शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

त्या ‘बाबू’ला शासन करा

By admin | Updated: February 2, 2015 01:02 IST

गणराज्य दिनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या शासकीय जाहिरातीत घटनेची जी उद्देशपत्रिका छापली गेली तीत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता

गणराज्य दिनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या शासकीय जाहिरातीत घटनेची जी उद्देशपत्रिका छापली गेली तीत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन प्रमुख उद्दिष्टांचा समावेश नव्हता. ४२ व्या घटनादुरुस्तीने या उद्दिष्टांचा या उद्देशपत्रिकेत समावेश केला होता. त्यांना आर्थिक व सामाजिक स्वरुपाचा मोठा आशय आहे. देशाने कोणतीही अर्थव्यवस्था स्वीकारली तरी तो त्यातील वंचितांच्या व उपेक्षितांच्या बाजूनेच उभा राहील हा समाजवाद या उद्दिष्टाचा अर्थ आहे. १९९१ मध्ये देशाने खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था स्वीकारली असली तरी त्याने जनतेला दिलेल्या या अभिवचनापासून फारकत घेतली नाही. दारिद्र्यरेषेच्या खाली असणारे वर्ग त्या रेषेवर आणणे व त्यांच्या जीवनात समृद्धी व समाधान आणणे हे त्याने आपले उद्दिष्ट मानले. धर्मनिरपेक्षता या अभिवचनालाही तेवढाच महत्त्वाचा अर्थ आहे. भारत हा धर्मबहुल देश आहे आणि त्यातील जनतेला आपापल्या धर्मांची उपासना करण्याचा व त्यासंबंधीच्या श्रद्धा बाळगण्याचा हक्क आहे. हा हक्क भारताच्या घटनेनेच जनतेला दिला आहे. देशाची एकात्मता टिकविण्यासाठी आणि त्यात एकवाक्यता राखण्यासाठी त्याचे धर्मातीत वा धर्मनिरपेक्ष असणे आवश्यक आहे ही गोष्ट आपल्या घटनाकारांपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या साऱ्या श्रेष्ठांना ज्ञात व मान्य आहे. मूळ घटनेत समाजवाद व धर्मनिरपेक्षता या संकल्पनांचा समावेश नसला तरी तो तसा करून घेणे १९७० च्या दशकात देशाला आवश्यक वाटले. देशात वाढणारी आर्थिक विषमता आणि धार्मिक तेढ लक्षात घेता तसे करणे गरजेचेही होते. घटनेची उद्देशपत्रिका हे देशाने आपल्या जनतेला दिलेले शाश्वत अभिवचन आहे. ते प्रकाशित करताना त्याच्या संपूर्ण स्वरुपात छापले जाणे अर्थातच अपेक्षित आहे. असे असताना ६६ व्या गणराज्य दिनाच्या मुहूर्तावरील सरकारी जाहिरातीतून हे दोन शब्द वजा केलेले दिसणे ही बाब अनेकांच्या भुवया रास्तपणे उंचावणारी ठरली आहे. त्याविषयी देशात सुरू असलेली भवती न् भवतीही त्याचमुळे आहे. २०१४ च्या निवडणुकीने देशाच्या राजकारणात बदल घडवून आणला आहे. पूर्वीचे काँग्रेसप्रणीत आघाडी सरकार जाऊन त्याजागी आता भाजपाचे आघाडी सरकार आले आहे. भाजपाची समाजवादाविषयीची भूमिका आरंभापासूनच संशयास्पद राहिली आहे. स्पष्टच सांगायचे तर, भाजपाने व पूर्वीच्या त्याच्या जनसंघावताराने आर्थिक प्रश्नावरील आपली भूमिका कधी उघडच केली नाही. एकेकाळच्या त्याच्या शहरी व मध्यमवर्गीय प्रकृतीमुळे मध्यममार्गाच्या उजव्या बाजूला असलेला पक्ष अशीच त्याची प्रतिमा राजकारणात राहिली. शिवाय तो पक्ष संघाला आपली पालक व संस्थापक संघटना मानत असल्यामुळे आणि संघाने हिंदुत्वाची शपथ आरंभापासून घेतली असल्यामुळे भाजपाच्या धर्मनिरपेक्ष प्रकृतीविषयीही समाजाच्या मनात नेहमीच एक संशय राहिला आहे. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या संबंधीच्या आपल्या भूमिका पुरेशा स्पष्ट कराव्या असे त्या पक्षालाही कधी वाटले नाही. कोणतीही निवडणूक लढवताना किंवा संसद वा राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वाची शपथ घेताना घटनेशी एकनिष्ठ राहण्याचे अभिवचन सभासदांना द्यावे लागते. तसे ते भाजपाच्या सभासदांनी आजवर दिले आहे. मात्र त्याचे विधिमंडळाबाहेरचे स्वरुप आणि संघाशी असलेले त्याचे जैविक संबंध या गोष्टी पूर्वीएवढ्याच मजबूत व शाबूत राहिल्या आहेत. त्यामुळे भाजपाचे सरकार दिल्लीत सत्तारूढ झाल्यानंतर त्याने प्रकाशित केलेल्या जाहिरातीतून घटनेच्या उद्देशपत्रिकेची वजाबाकी होऊन तिच्यातून नेमके समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द वगळले गेले असतील तर त्याविषयी संशय व्यक्त होणे स्वाभाविक आहे. हा संशय व्यक्त झाल्यानंतर वेंकय्या नायडू या केंद्रीय मंत्र्याने प्रकाशित झालेली जाहिरात घटनेच्या मूळ उद्देशपत्रिकेनुसार झाली व तसे होणे ही चूक ठरली हे मान्य केले आहे. वेंकय्या नायडू यांचे म्हणणे मान्य केले तरीही ही चूक अजाणतेपणी वा नकळत होणे अशक्य आहे. सरकारच्या जाहिराती मंत्री वा राजकीय नेते लिहित नाहीत. ते काम प्रशासनातील बाबूंकडून केले जाते. हा वर्ग राजकारणी नसतो हे मान्य केले तरी त्यातील काहींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा उघड दिसतात व त्या समजण्याजोग्याही असतात. आपल्या राजकीय प्रमुखांना आणि सत्तेवरील वरिष्ठांना खूश करण्यासाठी ही माणसे कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतात ही गोष्ट २०१४ च्या निवडणुकीनंतर अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या भूमिकेत केलेल्या बदलावरून लक्षात येऊ शकणारी आहे. अशी माणसे राणीपेक्षा जास्त राजनिष्ठा दाखविणारी असतात. ती आपल्या अशा लाचारीपायी सरकारला अडचणीत आणतात आणि जनतेचीही नको तशी फसवणूक करतात. त्यामुळे या जाहिरातीत झालेल्या चुकीसाठी केवळ वेंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण पुरेसे मानण्याचे कारण नाही. ही चूक कोणी केली ते शोधून काढणे व ती जाणीवपूर्वक करणाऱ्या इसमाला घटनेचा अपमान केल्याच्या आरोपावरून योग्य ते शासन करणे आवश्यक आहे. कारण कोणीही आपल्या मर्जीने बदलून घ्यावी एवढी भारताची घटना सवंग वा उथळ नाही. तिचा साऱ्यांनीच आदर केला पाहिजे.