शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय कोंडी

By admin | Updated: May 23, 2017 06:53 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद सांभाळलेले आणि नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचा गड हादरविणारे डॉ.विजयकुमार गावित

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद सांभाळलेले आणि नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचा गड हादरविणारे डॉ.विजयकुमार गावित बऱ्यात कालावधीनंतर पुन्हा चर्चेत आले. मोदी लाटेचा अचूक अंदाज घेत भाजपावासी झालेले गावित अडीच-तीन वर्षांपासून शांत होते. परंतु खासदारकन्येच्या पदव्युत्तर पदवी आणि स्वत:विषयी न्या. गायकवाड समितीचा चौकशी अहवाल ही प्रकरणे लागोपाठ आल्याने गावित यांची राजकीय कोंडी केली जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. गावित हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय चातुर्याची चुणूक वेळोवेळी दिसून आली. १९९५ मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठिंबा देऊन मंत्रिपद मिळविले. पुढे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्रिपद सांभाळले व चढ्या मताधिक्याने खासदारकी कायम राखणाऱ्या माणिकराव गावित व अनेक वर्षे राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या सुरूपसिंग नाईक यांचा पराभव कन्या आणि भावामार्फत करून प्रस्थ निर्माण केले. जिल्हा परिषद ताब्यात घेऊन पत्नीला अध्यक्षपद बहाल केले. परंतु मंत्रिपदाच्या काळात गैरव्यवहाराचे झालेले आरोप, चौकशी समितीचे गठन या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा राजकीय चातुर्य दाखवत मोदी लाटेवर स्वार होत भाजपामध्ये प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचे अस्तित्व फारसे नाही. दिलवरसिंह पाडवी, डॉ. नरेंद्र पाडवी हे यापूर्वी जनसंघ, भाजपाचे केवळ दोन आमदार आतापर्यंत निवडून आले होते. परंतु डॉ. हीना गावित यांच्यारूपाने भाजपाचा खासदार प्रथमच निवडून आला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत गावित व उदेसिंह पाडवी हे दोन आमदार निवडून आले. हा भाजपाचा विक्रम होता. गावित स्वत: निवडून आले असले तरी त्यांचे दोन्ही बंधू पराभूत झाले होते. जिल्हा परिषददेखील गावित यांच्या ताब्यातून गेली. त्यांच्या प्रवेशामुळे नाराज असलेला भाजपातील निष्ठावंत गटदेखील अधूनमधून कुरापती काढत असतो. खासदार डॉ. हीना गावित यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती आणि कार्यकारिणीच्या गठनात निष्ठावंतांनी अडथळे आणले होते. त्यामुळे गावित भाजपात राहूनही काहीसे अलिप्त राहतात. अलीकडे शहादा पालिका निवडणुकीची जबाबदारी ऐनवेळी गावितांवर सोपविण्यात आली आणि त्यांनी नगराध्यक्ष निवडूनदेखील आणला. वर्षअखेर नंदुरबार, नवापूर व तळोदा या तीन पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. गावित यांना रोखण्यासाठी हितशत्रूंनी त्यांची कोंडी चालवली असल्याचे एकंदरीत चित्र आहे.