शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हा खरा दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 00:21 IST

न्यायालयाने घेतलेल्या निर्णयांची तमा न बाळगता उलट सतत संघर्षाचीच भूमिका घेत राहण्याची प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची आणि या न्यायालयाने घेतलेल्या निर्णयांची तमा न बाळगता उलट सतत संघर्षाचीच भूमिका घेत राहण्याची प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के या दोहोंची त्यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्याचा जो निर्णय सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांनी सुनावला आहे, त्याला म्हणायचे, खरा दणका. एकाचवेळी सोन्याची असंख्य अंडी देण्याची क्षमता असलेल्या देशातील क्रिकेटच्या खेळाचे नियंत्रण करणाऱ्या मंडळात जे असंख्य गैरव्यवहार राजरोस सुरु होते ते जेव्हां न्यायालयाच्या दारी गेले तेव्हां सर्वोच्च न्यायालयाने देशाचे एक माजी सरन्यायाधीश राजेंद्रमल लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. मंडळातील गैर कारभाराला आळा घालण्यासाठी नेमक्या काय सुधारणा कराव्या लागतील याची शिफारस करण्याचे कार्य लोढा समितीकडे सुपूर्द करण्यात आले होते.

त्यानुसार समितीने आपला अहवाल सादर केला आणि केवळ मंडळाच्या राजकारणात व अर्थकारणात स्वारस्य असलेले लोक वगळता देशातील सर्वच लोकांनी अहवालातील शिफारसींचे स्वागत केले. ते इतके स्वागतार्ह ठरले की या आणि अशाच शिफारसी बाकीच्या खेळांच्या समित्यांनादेखील लागू केल्या जाव्यात अशी मागणी होऊ लागली. न्या. लोढा समितीने ज्या शिफारसी केल्या होत्या, त्या अंमलात आणण्याचे उत्तरदायित्वदेखील नंतर न्यायालयाने न्या. लोढा यांच्याकडेच सुपूर्द केले. पण मंडळाची भूमिका प्रथमपासून आडमुठेपणाचीच होती. ती बदलावी आणि शिफारसी लागू करण्यासाठी मंडळाने आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन आणि नंतर तसे आदेशदेखील सर्वोच्च न्यायालयाने जारी केले. पण त्याचा काहीही लाभ न झाल्याने अखेर शेवटी न्यायालयाने ज्याला कठोरतम म्हणता येईल असा निर्णय घेतला आहे.

न्यायालयाने मंडळास संलग्न असलेल्या देशभरातील सर्व राज्यांमधील क्रिकेट संघटनादेखील बरखास्त केल्या आहेत. त्याचबरोबर न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ फली नरीमन आणि गोपाल सुब्रह्मण्यम यांना कायदामित्र (अ‍ॅमिकस क्युरी) म्हणून नियुक्त केले असून मंडळाचा कारभार चालवू शकतील अशा लोकांची नावे सुचविण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविले आहे. न्यायालयात आपली बाजू मांडताना आणि न्या. लोढा समितीसमोर युक्तिवाद करताना ठाकूर-शिर्के यांनी त्यांच्या साक्षी फिरविल्या आणि न्यायालयाची बेअदबी केली असाही एक ठपका आता त्यांच्यावर ठेवला गेला असून तशी नोटीसदेखील न्यायालयाने जारी केली आहे. अनुराग ठाकूर भाजपाचे विद्यमान खासदार आहेत तर अजय शिर्के शरद पवारांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. सत्तरी पार केलेल्यांवर सक्तीची निवृत्ती लादणारी लोढा समितीची शिफारस मान्य करुन पवारांनी याआधीच मंडळाच्या कारभारातून आपले अंग काढून घेतले आहे.