शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

रेल्वे, एसटीचा ‘पाणीमंत्र’!

By admin | Updated: May 1, 2016 03:27 IST

मराठवाड्यातील बहुतांश भागात तसेच विदर्भातील काही भागांमध्ये यंदा दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. मुंबई आणि परिसरात दुष्काळी स्थिती नसली तरी या दुष्काळाचा दाह समजून

- सुशांत मोरेमराठवाड्यातील बहुतांश भागात तसेच विदर्भातील काही भागांमध्ये यंदा दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. मुंबई आणि परिसरात दुष्काळी स्थिती नसली तरी या दुष्काळाचा दाह समजून घेण्याचा प्रयत्न मुंबईतील संवेदनशील व्यक्ती तसेच संस्थांकडूनही होत आहे. पाण्याचे मोल अनमोल आहे, त्यामुळे पाणी वाचवण्याची मोहीम सध्या मुंबई महानगरांत तीव्र झाली आहे. पाण्याचा वापर जपून करा, असे संदेश सर्वत्र दिले जात आहेत. आपापल्या पातळ्यांवर पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न जाणून घेण्याचा प्रयत्न ‘टीम लोकमत’ने केला. त्यातील काही कौतुकास्पद असे प्रातिनिधिक प्रयोग खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी....दुष्काळाची झळ रेल्वे व एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीलाही बसत आहे. पाण्याची कमतरता पाहता रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळाने पुढाकार घेत दैनंदिन कामात लागणाऱ्या पाण्याच्या वापरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल, स्थानके येथे पाण्याचा जपून वापर केला जात आहे. तर एसटीकडूनही बसगाड्या, आगार, स्थानके येथे पाण्याचा अपव्यय टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. एसटी जेथे जेथे कॅन्टीन चालवते तेथेही पाणी वापरावर बरीच बंधने घालण्यात आली आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून तर भविष्यात रेल्वेला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारे प्रकल्प उभारले जात आहेत. मध्य रेल्वेला एक लोकल धुण्यासाठी साधारणपणे दर दिवशी १० हजार लीटर पाणी लागते. दर दिवशी आठ लोकल धुतल्या जातात. मेल-एक्स्प्रेसचा प्रत्येक डबा धुण्यासाठी तर २,५०० ते ३००० लीटर पाणी मध्य रेल्वेला लागते. मात्र आता पाणीटंचाईमुळे रेल्वेने यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डबे न धुता ते ओल्या फडक्याने पुसण्याचा निर्णय घेतला आहे. तर जेथे गरज असेल तेथेच पाण्याचा वापर करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे दर दिवशी चार ते पाच हजार लीटर पाण्याची बचत होत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेतही डबे धुण्याऐवजी डबे पुसले जात आहेत. पश्चिम रेल्वेला एक लोकल धुण्यासाठी ७ ते ८ हजार लीटर पाणी प्रत्येक दिवशी लागते. अशा तऱ्हेने दहा लोकल दर दिवशी या मार्गावर धुण्यात येत होत्या. मात्र आता डबे पुसण्यात येत असल्याने जवळपास चार हजार लीटर पाण्याची बचत होत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. पश्चिम रेल्वे मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे प्रत्येक डबा धुण्यासाठी ३,५०० लीटर पाणी लागते. आता यात कपात केल्याने फक्त एक हजार ते १५०० लीटर एवढेच पाणी लागत असल्याचे ते म्हणाले.एसटी महामंडळाने उपलब्ध पाण्याचे नियोजन करून काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आदेश सर्व आगार, बस स्थानके व सर्व प्रशासकीय कार्यालयांना दिले आहेत. पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणविरहित ठेवण्यात यावेत, आगार कक्षेतील बस स्थानके, उपाहारगृहे, प्रसाधनगृहे येथील पाण्याचे नळ सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेतली जावी, चालक-वाहक विश्रांतीगृहे व एसटी बसगाड्या धुलाई यंत्रे येथील पाणी साठविण्याच्या टाक्या दररोज तपासून पाण्याची गळती होत नसल्याची खात्री करून देण्याच्या आदेशाचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता असेल, अशा ठिकाणी एसटी बसगाड्या स्वच्छ झाडून काढाव्यात आणि बस स्थानकांवर स्वच्छतेसाठी कमीत कमी पाण्याचा वापर करतानाच फिनेलसारख्या द्रावणाचा पुरेशा प्रमाणामध्ये वापर करण्याचे आदेशही एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेचा प्रकल्प विरारमध्येपश्चिम रेल्वेकडूनही पाण्याचा पुनर्वापर करणारा प्रकल्प विरारमध्ये उभारण्यात आला आहे. त्याची क्षमता दिवसाला जवळपास २ लाख लीटर आहे. याचबरोबर वांद्रे येथे पाणी पुनर्वापर प्रकल्प उभारला जाणार आहे. जानेवारी २०१७ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू होईल. १० लाख लीटर पाण्याची क्षमता येथे असेल. हा प्रकल्प मार्च २०१८ पर्यंत पूर्ण केला जाणार असून त्यासाठी साधारपणे ५ कोटी ७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मरेवर येथेही होणार प्रकल्पसीएसटी स्थानक - साडेचार लाख लीटर पाणी(हा प्रकल्प दोन ते तीन महिन्यांत सुरू होईल)सोलापूर : ५ लाख लीटर पाणीनागपूर : ५ लाख लीटर पाणीपुणे : ५ लाख लीटर पाणीभुसावळ : ५ लाख लीटर पाणी