शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

आग लागण्याआधीच संघाने ओतले पाणी! होसबळेंच्या टीकेनंतर लागलीच सरसंघचालकांकडून स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 08:44 IST

दत्तात्रेय होसबळे यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे चिंताजनक चित्र रंगवताच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला!

- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये क्रमांक दोनवर असलेले दत्तात्रेय होसबळे यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे चिंताजनक चित्र रंगवून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.

गरिबी आपल्यासमोर राक्षसाप्रमाणे उभी आहे, वीस कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत असे होसबळे म्हणाले असतील तर मोहन भागवत यांनी लगेच भारताची अर्थव्यवस्था कोविड पूर्वस्थितीत येत असल्याचे सांगून आगीवर पाणी शिंपडले. भाजपा-संघ यांच्यातील नातेसंबंधांचा मागोवा घेणाऱ्यांना होसबळे यांच्या वक्तव्यांनी धक्का बसला. कारण होसबळे पंतप्रधानांच्या निकटचे मानले जातात.  २३ कोटी भारतीय रोज जेमतेम ३७५ रुपये  मिळवतात, बेरोजगारी ७.६ टक्के इतकी वाढली आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाचवा भाग देशातल्या फक्त एक टक्के लोकांकडे जातो. ५० टक्के भारतीयांकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ १३.५ टक्के भाग जातो, अशी विधाने होसबळे यांनी केल्यानंतर परिवारात चलबिचल झाली. स्वदेशी जागरण मंचाच्या व्यासपीठावरून होसबळे मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. परंतु चारच दिवसांनंतर भागवत यांनी मोदी सरकारला विजयादशमीच्या नागपूर मेळाव्यात शाबासकी देऊन टाकली. ते म्हणाले की, केवळ केंद्र प्रश्न सोडवू शकते. आणि संधी निर्माण करण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. स्वावलंबी झाले पाहिजे! एवढे पुरेसे नव्हते म्हणून की काय  भारताने श्रीलंकेला केलेल्या मदतीचा हवाला देऊन भागवतांनी मोदी सरकारची पाठ थोपटली. 

रशिया-युक्रेन संघर्षात भारताने घेतलेल्या भूमिकेचा उल्लेखही त्यांनी केला. भारताचा आवाज जागतिक पातळीवर ऐकला जात आहे. देश बळकट होत आहे. याचे हे लक्षण असल्याचे ते म्हणाले. बाकी काहीही असले, तरी शीर्ष पातळीवर संघ मोदींच्या बरोबर असल्याची खात्री भागवत यांनी दिली, हे मात्र नक्की!

ओडिशात लवकर विधानसभा निवडणुका देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहिलेले ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या घेण्याच्या कल्पनेवर विचार करत आहेत. सिक्कीममध्ये पवन कुमार चामलिंग २४ वर्षे मुख्यमंत्री होते. पटनाईक यांची २२ वर्षे पूर्ण झाली असून, दोन वर्षे बाकी आहेत. परंतु ७५ वर्षीय पटनायक ओडिशामध्ये भक्कम पाय रोवून आहेत. लोकसभेच्या निवडणुका २०२४ साली होतील, त्याच्या आधीच विधानसभा निवडणुका घेण्याचा त्यांचा विचार असल्याचे  माहीतगार सूत्रांकडून कळते. राज्याचे नेतृत्व निर्विवादपणे त्यांच्याकडेच आहे. काँग्रेसला नेस्तनाबूत करून भाजपा आता राज्यात उभा राहू पाहत आहे. १९ साली राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा मतांच्या टक्केवारीत भाजपा बिजू जनता दलाच्या अगदी जवळ येऊन ठेपला. भाजपाला ३२.४९ टक्के मते मिळाली. १४७ सदस्यांच्या सभागृहात पक्षाने २३ जागा जिंकल्या. बिजू जनता दलाला ४४.७१ टक्के मते मिळाली. ११२ जागा या पक्षाने पटकावल्या, परंतु लोकसभा निवडणुकीचा निकाल निवडणूक रणनीतिकारांना धक्का देऊन गेला. बिजू जनता दलाने १२ लोकसभा जागा जिंकल्या. पक्षाला ४२.८० टक्के मते मिळाली, तर भाजपाचा मत टक्का ३८.४० टक्क्यांवर गेला. ओडिशातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सहा टक्के अधिक मते  दिली. पटनाईक यांनी आक्रमक भाजपाकडून असलेला धोका ओळखला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुका स्वतंत्र घ्याव्यात काय असे त्यांच्या मनात आले आहे. आधी ते राज्य जिंकू इच्छितात. २०२३ साली केव्हा तरी ही निवडणूक घेऊन मग मे २०२४ मध्ये लोकसभेच्या मैदानात उतरू असे त्यांच्या मनात घोळत आहे.

भाजपचा रोख काँग्रेसवर नव्हे केजरीवालांवर! दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल  अहमदाबादमध्ये निवडणूक रॅलीसाठी गेले असता त्यांनी एका रिक्षावाल्याच्या घरी भोजन घेतले. हाच प्रयोग त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लुधियानामध्ये केला आणि दिल्ली मॉडेल तेथे यशस्वीरित्या विकले. केजरीवाल आता गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत तेच करू पाहत आहेत. वर्षअखेरीस राज्यात निवडणुका होतील. दिल्ली आणि पंजाबमधील मतपेढी लुटून नेल्यानंतर काँग्रेस पक्षाला आता केजरीवाल यांच्याबद्दल चिंता वाटत आहे. आपने भाजपलाही धक्का दिला आहे. गुजरातेत अजूनही काँग्रेस पक्षाचा पक्षाचा प्रभाव आहे.संघटनात्मक निवडणुका किंवा राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ या व्यवस्थेत पक्ष कार्यकर्ते गुंतलेले आहेत. परंतु गुजरात किंवा हिमाचल प्रदेशमध्ये भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नाही. काँग्रेसच्या तुलनेत मोठा धोका ‘आप’कडून आहे, हे भाजपने ओळखले आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात भाजप आपच्या कार्यकर्त्यांना खुणावत आहे. एक प्रकारे त्यांनी दारे खुली करून दिली आहेत. आपल्या शस्त्रागारातील प्रत्येक शस्त्र ते केजरीवाल यांना नामोहरम करण्यासाठी वापरून पाहत आहेत. लागोपाठ तीन दिवस पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये तळ ठोकून होते. ‘आप’ला त्यांनी फटके दिले. परंतु काँग्रेसबद्दल ते फार कठोर बोलले नाहीत. आपला खरा प्रतिस्पर्धी आप असू नये, तर काँग्रेस  असावा, अशी भाजपची इच्छा आहे.

दोनेक डझन  काँग्रेस आमदारांना पक्षात प्रवेश द्यायला भाजपाने नकार दिला म्हणतात. काँग्रेसने आता भाजपवर प्रहार करणे थांबवून ग्रामीण भागातील मते मिळवण्याकडे लक्ष वळविले आहे. याचे मोदी यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी ‘आप’चे वर्णन ‘शहरी नक्षली’ असे केले. अर्थात ‘आप’चे नाव मात्र घेतले नाही. शहरी भागात गोरगरीब आणि तरुणांमध्ये उत्साह आणण्यात केजरीवाल यशस्वी ठरत आहेत, हे भाजपाच्या दृष्टीने चिंतेचे आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ