शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आदरणीय मंगेश पाडगावकर, आमच्या पिढीकडून तुम्हाला आदरांजली -

By admin | Updated: January 4, 2016 14:49 IST

‘सलाम’ तुमच्या लेखणीला! लिखाणातल्या विविधतेला! ‘सांग सांग भोलानात’मधल्या निरागसतेला, ‘आजोबाच्या खोलीत धुकं धुकं’मधल्या अलिप्ततेला!

- अश्विनी भावे,सॅन फ्रान्सिस्को, बाय, ऐरियाजानेवारी २०१६ - ‘सलाम’ तुमच्या लेखणीला! लिखाणातल्या विविधतेला! ‘सांग सांग भोलानात’मधल्या निरागसतेला,‘आजोबाच्या खोलीत धुकं धुकं’मधल्या अलिप्ततेला!‘सलाम’मध्ये चितारलेल्या मध्यमवर्गीय घुसमटीला नि,लाचार जगण्यावर मारलेल्या चपराकीला! ‘सलाम’ खळे-पाडगावकर घट्ट मैत्रीला, अन् त्या शब्द-सुरांच्या जादूला!‘सलाम’ तुमच्या प्रेमाला, प्रेमाच्या विविध छाटांना! ‘जागून ज्याची वाट पहावी’ असे प्रेम,‘मुजोर वाऱ्यानं उडणाऱ्या बटीत’ हरवलेलं प्रेम,‘तुमचं आमचं सेम’ असलेलं प्रेम,‘झोपाळ्यावाचून झुलणारे’ प्रेम, प्रेम घननिळा होऊन बरसणारे,‘परत फिरा रे’ म्हणता डोळ्यातून झिरपणारे! पाडगावकर, तुमच्या बोलक्या शब्दात, खास वाचन शैलीत, इतकी वर्षं, तुम्ही आमच्या पिढीला गुंतवून ठेवलेत. कधी बोलगाणी, कधी बालगाणी, कधी वात्रटिका, कधी भावगीते... एखाद्या जिप्सीसारखे आम्ही एका कवितेकडून दुसऱ्या कवितेकडे फिरत राहिलो आणि नकळत, तुमच्या इतकं जमणार नाही तरी, आयुष्यावर प्रेम करायला शिकलो! तुमच्या लेखणीविना सारं जग आता मुकं मुकं मुकं!!मनातलं सांगू, तुमच्या लेखणीइतकंच मला आहे अप्रूप तुमच्या जाड भिंगाच्या चष्म्याचं! तो मला हवाय. कारण मला तुमच्या डोळ्यांतून हे जग पाहायचंय. मलादेखील झोपाळ्यावाचून झुलायचंय, या जगण्यावर शतदा प्रेम करायचंय!