शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

आजचा अग्रलेख: युद्धात गहू अडकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 07:37 IST

गेल्या ११ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील गरजू देशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आपला देश पुढाकार घेईल. असे सांगितले होते.

भारताने गेल्या शुक्रवारी रात्री एका आदेशाने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. देशांतर्गत गव्हाच्या किंमती वाढत चालल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे, असे व्यापार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. गेल्या ११ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील गरजू देशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आपला देश पुढाकार घेईल. असे सांगितले होते. बरोबर एक महिन्याने गव्हाची निर्यात बंदी करायची वेळ आली. कारण सर्वात मोठा फटका हवामान बदलाचा बसला आहे. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात मार्चच्या प्रारंभीच उष्णतेची लाट सुरू झाली. ती एप्रिलच्या अखेरीस अपेक्षित असते. परिणामी गव्हाचे उत्पादन घटले. 

सरकारच्या अनुमानानुसार ११ कोटी १० लाख मेट्रीक टन गव्हाचे उत्पादन अपेक्षित होते. त्या तुलनेत हे उत्पादन साडेचार टक्यांनी घसरून १० कोटी ५० लाख टनावर आले. भारताची अंतर्गत गरजच १० कोटी ४० लाख टन गव्हाची आहे. दरम्यान, आजवर ८० लाख टन गव्हाची निर्यात झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गहू, मका, सोयाबीन आणि सुर्यफुलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. या भागातून सुमारे तीस ते चाळीस टक्के निर्यातीचा व्यापार होतो. युक्रेनचा गव्हाच्या निर्यातीत १२ टक्के वाटा आहे. पंधरा टक्के वाटा मक्याचा तर पन्नास टक्के सुर्यफुलाचे तेल युक्रेन जगाला पुरवतो. रशियाच्या हल्ल्यामुळे सुमारे दरमहा होणारी ४५ लाख टन निर्यात थांबली आहे.  याचा मोठा परिणाम जगभरात झाला आहे. तसा भारताचा वाटा आयात-निर्यातीत कमी असला तरी तो फटका सहन होण्यासारखा नाही. कारण आपल्या देशातील गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता उत्तर भारतात एप्रिल ऐवजी मार्चच्या प्रारंभीच जाणवू लागली. 

याशिवाय आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे डीएपीसारख्या खताच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना खताची शेवटची मात्रा देण्यासाठी खतांचा पुरवठाच झाला नाही. तेव्हा राज्य आणि केंद्र सरकारमधील राज्यकर्ते विधानसभांच्या निवडणुकीत गुंतले होते. भारताच्या निर्यातबंदीच्या निर्णयावर ‘जी ७’ राष्ट्रांच्या गटाने जोरदार टीका केली आहे. जर्मनीचे कृषीमंत्री केम ओझदेमीर  यांनी म्हटले आहे की, गव्हाचे उत्पादन करणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अशा देशांनी आंतरराष्ट्रीय अन्नधान्याच्या व्यापारात बाधा आणली तर गरीब देशांवर परिणाम होईल. भारताला पर्याय नव्हता. देशांतर्गत गव्हाच्या किमती आठवड्यात पाच टक्क्यांनी वाढल्या आहेत. 

गतवर्षाशी तुलना केली तर ती वाढ सुमारे तीस टक्के आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किमती चाळीस टक्क्यांनी वाढल्या आहेत. घाऊक दर प्रती टनास ४२० वरून ४८० डॉलर्स झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर भारताला मागील वर्षांचा शिल्लक साठा (१ कोटी ९३ लाख टन) आणि चालू वर्षाचे उत्पादन याचा विचार करून आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किमतीचा फायदा घ्यायला हवा होता. सुमारे दोन कोटी टनापर्यंत निर्यात करता आली असती. भारत नेहमीच गव्हाच्या उत्पादकापेक्षा शहरी, मध्यमवर्गीय ग्राहकांचे हित पाहून निर्णय घेत असतो, अशी टीका देखील जर्मनीच्या कृषीमंत्र्यांनी केली आहे. 

निर्यातीचा निर्णय वरील कारणांनी बरा वाटत असला तरी याचा भारताला फारसा फायदा होणार नाही. कारण आपल्याकडे वाढलेल्या किमती कमी केल्या जात नाहीत. त्यावरील कर कमी केला जात नाही. खत, डिझेल, आदींच्या किमती भरमसाठ वाढल्याने गव्हाच्या किमती पाडण्यात आल्या तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल. शिवाय उन्हाळ्याच्या उष्ण लाटा अगोदरच वाहू लागल्याने गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला. तसे पावसाळ्याचे दिनमान बदलले तर रब्बीच्या हंगामातही गडबड होऊ शकते. जगाच्या पाठीवर युद्धाचा धोका कायम असायचा आणि त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय संबंधावर होत असे. आता निसर्गानेच अघोषित युद्ध पुकारले आहे.

हवामानातील बदलाचा उत्पादनावर परिणाम होत आहे. भारतातील कृषी उत्पादनात १५ ते २० टक्के परिणाम हा बदल करू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे. या साऱ्याचा विचार अधिक गांभीर्याने करण्यासारखी परिस्थिती समोर आली आहे. जूनमध्ये होणाऱ्या ‘जी ७’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेणार आहेत. त्या परिषदेच्या दबावाला बळी न पडता आपला देश आत्मनिर्भर कसा होईल यावरच भर द्यावा. रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट झाल्यावरच आपली सुटका होणार आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया