शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

आभासांच्या सावल्या

By admin | Updated: March 11, 2015 22:47 IST

सूर्य उगवला असे आपण म्हणतो. पण सूर्य आहे तिथेच असतो, प्रत्यक्षात पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण झालेली असते. आपण भ्रामक विश्वात कसे जगत असतो

प्रल्हाद जाधव -

सूर्य उगवला असे आपण म्हणतो. पण सूर्य आहे तिथेच असतो, प्रत्यक्षात पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण झालेली असते. आपण भ्रामक विश्वात कसे जगत असतो त्याचे हे एक बोलके उदाहरण. आपल्याला जे कळते तेच सत्य असे मानून आपण जगायला लागतो आणि सत्याच्या अशा सोईस्कर व्याख्या करत पुढचे सगळे जगणे आपल्या मनासारखे करून टाकतो. एखाद्या वस्तूची चौथी मिती किंवा आठवा रंग आपल्याला दिसत नाही तो माणसाच्या या उतावळेपणामुळेच.माणसाच्या आकलनाला अनेक मर्यादा असतात. तो अनेक भ्रम निर्माण करतो आणि त्या भ्रामक विश्वात मला सारे काही कळते या अज्ञानात जगत राहतो. त्याच्या या अज्ञानाचे कौतुक करणारी माणसेही आजूबाजूला खूप असतात. एकमेकांचा अहंकार कुरवाळत आणि अज्ञानालाच ज्ञान मानत ती जगत असतात. उंटाने गाढवाला म्हणायचे तुझा आवाज किती सुरेल आहे आणि गाढवाने उंटाला तू किती देखणा आहेस असे म्हणत जगत असतात. यशाच्या, सुखाच्या, ज्ञानाच्या सोईस्कर व्याख्या तयार करून जगता जगता अशी माणसं या अज्ञानातच मरूनही जातात.परस्पर प्रशंसेचा हा स्तर हल्ली वेगाने घसरू लागला आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आभासाच्या सावल्या इतक्या लांब पडू लागल्या आहेत की खऱ्या साक्षात्काराचा सूर्य कधी उगवणार हा यक्षप्रश्न ठरला आहे.आपले अज्ञान किती मोठे आहे, याची जाणीव झाली तर त्या क्षणापासून ज्ञानाच्या खऱ्या प्रकाशाकडे, जाण्याचा दरवाजा थोडा किलकिला होऊ शकतो. अज्ञानाच्या आसपास ज्ञान व्हावे असे तुकारामांनी म्हटले आहे ते काही उगीच नाही. शिवसूत्रामधले पहिले सूत्र ज्ञानं बंध: असे आहे. आपले जे काही ज्ञान आहे तीच आपल्या या सृष्टीच्या आकलनातील पहिली अडचण आहे असे सूत्रकारांनी म्हटले आहे. सिद्ध झालेल्या प्रत्येक फॉर्म्युल्याविषयी आपण साशंक असले पाहिजे असे आईनस्टाईनने म्हटले आहे. हा सूर पकडून जगाच्या कानाकोपऱ्यात आजही अनेक माणसं सन्यस्तवत्तीनं काम करत असतात. पण आभासांच्या सार्वत्रिक मळभानं त्यांचं तेज झाकोळून गेलं आहे. नावानिशी बातमी प्रसिद्ध व्हावी, वृत्तपत्रात आपला फोटो यावा, वाहिन्यांवर मुलाखती प्रसारित व्हाव्या, मोक्याच्या जागी आपली वर्णी लागावी, रोज नवंनवं व्यासपीठ मिळावं म्हणून धडपडणारी आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाणारी माणसं बघितली की ओकारी आल्यासारखं वाटतं. अशा पोटार्थी कलावंत-विचारवंतांच्या कळपांपासून या जगाला कोण वाचवणार?