शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहा मास्तरांचा तीन दिवसांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 00:55 IST

क्लास शांततेत सुरू आहे की नाही, मुले शिकवण्याकडे किती लक्ष देतात आणि मुख्य म्हणे शिक्षक चांगले शिकवत आहेत की नाही, हे बघण्यासाठी हेडमास्तर नेहमीच शाळेचा राऊंड घेत असतात

क्लास शांततेत सुरू आहे की नाही, मुले शिकवण्याकडे किती लक्ष देतात आणि मुख्य म्हणे शिक्षक चांगले शिकवत आहेत की नाही, हे बघण्यासाठी हेडमास्तर नेहमीच शाळेचा राऊंड घेत असतात. ते खिडकीबाहेर दिसले तरी मुले लगेच शिकण्यात मग्न असल्याचे भाव चेहऱ्यावर आणतात. हेडमास्तर निघून गेले की चुळबुळ, गोंधळ सुरू होतो. पण हेडमास्तर स्वत: क्लास घ्यायला येणार असतील तर? जाम टेन्शन येतं. असेच टेन्शन गेले तीन दिवस भाजपाच्या नेत्यांनी अनुभवले. हेडमास्तरी खाक्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचा तीन दिवसांचा क्लास घेतला. क्लास टीचर देवेंद्र फडणवीस यांच्या शिकवण्यावर (कारभारावर) त्यांनी पूर्ण समाधान व्यक्त तर केलेच, शिवाय त्यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही सांगून टाकले. भाजपा श्रेष्ठी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यावरून स्पष्ट झालं. शेतकरी आंदोलन नीट हाताळले नाही, तुरीच्या मुद्यावर सरकारची पंचाईत झाली असे ‘फीलर्स’ दिल्लीत गेले काही दिवस पाठविले जात होते. त्यामागे फडणवीस यांना हटवून अन्य कुणाला मुख्यमंत्री करा, हा उद्देश नव्हता. कारण सहावा मजला आपल्यासाठी दूर आहे, याची जाणीव भाजपातील सर्वांनाच आहे. पण गेल्या काही महिन्यांतील अशांत वातावरणासाठी फडणवीस यांना लक्ष्य करावे आणि त्यानिमित्ताने श्रेष्ठींच्या दरबारी त्यांना किमान नजर तरी लागावी, असा उद्देश होता. शहा यांनी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे मुंबई भेटीत बिनदिक्कतपणे सांगत सर्वच शक्यतांवर पडदा टाकला. मुख्यमंत्री हे इतर मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत. सर्व ठिकाणी फक्त त्यांचेच फोटो असतात, अशा कुरबुरीदेखील दोन मंत्री दबलेल्या आवाजात करीत असतात. मात्र, फडणवीस यांचे टीम वर्क अतिशय चांगले आहे आणि ते सगळ्यांना घेऊन राज्याचा कारभार करीत असल्याचं प्रमाणपत्रही शहा यांनी देऊन फडणवीस यांना शाबासकी दिली. करडी नजर आणि शिस्तीच्या त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुणाची प्रशंसा करणे, हे दुरापास्तच असल्याचे भाजपाचे नेते सांगतात. या पार्श्वभूमीवर शहांनी केलेलं कौतुक महत्त्वाचे ठरते. राज्यात मध्यावधी निवडणुकीला आम्ही तयार असल्याचे विधान शहांच्या मुंबई भेटीच्या एक दिवस आधी करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती. तथापि, मध्यावधी होणार नाही, फडणवीस सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे अमित शहांनी त्याच्या तिसऱ्याच दिवशी सांगून टाकले. भाजपाशिवाय मध्यावधी निवडणूक आज कोणत्याही पक्षाला आर्थिकदृष्ट्या सोसणार नाही. आता मध्यावधीची खुमखुमी असलेले शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष उद्या खरेच निवडणूक लागली तर अर्धे रिकामे झालेले दिसतील, हे लिहून ठेवा. एकदाची मध्यावधी निवडणूक घेऊनच टाकावी आणि पूर्ण बहुमत मिळवून शिवसेनेची साथ सोडावी, असे भाजपातील काही नेत्यांच्या मनात आहे. मात्र, मध्यंतरी संघर्ष यात्रेच्या प्रवासात एकमेकांच्या जवळ आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनी उद्या मॅडम वा साहेब काहीही म्हणोत यापुढे विधानसभेची निवडणूक युती करूनच लढवायची, असे ठरवून टाकले आहे. उद्या मध्यावधी झालीच तर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढतील. भाजपाने सर्वच मतदारसंघांमध्ये ताकद वाढविण्याची भूमिका घेतलेली आहे. याचा अर्थ शिवसेनेशी युती करण्याचा भाजपाचा मूड नाही. १२२ जागा जिंकलेल्या भाजपाला जागावाटपात शिवसेनेपेक्षा कमी वाटा कदापिही मान्य होणार नाही. शिवसेना लहान भाऊ होणे मान्य करणार नाही. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीची शक्यता नाही. म्हणजे हे दोघे एकमेकांविरुद्ध लढतील आणि त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे लढतील. या दोघांचे एकत्र येणे अपरिहार्य असले तरी त्याचा मोठा फटका भाजपाला बसेल. त्यामुळे आज हा पक्षदेखील मध्यावधीच्या मूडमध्ये नाही. निवडणूक कोणालाही नको आहे, असा त्याचा अर्थ आहे. - यदु जोशी