शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

दबावाचा परिणाम?

By admin | Updated: March 20, 2016 23:36 IST

सुमारे सहा वर्षांपूर्वी पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील एकमात्र आरोपी मिर्झा हिमायत बेग याला पुणे न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा

सुमारे सहा वर्षांपूर्वी पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील एकमात्र आरोपी मिर्झा हिमायत बेग याला पुणे न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कमी करून त्याला जन्मठेपेची सजा सुनावण्याचा निवाडा जाहीर केला आहे. संसदेवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी अफझल गुरू यास झालेली फाशी चुकीच्या पद्धतीने दिली गेली अशी चर्चा सध्या देशभर सुरू असून, एकूणच फाशीच्या शिक्षेच्या विरोधातील दबाव वाढत असून, त्याचाच तर हा परिणाम नव्हे ना, अशी शंका उपस्थित केली जाऊ शकते. विशेष तपास पथकाने बेगवर अनेक आरोप ठेवले होते आणि ज्या बॉम्बचे स्फोट घडवून आणले गेले त्यांची निर्मितीदेखील त्यानेच केली या आरोपाचा त्यात समावेश होता. उच्च न्यायालयाने मात्र एक वगळता बाकी सर्व आरोपांमधून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बेगच्या राहत्या घरी पोलिसांना तब्बल बाराशे किलो इतक्या मोठ्या प्रमाणातील आरडीएक्सचा साठा आढळून आला होता. परिणामी उच्च न्यायालयाने प्राणघातक स्फोटके जवळ बाळगल्याचा एकमात्र आरोप त्याच्याविरुद्ध सिद्ध होत असल्याचे स्वीकारून त्यासाठी त्याला जन्मठेपेची सजा सुनावली. हिमायत बेगकडे जी स्फोटके सापडली त्याच स्फोटकांचा वापर करून त्याने बॉम्ब तयार केले व जर्मन बेकरीत प्रत्यक्ष स्फोट घडवून आणणाऱ्यांच्या सुपूर्द केले असा कोणताही नि:संदिग्ध पुरावा तपासी यंत्रणेला सादर करता आला नाही असे निकालपत्रात नमूद करून न्यायालयाने तपासी यंत्रणेवर कडक ताशेरे ओढले आहेत. बॉम्बची निर्मिती नेमकी कोणी केली, ते कोणी कोणाच्या हवाली केले आणि त्यांची नेमकी पेरणी कोणी केली हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहिल्याचे व त्यालाही पोलीसच जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सबब सतरा निरपराधांचा बळी घेणाऱ्या आणि ५८ जणांना जखमी करणाऱ्या या घातपाती कृत्यामागील गुन्हेगार आजही मोकळेच आहेत. हिमायतला जन्मठेप झाली असून व जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत कारावास असा अर्थ अलीकडे मांडला जात असताना, त्याने कच्च्या कैदेत काढलेले दिवस या शिक्षेत जमा धरले जातील असे जे न्यायालयाने म्हटले आहे त्याचा उलगडा मात्र होत नाही.