शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पोट भरावं म्हणे पोस्ट वाचून !

By सचिन जवळकोटे | Updated: August 9, 2018 03:51 IST

मोबाईलमध्ये धडाधड मेसेज पडू लागले, तसे पिंटकराव खडबडून जागे झाले.

मोबाईलमध्ये धडाधड मेसेज पडू लागले, तसे पिंटकराव खडबडून जागे झाले. ‘आता आज कुठला डे ?’ म्हणत त्यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ उघडलं. उठसूठ दुसऱ्याच्या मातोश्रींचा उद्धार करणाºयांना जेव्हा आईच्या ममत्वाचा उमाळा येतो, त्या दिवशी ‘मदर डे’ असतो. एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांनाही दोस्तीपायी गहिवरून येतं, तो ‘फ्रेंडशीप डे’ असतो. हे याच ‘व्हॉट्सअ‍ॅप’नं शिकवलेलं.एकेक पोस्ट बघताना ‘झटकन् उठल्यास हार्टअटॅक येतो,’ हा मेसेज त्यांनी वाचला. ते पुन्हा घाबरून आडवे झाले. पंधरा-वीस मिनिटं बेडवरच हातापायाचा व्यायाम करून ते उठले, तेव्हा त्यांची पत्नीही ‘सकाळी चहा प्यावा की लिंबू पाणी?’ ही पोस्ट वाचण्यात किचनमध्ये मग्न होती. ‘रोज चहा पिल्यानं शरीरात अखंड ऊर्जा राहते, अशी एक पोस्ट मी वाचलीय,’ असं त्यांंनी सांगताच ‘चहामुळे हृदयविकाराची शक्यता अधिक असते,’ ही पोस्ट जोरात वाचून पत्नीनं त्यांना केवळ ग्रीन-टी पाजला.बाथरूममध्ये जाऊन त्यांनी शॉवर सुरू केला, मात्र काहीतरी आठवलं. बाहेर येऊन पोस्ट वाचली, ‘गरम पाणी पोटात... तर थंड पाणी अंगावर घ्यावं,’ मग कुडकुडत्या थंडीतही त्यांनी थंड पाण्याचा बाथ घेतला. एवढ्यात शिंका आल्यानं तोंडाला टॉवेल लावावा म्हणेपर्यंत बायको ओरडली, ‘कॉटनचा वापरा. कालच पोस्ट पडलीय तशी.’नाक पुसून कपडे नेसत ते ड्युटीला निघाले, तेव्हा हातात भरगच्च टिफीनही आला. ‘पावसाळ्यात सिझनेबल भाज्या खाव्यात, असं मी कालच वाचलंय,’ बायकोकडून नवी माहिती ऐकत ते गुपचूपपणे बसस्टॉपवर पोहोचले. मात्र, बस गेल्याचं कळताच चालत निघाले... कारण ‘रोज किमान ९७४६ पावलं चालावीत. दीर्घायुष्य लाभतं,’ ही पोस्ट कधी तरी त्यांच्या नजरेस पडलेली. चालून-चालून पाय दुखू लागले. वाटेत मेडिकल दुकानात पेनकिलर गोळी मागितली. मात्र, ‘यामुळे किडनी फेल होते,’ अशी पोस्ट वाचल्याचं त्यांना आठवलं.गोळीचा नाद सोडून शेवटी रिक्षानं आॅफिस गाठलं. ‘लंच टाईम’ला टिफीन उघडणार, एवढ्यात एक सहकारी म्हणाला, ‘आजपासून मी दिवसातून फक्त दोन वेळा जेवणार. दोन्हींमध्ये किमान सात तासांची गॅप पाहिजे. कालच एका डॉक्टरांचा सल्ला वाचलाय,’ पिंटकरावांनीही गुपचूप उकडलेल्या भाज्यांचा डबा बाजूला सारला. मात्र, शेजारच्या टेबलावरच्या मॅडमनी तो डबा चाटून-पुसून खाल्ला, कारण ‘दर दोन तासांनी काहीतरी खाल्लंच पाहिजे,’ असं म्हणे त्यांनी वाचलेलं. दिवसभर उपाशीपोटीच काम करणारे पिंटकराव आॅफिस सुटताच बाहेर पडले. फूटपाथवरची किमान पाणीपुरी तरी खावी, असं क्षणभर त्यांना वाटलं. मात्र चौपाटीवरचा तो ‘शिवांबू’ व्हिडीओ डोळ्यासमोर येताच त्यांना ओकारी आली.आजूबाजूच्यांना वाटलं, ‘हा पक्का बेवडाऽऽ,’ लोकांच्या नजरेतली किळसवाणी भावना बघून त्यांना मेल्यासारखं झालं. जीव द्यावा, असा निर्धारही झाला; ‘पण सुटसुटीत कसं मरायचं?’ याचं उत्तर काही त्यांना कोणत्याच पोस्टमध्ये सापडलं नाही. शेवटी खवळून समोरचा ‘बार’ पकडला. ‘रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास आयुष्य कमी होतं,’ या पोस्टवर मात्र खळखळून हसत रात्री उशिरापर्यंत इथंच मुक्काम ठोकण्याचा मेसेज त्यांनी बायकोला पाठवून दिला.