शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खड्ड्यांनी वाट लागली

By admin | Updated: October 17, 2016 05:03 IST

शहरातील रस्त्यांवरून फिरताना हे राजधानीचे शहर आहे, अशी भावना होणे आताशा अंमळ अवघड होऊ लागले आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. पण या शहरातील रस्त्यांवरून फिरताना हे राजधानीचे शहर आहे, अशी भावना होणे आताशा अंमळ अवघड होऊ लागले आहे. गडगंज महापालिका शहरातील रस्ते चांगले का ठेवू शकत नाही, हे न सुटलेले कोडे बनले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. पण या शहरातील रस्त्यांवरून फिरताना हे राजधानीचे शहर आहे, अशी भावना होणे आताशा अंमळ अवघड होऊ लागले आहे. मुंबई आजही आर्थिक राजधानी आहे. पण विकासाचे आदर्श रूप अशी या शहराची जडणघडण झाली आहे का, नागरी व्यवस्थांच्या बाबतीत इतर शहरांनी वस्तुपाठ मानून नक्कल करावी अशी स्थिती आजमितीस आहे का, या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी मिळू शकत नाहीत.देशभरातील महामार्गांचा कायापालट करून पाश्चात्त्य जगाच्या बरोबरीने उभे राहण्याची स्वप्ने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी दाखवत आहेत. महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, गुजरातसह आणखी काही राज्यांमध्ये प्रवासात पोटातील पाणी हलणार नाही, असे रस्ते दिसू लागले आहेत. राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना गडकरींच्या धडाक्यातून मुंबईत कित्येक उड्डाणपूल मार्गी लागले. या पार्श्वभूमीवर एक गडगंज महापालिका शहरातील रस्ते चांगले का ठेवू शकत नाही, हे न सुटलेले कोडे बनले आहे. चारशे चौरस किलोमीटरपेक्षा कांकणभर जास्त क्षेत्रफळ असलेल्या मुंबईतील मोठा भूभाग ठाणे-मुंबई मिळून १०५ चौरस कि.मी. व्यापलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच समाविष्ट आहे. राहिलेल्या भागातील रस्त्यांची देखभाल करणेही महापालिकेला जमेनासे झाले आहे. विजेच्या दरडोई वापरासारखेच रस्त्यांची स्थिती हे संपन्नता आणि विकासाच्या मोजमापाचे एकक झाले आहे. या मापदंडावर मुंबईला तोलायचे ठरविले, तर इतर अनेक शहरांच्या तुलनेत मुंबई दरिद्री ठरेल. या शहरातील रस्ते व त्यांची देखभाल हा तीन दशकांपासून भ्रष्टाचाराचा आणि राजकारणाचाही विषय होऊन गेला आहे. महापालिकेतील सत्तेच्या चाव्या अनेक वर्षे शिवसेनेच्या हातात आहेत. सत्ताधारी शिवसेनेशी संघर्षाची भूमिका घेणारे सदाशिवराव तिनईकरांसारखे काही मोजके आयुक्तही महाराष्ट्राच्या राजधानीने पाहिले. कंत्राटदारांची तळी उचलण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र आलेल्या महापालिका सदस्यांचे सिंडिकेट मुंबईतील माध्यमांनी जवळून पाहिले. काळाच्या ओघात यात फारसा बदल झाला नाही. अर्थात रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार डांबराहून काळा झाला. तिनईकरांनी त्यांच्या काळात भ्रष्टाचाराचा आवाका कमी करण्यासाठी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणालाच वेसण घातली होती. तो मार्ग योग्य होता की अयोग्य, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.मुद्दा इतकाच, की पैसा पाण्यासारखा खर्च होऊनही मुंबईतील रस्ते खड्ड्यात का गेले आहेत? या बाबतीत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा सूर एकसारखा राहिला आहे. मुंबईतील रस्त्यांवरचे खड्ड्यांचे प्रमाण झाकण्याजोगा युक्तिवाद आता शिल्लक नाही. रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी अनेक वर्षे भरमसाठ पाऊस पडण्याचे कारण दिले जात असे. पण जागतिक पर्यटनाचा विस्तार झाल्यावर चीन, श्रीलंका आणि इतरही काही देशांमधील आपल्यापेक्षा जास्त पर्जन्यमानाचा पट्टा आणि त्यातील उत्तम रस्ते पाहिल्यावर त्यातील फोलपणा लपून राहिला नाही. मग कधी वाहनांच्या वाढत्या संख्येचे, तर कधी वीज, गॅस आदि सुविधांसाठी भूमिगत पाइप वा केबल टाकण्यासाठी रस्ते खोदून नंतर ते नीट न बुजविणाऱ्या एजन्सीजच्या नाकर्तेपणावर खापर फोडण्याचा उद्योग सुरू झाला. आताशा रस्त्यांवरील अतोनात खड्डे हे वाहतूक कोंडीचे कारण झाले आहे. याच खड्ड्यांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेच्या पालिकेतील गटप्रमुखाने तीव्र विरोधाचे रोप लावले आहे.पालिकेच्या आगामी निवडणुकीपर्यंत रस्त्यांच्या स्थितीच्या राजकारणाचा खड्डा आणखी मोठा झाला असेल. मुंबईकरांना एकच कळते, जसे पोलिसांनी ठरविले तर देवळाबाहेरची चप्पलही चोरीला जाऊ शकत नाही, तसेच भ्रष्टाचार म्यान झाला तर रस्त्यावर खड्डा पडू शकत नाही. पण तसे झाले तर राजकारणाचा हेतूच खड्ड्यात जाईल ना! - चंद्रशेखर कुलकर्णी