शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

राम मंदिर की रामराज्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 06:23 IST

रामाने लंका जिंकल्यानंतर ती बिभीषणाच्या हाती सोपविली. त्याला सत्तेची हाव नव्हती. आता विरोधक संपुष्टात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दमन नीती अवलंबली जाते. विरोधक नको असतात.

संकटसमयी राम आठवला तर त्यात नवल काय? आता तर निवडणुकाच तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच रामाची आठवण होणे साहजिकच आहे. नाही तरी भुताखेतांची भीती वाटताच रामरक्षा आठवते तसाच हा प्रकार. म्हणून देशाच्या राजकारणाचे सारे ध्रुवीकरण राम आणि राम मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहे. शिवसेनेने थेट अयोध्येवर ‘स्वारी’ केली आणि भाजपाला चिमटीत पकडले. हे वरवरचे आहे की खरोखरच मंदिराचा कळवळा हे लवकरच स्पष्ट होईल; पण थोरल्या पातीने अयोध्येची वाट धुंडाळली त्या वेळी धाकट्या पातीने रामराज्याचे व्यंगचित्र काढून या ‘स्वारी’तील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

या व्यंगचित्रातून ‘रामराज्य’ मागितले होते ‘राम मंदिर’ नव्हे, असे सांगण्यात आले. थोडक्यात, रामराज्य म्हणजे रामाचे राज्य नव्हे तर राम जीवनभर जी मूल्ये घेऊन जगला त्याचा आविष्कार. रामराज्यात राजा आणि प्रजा सारे समान होते. जात, कर्म या आधारावर कोणाचे शोषण होत नव्हते. रामाने शबरीची उष्टी बोरे चाखली ही कृती समानतेची होती. आजच्या गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकीय नेत्याचे वर्तन असेच आहे का? रामराज्यात राजाची प्रजेला भीती, दहशत वाटत नाही. राजा हा लोकसेवक असतो, लोक त्याच्यावर उघड टीका करू शकतात. आज राजकीय नेत्याच्या विरोधात उभे राहणाऱ्या सामान्य माणसाची काय अवस्था होते? सरकारच्या विरोधात भूमिका घेणाºया पत्रकारांची कशी ‘व्यवस्था’ लावली जाते, हे आम्ही पाहिलेच आहे. राजाची खप्पा मर्जी होईल म्हणून अनेक मंत्रीसुद्धा गप्प बसणे पसंत करतात. होयबा संस्कृतीचा सर्वत्र बोलबाला दिसतो. स्त्रीदाक्षिण्य हे रामराज्याचे वैशिष्ट्य. असहाय्य अहिल्येला रामाने मदत केली तर मर्यादा ओलांडणाºया शूर्पणखेला शिक्षा दिली. वर्तमानकाळात देशात महिला सुरक्षित आहेत का? त्यांना निर्भयपणे जगता येत आहे का? जागतिक अहवालाने वास्तव उघड केलेच आहे. रामराज्यात शांतता महत्त्वाची असल्याने युद्ध, अत्याचाराच्या विरोधात राजा असतो. देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एका अर्थाने हे राजकीय युद्धच म्हणता येईल.

रामराज्याच्या कल्पनेप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतरही देशात शांतता राखणे हे राजाचे कर्तव्य; पण निवडणुकीपूर्वीच अशांतता निर्माण होते, समाजात दुही माजविण्याचे प्रयत्न होतात. धर्म, जातीच्या आधारावर मतांचे विभाजन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतात. रामराज्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि कला या विषयांना विशेष प्राधान्य दिले जाते. जनतेला चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पण आजचे चित्र एकदम विपरीत आहे. शिक्षण, आरोग्य या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दोघांचाही दर्जा घसरला. उपचाराअभावी मृत्यूच्या घटना घडतात. या दोन गोष्टी समाजातील प्रभावी व श्रीमंतांसाठीच आहेत असे दिसते. रामाला वनवासात जाण्याची आज्ञा झाली त्या वेळी सीतेने राज्यकारभार करावा असे रामाने सुचविले. यातून रामाने रामराज्यातील स्त्रियांचे स्थान स्पष्ट केले होते. आजचा ताजा संदर्भ म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून भाजपाच्या नेत्या म्हणून वावरणाºया सुषमा स्वराज यांनी लोकसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला.

गेली साडेचार वर्षे त्या नामधारी परराष्ट्रमंत्री आहेत हे दिसतेच. ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ म्हणजे चुकीच्या कामासाठी आश्वासनांची साखरपेरणी नको, हे रामराज्याचे ब्रीदवाक्य. चार वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने ही केवळ सत्ता संपादनासाठी साखरपेरणी होती हे सिद्ध झाले. रामाने वनवासाचा बहुतांश काळ पंचवटीत व्यतीत केला त्या एकमेव सत्ता असलेल्या नाशकातही रामराज्य आणता आले नाही. इथे सत्ता कोणाची, तर मनसेची. सेनेला सल्ला देणाºया व्यंगचित्रकारांना स्वत:च्या नाशकातही ते जमले नाही. इथे भाजपाने तर काय केले? जनतेच्या हितासाठी झटणाºया तुकाराम मुंढेंना बदलीची शिक्षा दिली. आजही राजकारणाच्या केंद्रस्थानी सामान्य माणूसच आहे. सगळ्या योजना सरकार त्यांच्यासाठीच राबवताना दिसते; पण लाभ त्याला मिळत नाही. त्याच्या योजनांच्या कुरणात चरणारे वळू वेगळेच असतात आणि रामराज्यात त्यांना स्थान नसते.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्या