शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वणव्याने होरपळताहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:15 IST

महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दरवर्षी नैर्ऋत्य मान्सून पावसाची सुरुवात होताच ‘झाडे लावा’चा घोष करायला सुरुवात करतात.

वसंत भोसले|

गवताची कापणी झाली की, डोंगराला वणव्याने पेटवून द्यावे, म्हणजे पुढीलवर्षी गवत अधिक जोमाने उगवते, अशी अंधश्रद्धा आजही सह्याद्री पर्वतरांगांची पाठ सोडायला तयार नाही. हिरवेगार डोंगर दिसण्याऐवजी काळेकुट्ट झाले आहेत.महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दरवर्षी नैर्ऋत्य मान्सून पावसाची सुरुवात होताच ‘झाडे लावा’चा घोष करायला सुरुवात करतात. हजारो, लाखोने असे करत हा वृक्षे लावण्याचा आकडा फुगत जाऊन कोटींवर गेला आहे. येत्या पावसाळ्यात चार कोटींहून अधिक झाडे लावण्याचा संकल्प आहे, अशी जाहिरातही करण्यात येत आहे. अशी ही कोट्यवधी लावलेली झाडे गेली कुठे? कारण महाराष्टÑाचा बहुतांश भाग दिवसेंदिवस ओसाड होताना दिसतो आहे. एकीकडे वृक्षलागवडीचा जोरदार प्रयत्न असतानाच महाराष्टÑाचा स्वाभिमान असणारा सह्याद्री मात्र जळतो आहे. लावण्यात येणाऱ्या आगीत होरपळत आहे. गोवा सीमेपासून नाशिकच्या कळसुबाईच्या माथ्यापर्यंत जाऊन पाहा. सह्याद्रीच्या पर्वतरांगा कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या आहेत. यापैकी एकही रांग हिरवीगार दिसत नाही. ज्या-त्या भागात लोकांचा वावर आहे. तेथे आगी लावण्यात येत आहेत. या आगीचा वणवा डोंगरावरील गवतांना जाळतच आहे. त्यावेळी छोटी-मोठी झाडे जळत आहेत. या रांगांमध्ये असणारे कीटक, जंतू, पक्षी, सरपटणारे प्राणी, जिवंत प्राणी जळून जात आहेत. दोन दिवसांपूर्वी सातारा या मराठेशाहीच्या राजधानी असलेल्या शहराजवळचा अजिंक्यतारा किल्ला पुन्हा पेटवून देण्यात आला. या किल्ल्यावर वणवा लावण्याच्या घटना आजपर्यंत अनेकदा घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी हिरवागार दिसणारा डोंगर आगीत होरपळून काळाकुट्ट झाला आहे. ही घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा वणवा लावण्यात आला. यात रानाची राखरांगोळी झालीच तसेच अनेक वृक्षही जळून गेले.सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ज्या कास पठाराचा गौरव करण्यात आला आहे तो कास पठारही वणव्याने जळतो आहे. दोन दिवसांपूर्वी कास पठारावरील एकीव गावाजवळ वणवा लागला. या वणव्याने कास पठाराच्या मुख्य बाजूने पसरण्यास सुरुवात केली. वनखात्याचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगी विझवण्यात यशस्वी झाले. ही आग लागताच अग्निशामक दलाची गाडी पाठविण्यात आली, पण डोंगरदºयात पेरलेल्या वणव्यापर्यंत गाडी नेता आली नाही.एकीकडे वृक्षलागवडीचा प्रयत्न चालू असताना वनांना आगी लावण्याचे प्रकार काही थांबायला तयार नाहीत. या आगी लावून काय साध्य होणार आहे, याचे उत्तर कुणी देत नाही. केवळ अंधश्रद्धेतून हे वणवे लावले जात आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकवर्षी वृक्षलागवडीचा कार्यक्रम बाजूला ठेवून वृक्षांची जोपासना करणारी मोहीम सुरू करावी. दरवर्षी पावसाळा सुरू होत असताना वृक्षलागवडीचा धडाका सुरू होतो, पण ते वाढत असलेले वृक्ष जळतात तेव्हा कुणी ते जपण्यासाठी पुढे येत नाहीत. वारंवार असे वणवे लावण्यात येत असताना कुणावरही कठोर कारवाई होताना दिसत नाही. गुन्हे दाखल होत नाहीत. एकीकडे वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करायचा आणि अशाप्रकारे आगी लावून ही जंगले, किल्ले, पर्वतरांगा, डोंगरदºया जाळून टाकण्यात येत आहेत. महाराष्टÑाचे वनक्षेत्र कमी होत असताना अशा आगींना तातडीने अटकाव करायला हवा, अन्यथा सह्याद्री पर्वतरांगा बोडक्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे नैर्ऋत्येकडून येणारा मान्सूनचा पाऊस अडतो आणि महाराष्टÑ ओलाचिंब होतो. ही साखळी जोडून ठेवू या, तोडू या नको !

टॅग्स :forestजंगल