शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

रफी... शाहीदने सांगितलेली बापाची गोष्ट...

By गजानन जानभोर | Updated: January 2, 2018 00:10 IST

मोहम्मद रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात ते कुठेच येत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो.

तो मोहम्मद रफींचा मुलगा. मोठ्या माणसांच्या मुलांच्या वाट्याला येणारे वलय आपसूक त्याच्याही भोवती. वडील सर्वोत्तम गायक़ चाहत्यांसाठी साक्षात परमेश्वरच. त्यामुळे त्यांच्याही मुलाने गायकच व्हावे, ही सा-यांचीच अपेक्षा. पण, त्याने या वाटेने येऊ नये असे रफींना वाटायचे. चार भावंडांमध्ये तो सर्वात लहान, शाहीद. तो १९ वर्र्षांचा असताना मोहम्मद रफी गेले. अब्बांच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कुमारच्या कुशीत तो दिवसभर रडत होता. नंतर सावरला, पण वडिलांसारखेच गाण्याचे दडपण न पेलवणारे... त्याने हे ओझे काही दिवस वाहून बघितले, संगीतकार-निर्मात्यांकडे गेला. पण, निराश झाला. शेवटी त्याने गाणे थांबवले. स्वत:च्या आनंदासाठी आणि अब्बांच्या नामस्मरणासाठी मात्र तो नियमित गायचा, अजूनही गातो...शाहीद परवा नागपुरात भेटला आणि मनातले सारे सच्चेपण त्याने प्रकट केले. मायावी दुनियेतील गळेकापू स्पर्धेत आपली मुले टिकू शकणार नाहीत, ही भीती मोहम्मद रफींना वाटायची. गुणवत्ता असूनही आपल्याला सोसावे लागले ते मुलांच्या नशिबी येऊ नये ही त्यांची कळकळ. रेकॉर्डिंगच्या वेळीही मुलांना ते थांबू देत नव्हते. मुले थोडी मोठी झाली आणि रफींनी त्यांना शिक्षणासाठी लंडनला पाठवले. शाहीदची इच्छा नव्हती. शाळेतील मुले म्हणायची ‘तुझे अब्बा खूप छान गातात, तू का गात नाहीस?’ मग त्यालाही वाटायचे आपणही त्यांच्यासारखेच गावे. काहीशा अनिच्छेनेच तो लंडनला गेला...रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. एरवी असे होत नाही. प्रतिभावंतांची मुले दडपणात वाढतात. आई-वडील, घरातील वातावरण त्यांना स्वतंत्रपणे उमलू देत नाही. मुलांची वाढ आपणच अशी खुंटवून टाकतो. ‘तुला काय व्हायचे आहे?’ असा प्रश्न यापैकी कुणी आपल्या मुलांना कधी विचारला असेल? काही कळायच्या आतच सचिनने अर्जुनच्या हातात बॅट दिली, राजीव कपूरला वडील राज कपूर फरफटतच राम तेरी गंगा मैलीत घेऊन आले. फरदीन खान, बॉबी देवोल हीही अशीच खुरडलेली व्यक्तिमत्त्व. मनाजोगत्या क्षेत्रात ते गेले असते तर यशस्वी ठरले असते. अभिषेक या मायावीनगरीत तग धरू शकणार नाही, ही कल्पना अमिताभ यांना खरंच आली नसेल का? ‘गायिका व्हावे, असे तुला मनापासून वाटते का’? असा प्रश्न हृदयनाथ मंगेशकरांनी मुलगी राधाला कधीच विचारला नसेल. अभिनयातील टुकारपण सिद्ध झाल्यानंतर तुषार कपूरला पडद्यावर मुकेपण स्वीकारावे लागले ही खंत जितेंद्रला वाटत नाही का? असे असंख्य प्रश्न शाहीदशी बोलताना मनात उभे राहतात. रफींनी या आई-बाबांसारखी चूक केली नाही. शाहीदला त्याच्यासारखेच होऊ दिले, स्वत:सारखे नाही. तो यशस्वी उद्योजक होऊ शकला, तो त्यामुळेच. गाणे ही शाहीदची आवड होती. ती आजही आहे. पण, तिला उदरनिर्वाहाचे साधन होऊ दिले नाही.गाण्याबद्दल अब्बांमध्ये असलेले समर्पण आपल्यात नाही, ही जाणीव शाहीदला हरक्षणी व्हायची. ‘‘अब्बांनी मला माझे मीपण दिले’’ असे सांगताना शाहीद गहिवरतो. आपल्या मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात मात्र ते कुठेच येत नाही. आपल्या वात्सल्याचाही तो भाग होत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग बाप म्हणूनही ग्रेट ठरतो. 

टॅग्स :musicसंगीत