शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बाभळीचे सरकारी काटे

By admin | Updated: August 24, 2016 06:40 IST

जायकवाडीच्या वरच्या भागात चार मोठे, २५ मध्यम व पाच हजारांवर लघुप्रकल्प आहेत़

ज्या बाभळी बंधाऱ्याचा लढा गाजला, त्याची उपयोगिता आजही शून्य आहे़ एकीकडे जायकवाडीच्या वरच्या भागात चार मोठे, २५ मध्यम व पाच हजारांवर लघुप्रकल्प आहेत़ परिणामी पूर आल्याशिवाय जायकवाडीत, खालच्या भागात पाणी येत नाही़ मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, समन्यायी पाणीवाटप हा संदर्भ देत भाषणे होतात़ चर्चा होते़ सरकार मराठवाडा-विदर्भाच्या हक्कावर संवेदनशील असल्याचे सांगते़ विरोधक त्यांना असंवेदनशील म्हणतात़ आरोप-प्रत्यारोप होत राहातात़ प्रश्न मात्र ‘जैसे थे़’ अशातच दोन राज्यांत वाद उद्भवलेल्या बाभळी बंधाऱ्याच्या उपयोगितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ बाभळीचे दरवाजे २९ आॅक्टोबरपर्यंत उघडे ठेवावे लागणार आहेत़ परिणामी पाऊस आला आणि गेला हीच स्थिती कायम राहाणार आहे़ या पार्श्वभूमीवर बाभळी बंधारा कृती समिती पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असली तरी सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत तेलंगणामध्ये असलेल्या पोचमपाडा धरणाच्या पाणी पसार क्षेत्रात (बॅकवॉटर) बाभळी बंधारा आहे़ पोचमपाडाचे ३२ किलोमीटर इतके पाणी पसार क्षेत्र महाराष्ट्राच्या हद्दीत आहे़ त्याला दोन्ही राज्यांची सहमती होती़ दरम्यान, याच क्षेत्रात उभारण्यात आलेल्या बाभळी बंधाऱ्याला तेलगू देसम पार्टीने कडाडून विरोध केला़ तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आंदोलन देशभर गाजले़ मुळात पाणी पसार क्षेत्राला महाराष्ट्राने मान्यता दिली असली तरी तिथे कुठलाही प्रकल्प उभारायचा नाही, अशी अट नव्हती़ एकीकडे ११२ टीएमसीचे पोचमपाडा आणि दुसरीकडे केवळ पावणे तीन टीएमसीचा बाभळी प्रकल्प असताना महाराष्ट्रातील प्रकल्पामुळे पोचमपाडा कोरडे पडेल, अशी हास्यास्पद आवई उठवण्यात आली होती़ पण ती कायद्यापुढे टिकली नाही़ सर्वोच्च न्यायालयाने बंधारा उभारणीला मान्यता दिली़, परंतु ती देत असताना जाचक अटी काट्यासह बाभळीला चिकटून आल्या़ मान्सून उत्तर बंधारा असल्याने २९ आॅक्टोबरपर्यंत दरवाजे बंद करता येणार नाहीत़ त्यानंतरही प्रकल्पात साचलेले ०़६० टीएमसी पाणी तेलंगणात सोडून द्यायचे़ परिणामी आॅक्टोबरनंतर पाऊसमान किती होणार आणि किती पाणी प्रकल्पात राहाणार हा प्रश्न कायम राहिला़ सामाजिक कार्यकर्ते डॉ़बालाजी कोंपलवार यांनी व कृती समितीने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन मिळविलेले यश यापुढे राज्य सरकारच्या भूमिकेवरच टिकणार आहे़ पर्जन्यमान किती आहे, प्रत्यक्ष साठा किती उपलब्ध आहे हे पाहूनच दरवाजे उघडण्याची तारीख ठरवली पाहिजे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे़ बंधारा कृती समितीने सरकारने लवकर निर्णय नाही घेतला तर महिनाभरात स्वत:च न्यायालयात जाण्याचा निर्धार केला आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा यापूर्वी एक फायदा झाला, तो म्हणजे बाभळीच्या अलीकडील भागात दीड टीएमसीच्या बळेगाव बंधाऱ्याचे दरवाजे बंद वा उघडण्याचे कसलेही बंधन नाही़ तेथून उजव्या बाजूने कोलंबी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होत आहे़ मात्र डाव्या बाजूच्या शेतकऱ्यांना अजूनही लाभ नाही़ गाजलेल्या बाभळीचीही उपयोगिता शून्य आहे़ एकीकडे जायकवाडीच्या वरच्या भागात चार मोठे, २५ मध्यम तर पाच हजारांवर लघु प्रकल्प आहेत़ परिणामी पूर आल्याशिवाय जायकवाडीत पाणी येत नाही़ जायकवाडी ते बाभळीपर्यंत मोजकेच प्रकल्प आहेत़ तेही नियम व अटीत अडकलेले़ गोदावरी पाणीवाटप लवादाने मराठवाड्याच्या हक्काचे दिलेले ६० टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने उपलब्ध होत नाही़ मराठवाडा पिण्यासाठी पाणी मागतो आहे़ त्यासाठी अडथळ्यांची शर्यत आहे़ दोन राज्यांतील वाद न्यायालयात उभे राहिले व काहीअंशी मिटले़ मात्र राज्यातच पाण्याचे परिवहन अन्यायकारकरीत्या होते़ लवाद, जलसिंचन आयोगाचे निर्देश इतकेच नव्हे, मराठवाड्याच्या नैसर्गिक न्यायालाही दाद मिळत नाही़ शेवटी बाभळीलाही सरकारी काट्यांनीच जखडले आहे़़ - धर्मराज हल्लाळे