शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मार्ग खडतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 00:43 IST

मणिपूरच्या रूपाने आणखी एक राज्य येनकेन प्रकारेण खिशात घालून, कॉँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने भाजपाने आणखी एक पाऊल टाकले

मणिपूरच्या रूपाने आणखी एक राज्य येनकेन प्रकारेण खिशात घालून, कॉँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने भाजपाने आणखी एक पाऊल टाकले. या चिमुकल्या राज्यात कमळ फुलविल्याचा जो काही आनंद भाजपाला मिळायचा तो मिळो; पण त्या निमित्ताने किमान मणिपूरची आर्थिक नाकेबंदीची भळभळती जखम बरी झाल्यास संपूर्ण देशाला आनंद होईल. तीस लाखापेक्षाही थोडी कमीच लोकसंख्या असलेले मणिपूर सर्वार्थाने चिमुकले राज्य आहे. मध्यभागी खोरे आणि त्याला सर्व बाजूंनी वेढा घातलेला पर्वतीय प्रदेश अशी मणिपूरची भौगोलिक रचना आहे. मणिपूरमधील नागाबहुल पर्वतीय प्रदेश, तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आणि म्यानमार या शेजारी देशातीलही काही भूभागाचा समावेश करून बृहन नागालॅँडची निर्मिती करावी, ही नागांची जुनी मागणी आहे. तिच्या पूर्ततेच्या मागणीसाठी ते वेळोवेळी मणिपूरच्या आर्थिक नाकेबंदीचे हत्यार उपसत असतात. सात नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या तत्कालीन कॉँग्रेस सरकारच्या निर्णयाच्या विरोधात गत १ नोव्हेंबरपासून बेमुदत आर्थिक नाकेबंदी पुकारण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. आपला पक्ष सत्तेवर आल्यास ४८ तासांच्या आत आर्थिक नाकेबंदी संपुष्टात आणण्याचे आश्वासन भाजपा नेत्यांनी प्रचारादरम्यान दिले होते. तीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असेल, असे नूतन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर लगेच बोलून दाखविले. नागांचे प्रतिनिधित्व करणारा नागा पीपल्स फ्रंट हा पक्ष आघाडी सरकारमध्ये सहभागी असल्यामुळे ते काम वरकरणी सोपे वाटत असले तरी, नाकेबंदी घोषित करणारी युनाएटेड नागा कौन्सिल ही संघटना काही माघारीच्या मन:स्थितीत दिसत नाही. त्यामुळे एन. बिरेन सिंग यांचा मार्ग खडतरच दिसतो. नाकेबंदी उठवली जाण्यासाठी एखाद्या वेळी नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा निर्णयदेखील मागे घ्यावा लागू शकेल. नाकेबंदीचा फटका प्रामुख्याने खोऱ्यातील मैतेईबहुल लोकसंख्येला बसला आहे. त्यामुळे खोऱ्यात भाजपाला थारा मिळणार नाही, असा काँग्रेसचा होरा होता; मात्र तो चुकीचा ठरला. हिंदू धर्माचे आचरण करणाऱ्या मैतेर्इंनी भाजपाला साथ दिल्याचे निकालांमधून स्पष्ट झाले आहे. आता भाजपा सरकार नागांसमोर झुकले तर मैतेर्इंमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे. त्यामुळे मैतेर्इंना न दुखवता नागांचा अहं जोपासणे, ही मणिपूर सरकारसाठी अग्निपरीक्षाच असणार आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंग त्यामधून कसे पार पडतात, यावरच त्या राज्यातील पहिल्या भाजपा सरकारचे यश सुनिश्चित होणार आहे.