शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धवल क्रांती प्रत्यक्षात व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 06:33 IST

केंद्र सरकारमध्ये रस्ते, महामार्ग, नौकानयन, जलसंधारण व गंगा कायाकल्प यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्रालयांची जबाबदारी शिरावर असूनही, नितीन गडकरी यांचे विदर्भाच्या मुद्यांकडे बारकाईने लक्ष असते. विदर्भाच्या मागासलेपणाची कारणे व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात गडकरींएवढा अभ्यास क्वचितच कुणाचा असावा! विदर्भावरील मागासलेपणाचा शिक्का मिटविण्यासाठी नेमके काय करायला हवे, यासंदर्भात अत्यंत स्पष्ट संकल्पना असलेल्या गडकरींनी, ...

केंद्र सरकारमध्ये रस्ते, महामार्ग, नौकानयन, जलसंधारण व गंगा कायाकल्प यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्रालयांची जबाबदारी शिरावर असूनही, नितीन गडकरी यांचे विदर्भाच्या मुद्यांकडे बारकाईने लक्ष असते. विदर्भाच्या मागासलेपणाची कारणे व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात गडकरींएवढा अभ्यास क्वचितच कुणाचा असावा! विदर्भावरील मागासलेपणाचा शिक्का मिटविण्यासाठी नेमके काय करायला हवे, यासंदर्भात अत्यंत स्पष्ट संकल्पना असलेल्या गडकरींनी, सोमवारी विदर्भातील अत्यल्प दूध उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली. नागपुरात १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ या कृषीविषयक संमेलनाच्या अखेरच्या दिवशी आयोजित ‘विदर्भाचा दुग्ध विकास’ या परिषदेच्या उद्घाटन सत्रास संबोधित करताना, गडकरींनी राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत विदर्भ दूध उत्पादनात किती मागे आहे, हे आकडेवारीसह स्पष्ट केले. एकट्या पुणे जिल्ह्यात ३५ लाख लिटर, कोल्हापुरात २८ लाख लिटर, तर सांगलीत १७ लाख लिटर दुधाचे दररोज उत्पादन होते. तुलनेत विदर्भातील ११ जिल्ह्यांचे एकत्रित दूध उत्पादन किती? केवळ आठ लाख लिटर! या पार्श्वभूमीवर, विदर्भाचे आर्थिक चित्र बदलायचे असल्यास धवल क्रांती घडवावी लागेल, अशी मांडणी गडकरींनी केली. भूतकाळातही गडकरींसह अन्य अभ्यासकांनीही दूध उत्पादन विदर्भाचे आर्थिक चित्र पालटवू शकते, असे मत व्यक्त केले आहे. गत दोन-तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारने त्या दिशेने काही पावलेही उचलली आहेत. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी), अमूल, मदर्स डेअरी अशा दुग्धोत्पादन क्षेत्रातील बडी नावे असलेल्या संस्थांना विदर्भातील दुग्ध विकासासाठी सहभागी करून घेण्यात आले आहे. दुर्दैवाने अद्याप तरी, रोगनिदान झाले; पण रुग्ण खाटेवरच, अशीच स्थिती आहे. कृषी व ग्राम विकासासाठी कार्यरत नाबार्डने दहा वर्षांपूर्वी केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला होता, की गुजरातमधील ‘आॅपरेशन फ्लड’च्या धर्तीवर विदर्भात सहकारी दूध संस्थांची उभारणी केल्यास, विदर्भातील शेतकरी आत्महत्यांना आळा घालता येईल. दुर्दैवाने आमच्या देशात अभ्यास खूप होतात; मात्र त्यामधून निघालेल्या निष्कर्षांच्या आधारे प्रत्यक्षात काम काही होत नाही. त्यामुळेच नाबार्डच्या अभ्यासास एक दशक उलटून गेल्यावर, गडकरींना त्या अभ्यासाचा निष्कर्ष पुन्हा एकदा मांडावा लागला. किमान यापुढे तरी हा विषय केवळ अभ्यास व भाषणांपुरता मर्यादित राहणार नाही आणि विदर्भात दुग्धोत्पादन वाढून शेतक-यास आर्थिक बळ लाभेल, अशी अपेक्षा करावी का?

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी