शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘लाल बत्ती’ गेली, आता मानसिकताही बदला!

By admin | Updated: April 24, 2017 00:21 IST

मंत्री आणि बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मोटारींवर झगमगणारे लाल, पिवळे आणि निळे दिवे कायमचे बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने

मंत्री आणि बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मोटारींवर झगमगणारे लाल, पिवळे आणि निळे दिवे कायमचे बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने, उशिरा का होईना, घेतला हे चांगले झाले. खरे तर या लाल-पिवळ्या दिव्यांवरून सामान्य नागरिकांच्या मनात बऱ्याच पूर्वीपासून चीड निर्माण झाली होती. कारण शहरांमधील गजबजलेल्या रस्त्यावरील वाहतूक बंद करून या लाल-पिवळ्या दिव्यांच्या गाड्यांमधून फिरण्याचे जे स्तोम माजले होते त्याने सामान्य नागरिक वैतागला होता. या दिवे लावलेल्या गाड्या हे ‘व्हीआयपी कल्चर’चे मुख्य साधन झाल्या होत्या. मोटारींवरील हे दिवे गेल्याने नेते आणि अधिकाऱ्यांचा अहंभाव, दंभ आणि मिजास यांना धक्का बसला आहे. हे धाडसी पाऊल उचलल्याबद्दल मी मोदीजींचे अभिनंदन करतो.जगभरातील सर्व देशांमधील ‘व्हीआयपी’ एकत्र केले तरी भारतातील ‘व्हीआयपीं’ची संख्या त्याहून शतपटींनी अधिक भरेल. ब्रिटनमध्ये ८४, फ्रान्समध्ये १०९, जपानमध्ये १२५, जर्मनीत १४२, आॅस्ट्रेलियात २०५, अमेरिकेत २५२, दक्षिण कोरियात २८२, रशियात ३१२ व चीनमध्ये ४३५ ‘व्हीआयपी’ आहेत. या तुलनेत भारतात तब्बल ५ लाख ७९ हजार ‘व्हीआयपी’ आहेत. त्यामुळे भारतात एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्तींना ‘व्हीआयपी’ का मानले जाते, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. लोकशाहीत सत्तेची सूत्रे सामान्य लोकांच्या हाती असतात, असे मानले जाते. त्यांच्याच मतांवर तर सरकार स्थापन होत असते. परंतु वस्तुस्थिती नेमकी याच्या उलट आहे, हे आपण सर्वजण जाणतो. मंत्र्यापासून खासदार, आमदार व नेत्यापर्यंत सर्वजण स्वत:ला जनतेहून वरचे मानतात व सामान्य माणसांमध्ये वावरतानाही दिसू नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. लाल, पिवळ्या व निळ्या दिव्यांच्या संस्कृतीत जन्माला येऊन लहानाची मोठ्या झालेल्या आजच्या पिढीला हे कदाचित माहीतही नसेल की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा रस्त्यावरून जात तेव्हा त्यांच्यासोबत पायलट म्हणून फक्त एक मोटारसायकलस्वार असे! इंदिराजी पंतप्रधान असताना त्यांच्या मोटारीसोबत केवळ एकच गाडी पायलट म्हणून असायची. एवढेच कशाला, मुंबईतही १९७० च्या दशकापर्यंत फक्त राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या मोटारींवर लाल दिवा असायचा. अन्य कोणाही मंत्र्याला मोटारीवर लाल दिवा लावायला परवानगी नव्हती. हल्ली साधा आमदारही पाच-सात गाड्यांचा ताफा सोबत घेतल्याशिवाय फिरत नाही. एखादा मंत्री जाणार असला की त्या रस्त्यावरची वाहतूक रोखली जाते व त्याचा त्रास सामान्य लोकांना होतो. तर मग हे लाल, पिवळे व निळे दिवे काढून टाकल्याने नेमके काय होईल? मला वाटते, याने फारसे काही होईल असे नाही. कारण शहेनशाही वर्तन हे मोटारींवरील दिव्यांवर नव्हे तर मानसिकतेवर अवलंबून असते. एखादा कलेक्टर किंवा कमिशनर एखाद्या गावात जातो तेव्हा एखादा राजा आल्यासारखे वातावरण असते. नेत्यांना दर पाच वर्षांनी मतदारांना सामोरे जायचे असते त्यामुळे त्याच्या मनात थोडीतरी धाकधूक असते. पण बड्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणीच नसते. मोदीजींनी याचाही विचार करायला हवा. काही अधिकारी याला अपवाद असतात. ‘व्हीआयपी कल्चर’ संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही जनतेचे मालक नाही तर सेवक आहात व सेवकांसारखेच राहा, याची सत्ताधीश व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाणीव करून द्यावी लागेल.३०-३५ वर्षांपूर्वी मागमूसही नसलेले हे ‘व्हीआयपी कल्चर’ एवढे फोफावले कसे, असा तुम्हाला प्रश्न पडेल. माजी कॅबिनेट सचिव बी. बालचंद्रन यांनी असे लिहिले होते की, याची सुरुवात प्रथम पोलीस दलातून झाली. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गाडीवर स्टार आणि झेंडा लावणे ही पहिली पायरी होती. मग सचिवालयात बसलेल्या अधिकाऱ्यांना वाटले की आपण तरी का मागे राहावे? त्यांनी हळूहळू नियम व कायदे बदलले आणि सरकारी मोटारींवर विविध रंगांचे दिवे आले. सत्तेत बसलेल्या नेत्यांनी आक्षेप घेऊ नये म्हणून त्यांच्याही गाड्यांवर दिवे लावण्याची सोय झाली. अशा प्रकारे रंगीबेरंगी दिव्यांचा बाजार सजला. हे रंगीत दिवे बघता बघता प्रतिष्ठेचे प्रतीक बनले. दिव्याच्या रंगानुसार प्रतिष्ठा ठरली. अशा प्रकारे नेते व अधिकारी सामान्य लोकांपासून दूर गेले. यासंदर्भात मला एक आठवण सांगावीशी वाटते. माझे बाबूजी स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा यांचा महाराष्ट्र मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथविधी होता. मंत्र्यांना लाल दिव्याची व भोंगा लावलेली मोटार दिली गेली. गाडीवरील लाल दिवा नीट चमकत नाही म्हणून एक मंत्री नाराज होते. ते लगेच बाजारात जाऊन नवा चमचमणारा लाल दिवा व जोरदार आवाजाचा भोंगा घेऊन आले व ते त्यांनी आपल्या मोटारीवर बसवून घेतले. जगात सर्वत्र आणीबाणीच्या सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरच असे रंगीत दिवे लावले जातात. कोणताही आणीबाणीचा प्रसंग नसताना एवढ्या रंगीबेरंगी दिव्यांच्या मोटारी मिरविणारा भारत हा एकमेव देश असावा. एक्स, वाय, झेड अशा न जाणो किती दर्जाच्या सुरक्षा व्यवस्था आहेत. जेवढी सुरक्षा जास्त, तेवढे महत्त्व जास्त. त्यामुळे यातही चढाओढ सुरू असते. मोदींनी मेट्रोमधून सफर केली तर ते दिवसभर टीव्ही चॅनेल्सवर दाखविले जाते. पण जगातील श्रीमंत देशांमधील एक असलेल्या नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रेते घरून आॅफिसला सायकलवरून जातात. मी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासोबत चीनला गेलो होतो. एका कार्यक्रमाला तेथील पंतप्रधानही होते. येताना ते सरकारी मोटारीने आले व परत जाताना सायकलवरून गेले. मी त्यांना ‘असे का’ विचारले. त्यावर चीनच्या पंतप्रधानांचे उत्तर होते की, गरज होती तेव्हा मोटारीने आलो. आता काम संपल्यावर घरी सायकलने जातोय! आपले अधिकारी आणि नेते असे एक तरी उदारहण घालून देतील?हे लिखाण संपविण्यापूर्वी...काँग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला ढासळला! लातूर महापालिका निवडणुकीत भाजपाला प्रथमच बहुमत मिळाले. गेल्या निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या भाजपाने यावेळी तेथे ३६ जागा जिंकल्या. ६५ वर्षांत लातूरमध्ये प्रथमच काँग्रेस पराभूत झाली. लोक घराणेशाहीला नाकारत आहेत. जन्मजात काँग्रेसी असल्याने याने मला गंभीर चिंता वाटणे स्वाभाविक आहे. सध्या दिवस भाजपाचे आहेत, असे म्हटले तरी काँग्रेसला एवढे काय झाले, याचेही उत्तर शोधावे लागेलच. नेमके काय चुकतेय ते समजून घ्यावे लागेल. सामान्य लोकांचा विश्वास काँग्रेस का बरं गमावून बसली आहे? आम्ही काँग्रेसवाले या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत की नाही?-विजय दर्डा(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)