शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रपंच आणि परमार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 00:17 IST

प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो.

- प्रज्ञा कुलकर्णीप्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे प्रपंच नेटका करूनच परमार्थ साधता येतो. किंबहुना परमार्थ साधणे म्हणजेच प्रपंचाचा तोलबिंदू आर्थिक, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर उत्तमरीत्या सांभाळणे होय. आर्थिक स्थिती चांगली असो की बेताची असो, त्याचा परमार्थ साधण्याशी काही संबंध नसतो. प्रापंचिक स्थिती कशीही असली, तरी आपली मानसिकता जर पारमार्थिक असेल; तर तिथे प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधला जातो. प्रपंचाला कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थच करण्याने प्रपंचही नेटका होणार नाही. एखाद्याने प्रपंच सोडून जर परमार्थातच झोकून देण्याचे ठरवले तर त्यांचे उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही. त्याला हवी असलेली मन:शांती कधी लाभणार नाही. प्रपंच सोडणे, प्रपंचातील कर्तव्यांकडे पाठ फिरवणे, प्रापंचिक जबाबदाऱ्या नाकारणे म्हणजे केवळ पळपुटेपणा आणि भेकडपणाच होय. या सर्व जबाबदाºया पेलण्यास आणि पार पाडण्यास आपण असमर्थ आहोत, हे एक प्रकारे सिद्ध करणेच होय. समतोल राखण्याचे कौशल्य अंगी बाणवावे लागते. हे साध्य करणे अवघड आहे, पण ते अशक्य अजिबात नाही. प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थसन्मुख कधीच होता येणार नाही. परमार्थ साधण्यासाठी मन स्थिर, शांत, तृप्त असावयास पाहिजे. आपल्या मनात अपराधीपणाची बोच, असमाधान, अतृप्तता असेल, मन अस्थिर, चंचल असेल तर ते मन परमार्थी कधीच रमणार नाही. काही केल्या ते स्थिर, समाधानी होणार नाही. काहीच साध्य न होता अशांत सागरात मन सतत गटांगळ्या मात्र खात राहील. त्यातून हाती काहीच लागणार नाही आणि नैराश्य, वैफल्य मात्र पदरी पडेल. या सगळ््या चक्रातून अनेक प्रश्न निर्माण होतील तसेच समस्या उभ्या ठाकतील. संपूर्ण प्रपंचाकडे, संसारी व्यापाकडे पाठ फिरवून, प्रापंचिक प्रश्नांना कंटाळून परमार्थ साधता येणार नाही आणि केवळ परमार्थ साधून प्रपंचही नीटनेटका होणार नाही, हे ज्याला कळेल आणि जो या दोन्हींचा समतोल उत्तमरीत्या सांभाळेल, त्यालाच प्रपंच आणि परमार्थातला गर्भितार्थकळेल. त्यामुळे या सगळ््या प्रक्रियेतील फरक लक्षात घेऊन याकडे पाहावयास हवे. तेव्हा त्याचे जगणे अर्थपूर्ण होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या