शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

सहकारातील तेवत राहणारा दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 03:54 IST

- वसंत भोसलेकोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवाहर शेतकरी साखर कारखान्याचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाचा प्रारंभ आज होत आहे. यानिमित्ताने...महाराष्ट्राच्या विकासात सहकार चळवळीला महत्त्वाचे स्थान आहे. देशाने १९९१ मध्ये स्वीकारलेल्या खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणापर्यंत तरी सहकार हेच ग्रामीण विकासाचे समर्थ माध्यम आहे, असे आपण मानत आलो होतो. भारतातीेल विशेषत: महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकºयांसाठी ...

- वसंत भोसलेकोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवाहर शेतकरी साखर कारखान्याचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाचा प्रारंभ आज होत आहे. यानिमित्ताने...महाराष्ट्राच्या विकासात सहकार चळवळीला महत्त्वाचे स्थान आहे. देशाने १९९१ मध्ये स्वीकारलेल्या खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरणापर्यंत तरी सहकार हेच ग्रामीण विकासाचे समर्थ माध्यम आहे, असे आपण मानत आलो होतो. भारतातीेल विशेषत: महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकºयांसाठी सहकार चळवळीतून उभ्या राहिलेल्या संस्थांचा खूप मोठा आधार आहे. त्याचा विस्तार आणि मजबुतीकरण होणे अत्यंत गरजेचे असताना महाराष्ट्राने सहकाराकडे दुर्लक्ष केले. अशा वातावरणातही कोल्हापूर जिल्ह्यात सहा दशके सहकारात काम करणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी स्थापन केलेल्या हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ‘रौप्यमहोत्सव’ आज साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकार चळवळीकडे पाहिले तर आवाडे यांचे सहकारी संस्था उभ्या करून त्या उत्तम चालविण्याचे कार्य कौतुक करावे तेवढे थोडेच असे आहे.महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेले इचलकरंजी हे शहर त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र राहिले. वस्त्रोद्योगाला सहकारातून उभारणी देण्याचे मोलाचे कार्यही ते सलग चाळीस वर्षे करीत आहेत. एकापाठोपाठ एक अशा अनेक सूतगिरण्या त्यांनी उभ्या केल्या. केवळ महिलांसाठी आणि महिलांनी चालविलेली इंदिरा गांधी महिला सहकारी सूतगिरणी त्यांनी उभी केली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि तत्कालीन उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा यांनी त्यांना केवळ महिला धोरणावर बोलू नका, तर सहकारातही त्यासाठी काम करा, असे आवाहन केले होते, ते त्यांनी स्वीकारले. केवळ पंधरा दिवसांत महिला सूतगिरणीचा प्रस्ताव तयार करून सादर केला. तेवढ्याच तत्परतेने स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी मंजुरी दिली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहकारी संस्था उभ्या करून चालविण्याचा आदर्श कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडून घ्यायला हवा.अशाच पद्धतीने त्यांनी वस्त्रोद्योग, बँकिंगमध्ये काम केल्यानंतर १९९२ मध्ये जवाहर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. केवळ सात महिन्यांत साखर कारखाना उभारताना दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत जाजम अंथरून हुपरीच्या माळरानावर ते बसून असायचे. केवळ साडेबाराशे टन गाळप क्षमता असलेल्या या साखर कारखान्याचा पंचवीस वर्षांत वेगाने विस्तार केला. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीतील पंचवीस वर्षांचा साखर कारखाना हा कालावधी फारच कमी आहे. मात्र, याच कारखान्याने पहिला सहवीज प्रकल्प उभा केला. कारखान्याचा विस्तार करीत आज दररोजची गाळप क्षमता बारा हजार टनांपर्यंत वाढविली आहे. आज हा कारखाना महाराष्ट्रातील सर्वाधिक उसाचे गाळप करणारा ठरला आहे. अत्यंत आर्थिक शिस्तीने चालविताना पंचवीस वर्षांत एकोणीस राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. यातच आवाडे यांच्या कामाची पोचपावती आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील सुमारे १५० गावांतील शेतकºयांचे जीवन समृद्ध करणारा हा रौप्यमहोत्सवी सहकारी साखर कारखाना आहे. सहकार चळवळीत अनेक चढ-उतार येत असताना, तसेच सहकारी साखर कारखानदारीचे वेगाने खासगीकरण होत असताना जवाहर कारखाना दिव्यासारखा तेवतो आहे. ८६ वर्षांच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या कार्याचा हा गौरवच म्हटले पाहिजे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर