शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

गोव्यात ‘प्रॉपर्टी’? - तुम्ही इकडे नाही आलात, तरच बरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2024 08:02 IST

दोनशे वर्षे जुनी पोर्तुगीजकालीन घरे ‘सेकंड होम’ म्हणून विकत घेण्याचा सपाटा लावलेले धनिक आणि बेजबाबदार पर्यटकांना गोयंकार वैतागले आहेत!

सदगुरू पाटील, संपादक, लोकमत, गोवा

गोवा हे फक्त सोळा लाख लोकसंख्येचे राज्य. मनाला मोह पाडणारे रूपेरी वाळूचे समुद्रकिनारे, फेसाळत्या लाटा, किनाऱ्यावर मस्त डुलणारे माड, मासेमारीत व्यस्त असलेल्या होड्या, सुशेगाद (आरामदायी) जीवनशैली, पांढरीशुभ्र चर्चेस आणि सुबक बांधणीने नटलेली मंदिरे हे सगळे म्हणजे गोवा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तेरा-चौदा वर्षांनी गोवा मुक्त झाला. पोर्तुगीजांची साडेचारशे वर्षे राजवट या प्रदेशात होती. साहजिकच येथील वास्तुशास्त्रावर त्या संस्कृतीचा प्रभाव  आहे. 

सासष्टी, मुरगाव, बार्देश व तिसवाडी या चार तालुक्यांमध्ये पोर्तुगीजकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली अनेक घरे दिसून येतात. ही घरे विकत घेण्यासाठी आता जगभरातील धनिकांमध्ये स्पर्धा लागली आहे. मूळ गोमंतकीय व्यक्तीला गोयंकार म्हटले जाते. या गोयंकारांना गोव्यावर होणारे धनिकांचे अतिक्रमण आता छळू लागले आहे. सेकंड होम कल्चर गोव्यात प्रचंड वेगाने वाढत चालल्याने आपली अस्मिता व संस्कृती धोक्यात येते ही गोयंकारांची वेदना आहे. याच वेदनेतून आता पर्यटकांचा उपद्रवही लोकांना नकोसा वाटू लागला आहे.

गेल्या आठवड्यात गोवा सरकारच्या यंत्रणेने काही विंधनविहिरींना (बोअर वेल्स) टाळे ठोकले. उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील डोंगरावर वीस-पंचवीस गर्भश्रीमंत परप्रांतीयांनी बंगले बांधले आहेत. यात दक्षिण भारतातील सिनेकलाकारांचा समावेश आहे. त्यासाठी खोदलेल्या विंधनविहिरींमुळे गावातील लोकांना पाण्याची समस्या जाणवू लागली. पंचायत क्षेत्रातील ग्रामसभेत विषय गाजला. सरकारी यंत्रणेने त्यावर कारवाई केली. दिल्ली, मुंबई, पुणे, हरयाणा, बंगळुरूमधील मोठे बिल्डर्स गोव्यात जमिनी खरेदी करत आहेत, मोठ्या प्रमाणावर डोंगरफोड चालू आहे.  भराव टाकून शेतजमिनी बुजविल्या जात आहेत. अनेक आरटीआय कार्यकर्त्यांनी अलीकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. बांबोळी व परिसरात परप्रांतीय धनिकांच्या उपद्रवाविरुद्ध आमदार वीरेश बोरकर व इतरांनी आवाज उठवला आहे. गोवा विधानसभेतही यापूर्वी हा विषय उपस्थित झालेला आहे.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  एक महत्त्वाची कायदा दुरुस्ती अलीकडेच केली. परप्रांतीयांना गोव्यात शेत जमिनी खरेदी करणे शक्य होऊ नये म्हणून ही कायदा दुरुस्ती केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

देशातील बडे राजकीय नेते, उद्योजक, बॉलिवूड व टॉलिवूड स्टार, नावाजलेले क्रिकेटपटू, काही स्मगलर्स यांचे बंगले, सदनिका गोव्यात आहेत. सुट्ट्या घालविण्यासाठी ते गोव्यात येतात व आपल्या सेकंड होममध्ये राहतात. समुद्राचे विहंगम दृश्य पाहता यावे म्हणून अनेक धनिकांनी गोव्यातील डोंगरांवर किंवा किनाऱ्यांवर बांधकामे केली आहेत. याच विषयावरून स्थानिकांमध्ये मोठा रोष आहे. असेच चालू राहिले, तर आपल्याला भविष्यात गोव्यात घर किंवा जमीन खरेदी करणे परवडणारच नाही अशी भीती गोमंतकीयांना वाटते. आताच मिरामार, दोनापावल, कळंगुट, कांदोळी, बागा अशा जगप्रसिद्ध किनारपट्टीत मूळ गोमंतकीयाला भूखंड खरेदी करणे परवडतच नाही. दोनशे वर्षे जुनी आकर्षक पोर्तुगीजकालीन घरे विकत घेण्याची टुम सध्या निघाली आहे. युरोपियन संस्कृतीचे आकर्षण असलेले देशभरातील धनिक ही घरे  खरेदी करून त्यांचे नूतनीकरण करत आहेत. परप्रांतांमधून येणारे बडे लोक जर गोव्यात स्थायिक होऊ लागले तर आपले अस्तित्व धोक्यात येईल ही चिंता गोयंकारांना सतावते. 

वर्षभरात सुमारे कोटीभर पर्यटक गोव्यात येतात. राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असली, तरी पर्यटकांच्या उपद्रवाला आता स्थानिक त्रासले आहेत. बाटल्यांचे ढीग आणि कचऱ्याचे डोंगर नकोसे झाले आहेत. गोव्यातील कळंगूट या ग्रामपंचायतीने नुकताच पर्यटकांवर कर लावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वादाचा ठरला पण गोवा आता पर्यटकांचा उपद्रव खपवून घेण्याच्या स्थितीत नाही असा संदेशच या प्रकरणाने  दिला आहे.  sadguru.patil@lokmat.com 

टॅग्स :goaगोवा