शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:12 IST

नुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे.

- प्रा. संदीप ताटेवारनुकत्याच प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील बातम्यात सांगितले की डॉक्टरांनी ३० वारकरी रुग्णांना सलग दहा दिवस रोज नऊ मिनिटे शांत बसून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लावले व दहा दिवसानंतर केलेल्या चाचण्यात त्यांचा रक्तदाब, हृदयाचे ठोके व इको रेशोमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे. भगवंताच्या नामस्मरणाने हृदयावर कसे सकारात्मक परिणाम होतात याबाबत काही संशोधन लेखसुद्धा आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. मनापासून विठ्ठल शब्द उच्चारल्याने अनाहृत चक्रावर म्हणजेच हृदयावर याचा परिणाम होतो व हृदयाच्या ऊर्जेत वाढ होते असे चाचण्यात सिद्ध झाले आहे. भगवंताच्या नामस्मरणाच्या स्पंदनात शक्ती आहे व त्याच्या नामस्मरणाने विघ्न दूर होतात ही मान्यता अध्यात्मामध्ये बºयाच संत महात्म्यांनी मांडली आहे. म्हणूनंच संत कान्होपात्राने असाच अनुभव विशद केला आहे. ते म्हणतात,नामे दोष जळती । नामे प्राण उद्धरती ।।हे ते आले अनुभवा । सत्य जीवा प्रत्यया ।।म्हणजेच नामस्मरणाने मानवी जीवनातील दोष नाहीसे होतात व जीवनाचा उध्दार होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा,पुण्याची गणना कोण करी।भगवंताच्या नामस्मरणाने मनाला शांती मिळते, सकारात्मक विचार वाढीस लागतात, मन सशक्त होते व दु:खावर मात करण्याची शक्ती नामस्मरणानीच येत असते. नामस्मरण हे मनापासून करणे आवश्यक आहे. त्यामागे श्रद्धा, निष्ठा, लीनता, अनन्यता, अखंडता आवश्यक असते. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।पुढे वैखरी राम आधी वदावा ।।म्हणजेच प्रभातसमयी रामाचे चिंतन करावे. केवळ शांत मनाने रामाचे नाव घेतल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. श्री गोंदवलेकर महाराजांनी तर भक्ती मार्गासाठी फक्त नामस्मरणाचा उपाय सांगितला आहे. आज वैद्यकीय शास्त्राने सुद्धा नामस्मरणाचे महत्त्व मान्य केले आहे. संत तुकाराम महाराजसुद्धा नामस्मरणाचे श्रेठत्व सांगतात की, मुखाने सतत नामस्मरण केल्याने मोक्ष हा मिळतोच. सर्व युगात भगवंताचे नामस्मरण करण्यात आले आहे. भक्त प्रल्हादाने विष्णूचे, हनुमंताने रामाचे केलेले नामस्मरण हे आदर्श उदाहरण आहे तेव्हा कलियुगात आपण सर्वजण मन:पूर्वक भगवंताचे नियमित नामस्मरण करू या ! 

टॅग्स :Hinduismहिंदुइझम