा त्या गावात आला. तरुणांनी त्या साधूला ओळखले. प्रेमाने घरी नेले आणि सांगितले, तुम्ही झाड तोडले म्हणून आम्ही हातपाय हलवू शकलो. नाही तर आम्ही आहे त्याच ठिकाणी राहिलो असतो...तात्पर्य काय माहिती आहे का म्हातारे... असं म्हणत दादासाहेब म्हणाले, म्हातारे, कलियुगातही असचं आहे. साचलेल्या संचितावर किती दिवस काढायचे...? कधी ना कधी साचलेले धन संपते, जमा केलेले पाणी संपते... मात्र वाहते पाणी आणि सतत येणारे धन कधी संपत नाही. हे त्यांना कळाले नाही म्हणून त्या साधूने ते झाडंच तोडून टाकले. पण झाड तोडणं हा काही उपाय नाही ना म्हातारे... तूच सांग बरं...त्यावर म्हातारी हसली आणि म्हणाली, गोष्ट चांगली, तात्पर्यही चांगले पण आपल्याकडे कोणत्या राजकीय पक्षाला हे लागू होते सांग बरं... दादासाहेब हसले आणि म्हणाले, तूच सांग... त्यावर म्हातारी हसत हसत म्हणाली, काँग्रेसला लागू होते का रे ही गोष्ट...? त्यांच्या पक्षातले लोकही असेच भारी. नवीन काही करायचे नाही, त्यांना वाटते अजूनही लोक हातावरच ठप्पा मारतात. म्हणून ते दुसरं काही नवीन करण्याची इच्छाच ठेवत नाहीत. जे आहेत तेही आपापसात एकमेकांना कसं कोंडीत पकडता येईल त्याच कामावर असतात... म्हणून विचारते... त्यावर दादासाहेब म्हणाले, म्हातारे, ही गोष्ट राष्टÑवादी पक्षाला लागू होते की नाही...? तेही तसेच असं नाही वाटत... त्यावर म्हातारी म्हणाली, मी काय बोलणार...? काही लोकांना स्वत:च झाड आहे असं वाटतं....

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस