शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

‘सरोगसी’ला कायद्याचे कोंदण

By admin | Updated: August 28, 2016 02:40 IST

वैद्यक, औषधशास्त्रात लागलेल्या नव्या शोधांमुळे मानवी जीवन सुखकर होत आहे. मानवाला व्याधी, वंध्यत्वावर सहज मात करता येणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या काळी पती अथवा पत्नीमध्ये

- पूजा दामलेवैद्यक, औषधशास्त्रात लागलेल्या नव्या शोधांमुळे मानवी जीवन सुखकर होत आहे. मानवाला व्याधी, वंध्यत्वावर सहज मात करता येणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या काळी पती अथवा पत्नीमध्ये वंध्यत्व असल्यास दाम्पत्याला अपत्यप्राप्तीचे सुख दुर्मीळच होते. या दाम्पत्यांकडे दत्तक मुलाचा पर्याय उपलब्ध होता. आता सरोगसीच्या माध्यमातून अशा दाम्पत्यांना संततीसुख मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दाम्पत्याला संततीसुखाचा आनंद मिळत असताना काही वेळा सरोगेट मदरचे मात्र शोषण होते. तिच्या स्वातंत्र्याचा, आनंदाचा विचार होत नाही. तर काही वेळा त्या बाळाचेही हाल होतात. नवीन येणाऱ्या सरोगसी विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्याने ‘सरोगसी’मध्ये होणाऱ्या अनैतिक, अनधिकृत गोष्टींना आळा बसेल. त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होऊन अनेकांना कायदेशीररीत्या फायदा होऊ शकतो. करिअर, लाइफ स्टाईल, फिगर, फ्रीडम अशा अनेक गोष्टींचा विचार करून तरुण दाम्पत्य लवकर लग्न केले तरीही मुलासाठी प्लॅनिंग करतात. त्यामुळे अनेकदा वयाच्या बत्तिशीनंतरही मुलासाठी प्लॅनिंग केले जाते. वय वाढल्याने अनेक महिलांना गर्भधारणा होत नाही. औषधोपचारानंतर गर्भधारणा होते. पण काही वेळा वंध्यत्वामुळे गर्भधारणा होणे शक्य नसते अथवा गर्भधारणा झाल्यास गर्भाशयात गर्भाची वाढ होऊ शकत नाही. अशा वेळी संततीप्राप्तीसाठी काही दाम्पत्ये ‘सरोगसी’चा मार्ग स्वीकारतात. सरोगसीचा व्यवसाय गेल्या काही वर्षांत देशात फोफावला आहे. त्यामुळे काही प्रमाणात यातून पळवाटा काढल्या जातात. खरे म्हणजे सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लंड, स्विडन अशा देशांमध्ये सरोगसीला बंदी आहे. या देशात कायदेशीररीत्या सरोगसीला बंदी असल्यामुळे येथील अनेक दाम्पत्ये भारतात येऊन सरोगसी करायचे. पण, या प्रकरणांमध्ये अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे परदेशी नागरिकांना भारतात येऊन सरोगसी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नवीन विधेयकानुसार, जे भारतीय नागरिक पदेशात स्थित झाले आहेत अशा नागरिकांनाही सरोगसीचा पर्याय आता बंद झाला आहे. अनेक नागरिक परदेशात स्थायिक झाले तरी त्यांचे आई-बाबा अन्य नातेवाईक हे देशातच असतात. निवृत्तीनंतर अनेकांना मायदेशी परतायचे असते, पण आता त्यांनाही हा मार्ग बंद झाला आहे. अमेरिका, लंडन या देशांत सरोगसीला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे या देशांत ‘सरोगेट मदर’ला पैसे दिले जातात. आतापर्यंत आपल्या देशातही या पद्धतीचा अवलंब केला जात होता. पण, यापुढे पैसे देऊन एखाद्या अनोळखी महिलेकडून सरोगसीद्वारे संततीप्राप्तीचा मार्ग बंद होणार आहे. नातेवाईक असणाऱ्या महिलेलाच सरोगेट मदर म्हणून मान्यता मिळणार आहे. देशात गरिबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे पैसे मिळतात म्हणून ‘सरोगेट मदर’ होण्याचे प्रमाण अधिक आहे. आर्थिक विवंचनेत असणाऱ्या महिला सरोगेट मदर होण्याचा मार्ग स्वीकारतात. पण या महिलांचे शोषण होते असे एकीकडे म्हटले जात असले तरीही या महिलांचा त्यात शारीरिक, कौटुंबिक आणि आर्थिक फायदा असतो. रोजंदारी अथवा अल्पशा पगारात या महिला घर चालवत असतात. त्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची धडपड सुरू असताना आरोग्याला दुय्यम प्राधान्य दिले जाते. पण, या महिला सरोगसीसाठी पुढे आल्यास त्यांच्या सर्व तपासण्या केल्या जातात. एक वर्षभर त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेतली जाते. त्याचबरोबरीने त्यांना दीड ते दोन लाख रुपये मिळतात. यापैकी अनेक महिलांनी हजारो रुपयेही एकत्र पाहिलेले नसतात. त्यामुळे नियमांचे पालन करून सरोगसी केल्यास सरोगेट मदरचा फायदा असतोच. विधेयक सकारात्मक वाटत असले तरीही त्यात काही उणिवा आहेत. त्यांच्यावर मार्ग काढला पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे. नातेवाईक असलेली महिलाच सरोगेट मदर झाल्यास त्यात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर भावनिक गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे विधेयकाचा अजून बारकाईने विचार केला पाहिजे.