शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विज्ञान आणि तंत्रज्ञानात रमलेला खेळीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:09 IST

पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर, १९२६ रोजी जन्मलेले प्रा. यश पाल वयाची नव्वदी पार केल्यानंतर गेले. प्रा. यश पाल परिपूर्ण जीवन जगलेले, सर्वांना प्रिय असलेले, उमदे व्यक्तिमत्त्व. जबलपूरहून पाकिस्तानच्या फैझलाबादमधील लैलापुराच्या कॉलेजात इंटर सायन्स (आताची बारावी) करायला आले होते.

अ. पां. देशपांडेपाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर, १९२६ रोजी जन्मलेले प्रा. यश पाल वयाची नव्वदी पार केल्यानंतर गेले. प्रा. यश पाल परिपूर्ण जीवन जगलेले, सर्वांना प्रिय असलेले, उमदे व्यक्तिमत्त्व. जबलपूरहून पाकिस्तानच्या फैझलाबादमधील लैलापुराच्या कॉलेजात इंटर सायन्स (आताची बारावी) करायला आले होते. नंतर लाहोरच्या सरकारी कॉलेजातून त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला, पण दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेकांना पाकिस्तान सोडून भारतात यावे लागले. यश पाल हे त्यातील एक. मग त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पुरे केले दिल्ली विद्यापीठात. १९४९ मध्ये यश पाल मुंबईला नुकत्याच सुरू झालेल्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च अर्थात टीआयएफआरमध्ये आले. यशपाल यांनी प्रा. पीटर्स बर्नार्ड यांच्याबरोबर विश्वकिरणांवर (कॉस्मिक किरण) काम केले. विश्वकिरण वातावरणात कसे प्रवास करतात, यावर त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. १९५४ साली यशपाल मेसेचूसेटस येथील एमआयटीमध्ये पीएच.डी. करायला गेले. यश पाल यांना संगीताची आवड होती. त्यांनी एकदा एमआयटीमध्ये रविशंकर यांच्या सतारवादनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. पीएच.डी. करून यश पाल १९५८ मध्ये परत टीआयएफआरला आले.टीआयएफआरला यश पाल असतानाच प्रा. भा. मा. उदगावकर आणि प्रा. वि. गो. कुलकर्णी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नात प्रा. यश पालही होते. ते या शालेय मुलांना शिकवत. गरीब मुलांचे शिक्षण चांगले व्हावे याची कळकळ त्यांनाही प्रा. उदगावकर व कुलकर्णी यांच्या एवढीच प्रकर्षाने होती. नंतर १९७३ मध्ये यश पाल अहमदाबादला इस्रोच्या स्पेस अ‍ॅप्लीकेशन सेंटरमध्ये दाखल झाले. यश पाल यांच्या गटाला सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरीमेंट (साईट) कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती. याद्वारे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार येथील चार राज्यातील ग्रामीण मुलांचे शिक्षण सॅटेलाईटद्वारा करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. यावेळी लागणारी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे कुठे बाजारात मिळत नसत. वर्ष-दोन वर्षांपूर्वी अमेरिकेने ती विकसित केली होती. त्यामुळेच ही उपकरणे शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवा, अशी मागणी त्या त्या खात्यातील लोक यशपालांकडे करत. यश पाल यांचा त्याला विरोध होता. ते म्हणत, अमेरिकेने काय केले? त्यांच्या वेळी जगात ती कोणालाही माहीत नव्हते. आता ती अमेरिकनांना माहीत आहेत. मग तुम्ही स्वत: ती विकसित का करत नाही? मी नाही कुणाला अमेरिकेत पाठवणार. असे करून त्यांनी आपल्या वैज्ञानिकांना ती उपकरणे येथे भारतात विकसित करायला लावली. त्यामुळे या वैज्ञानिकांमध्ये आत्मविश्वास प्रफुल्लित केला. यश पाल सोबत काम करणाºया लोकांबरोबर चर्चा करून त्यांना सतत नवनवीन कल्पना देत. नावीन्यपूर्ण कामासाठी उद्युक्त करत. साईट कार्यक्रमाच्या वेळी ते नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान समजावून देत. अवघड विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हातोटी होती. यामुळेच ते या संस्थेचे काही वर्षे अध्यक्षही झाले होते. ते मोठ्यांबरोबर शालेय विद्यार्थ्यांतही चांगले रमत. त्यांना हिंदी बोलण्याची विलक्षण हौस होती. पॅशन म्हणा. त्यामुळे ते इंग्रजीत बोलत असताना कधी हिंदीत शिरतील हे त्यांनाही समजत नसेल, इतकी ती भाषा त्यांच्या रक्तात भिनली होती.१९८१ पासून दोन वर्षे प्रा. यश पाल युनेस्कोमध्ये गेले व यूएन कॉन्फरन्स आॅन आऊटर स्पेससाठी प्रमुख बनले. नंतर ते नियोजन आयोगात प्रमुख सल्लागार होते. पुढे ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचे सेक्रेटरी झाले. तेथून ते बाहेर पडून विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले. या काळात त्यांनी भारतभर चार आंतरविद्यापीठीय केंद्रे स्थापन केली. डॉ. जयंत नारळीकरांची आयुका ही त्यातलीच एक संस्था. त्याच वेळी विज्ञान-तंत्रज्ञान खात्याने भारत जन विज्ञान जाथा या नावाचा एक भारतव्यापी कार्यक्रम आखला होता व त्यांना त्याचे अध्यक्ष केले होते. या विज्ञान प्रसाराच्या कार्यक्रमात ते पुरते रमले. त्यांना इतक्या विषयात रस होता की ती यादी संपायची नाही. भौतिक शास्त्रज्ञ स्ट्रिंग थिअरीबद्दल बोलत असो, गाववाले लोक दुष्काळ, पूर, वाया गेलेले पीक, बालविवाहाचा विषय असो की सतीची चाल असो किंवा एखाद्या नाटकाची चर्चा, शालेय विद्यार्थी त्यांच्या एखाद्या प्रकल्पाबद्दल बोलत असू देत, समाजविज्ञान शास्त्रज्ञ एखाद्या सर्वेक्षणाची प्रश्नावली तयार करत असू देत की आणखी काही, यश पाल त्या त्या लोकांना काही तरी न सुचलेले सांगून त्यांच्यात एक चैतन्य निर्माण करत असत. यश पाल यांची एक समिती मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी होती. दूरदर्शनच्या टर्निंग पॉर्इंटमधील अथवा खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळची त्यांची कॉमेंट्री कोण विसरेल? ते गेले. पण त्यांच्याबद्दलच्या अशा अनंत आठवणी मनामनात आहेत. त्यामुळेच कदाचित विज्ञान आणि तंत्रज्ञानात इतका रमलेला खेळीया परत होणे नाही.(लेखक मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आणि प्रसिद्ध विज्ञान प्रसारक आहेत.)