शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

वेध - ‘मामा’ कोण, दादा की पवार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 00:09 IST

सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदी अपक्ष खुर्चीवर बसले. राजकीय सारिपाटाचे सूत्रधार चंद्रकांतदादा पाटील व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा धाकले-थोरले पवार यात नक्की ‘मामा’ कोण बनले...?

राजकारणात कात्रजचा घाट दाखविणे, टप्प्यातील सावज, खिंडीत पकडले यासारखे वाक्प्रचार नेहमी वापरले जातात. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘मामा बनविणे’ हा वाक्प्रचार खूप गाजतोय. जि.प.त राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे संख्याबळ असतानाही अपक्ष असलेले संजय शिंदे जिल्हा परिषदेचे बिनविरोध अध्यक्ष बनले. योगायोगाने त्यांना ‘संजयमामा’ या टोपणनावानेच ओळखले जाते. त्यामुळे आपण चर्चा करीत असलेल्या ‘मामा बनविणे’ या वाक्प्रचाराला विशेष महत्त्व. राज्यातल्या जिल्हा परिषदा भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याची खास मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राबविली व फत्तेही केली. तरीही सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर अपक्षच विराजमान झाले. आकडेमोडीच्या तांत्रिक गणितात सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपाच्या बेरजेत जात नाही. बेरीज-वजाबाकीच्या दृष्टीने पाहिले तर जि.प.च्या राजकारणात नक्की कोण आणि कसे ‘मामा बनले’ या प्रश्नाचे उत्तर जो-तो आपल्या सोयीने देतोय. ६८ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत १४ सदस्यांना घेऊन सत्तेची मोट बांधणे चंद्रकांतदादा यांच्यासह या मोहिमेचे सूत्रधार सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सोपे नव्हते. शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आयुष्यभर अभिमानाने खांद्यावर घेणाऱ्या आमदार गणपतराव देशमुख यांची भूमिका असो, एरवी बंद पाकीट पाठवून पदाधिकारी निवडण्याची सवय असणाऱ्या राष्ट्रवादीच्या थोरले व धाकले पवार यांची भूमिका असो, सुशीलकुमार शिंदे यांच्या आशीर्वादाने कृष्णा-खोरे महामंडळापासून गृहराज्य मंत्रिपदापर्यंतची पदे मिळविणाऱ्या अक्कलकोटच्या आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची भूमिका असो, साखर कारखानदारी उद्योगात आपले साम्राज्य निर्माण करणाऱ्या ‘पवारभक्त’ आमदार बबनराव शिंदे यांची भूमिका असो, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कचखाऊ धोरणामुळे विधान परिषद निवडणुकीत नामुष्कीचा पराभव सोसणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांची भूमिका असो, आपले चिरंजीव विक्रांत यांना जि.प. अध्यक्ष करण्याचा नाद अचानक सोडून देण्याची माजी आमदार राजन पाटील यांची भूमिका असो, माजी मंत्री बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी ‘जो जे वांछिल...’ किंवा ‘जे जे घडेल ते पाहत राहावे’ अशी घेतलेली भूमिका असो, कडवे पवारनिष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोहर डोंगरे यांनी सुरुवातीपासून राष्ट्रवादीच्याच विरोधी घेतलेली भूमिका असो, करमाळ्याच्या रश्मीताई बागल यांची शेवटपर्यंत असलेली ‘तळ्यात-मळ्यात’ भूमिका असो, आमदार प्रशांत परिचारक संकटाचे दु:ख पोटात घेऊन भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, बार्शीचे राजेंद्र राऊत, दक्षिण सोलापूरच्या सुरेश हसापुरेंसारख्या शिलेदारांना घेऊन डाव मांडण्याची उमेश परिचारक यांची भूमिका असो आणि सरतेशेवटी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह व पुतणे धैर्यशील यांची पवार काका-पुतण्याच्या धोरणाकडे डोळे लावून बसण्याची भूमिका असो या सर्व भूमिकांचे पोस्टमार्टेम केले तर जि. प. राजकारणात कोणी कोणाला ‘मामा बनविले’ या प्रश्नाचे उत्तर ज्याच्या-त्याच्या सोयीचे निघते. त्या सोयीचे नाते भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशी जोडले तर मात्र ‘सर्वच मामा’ बनल्याचा निष्कर्ष निघू शकतो. बाकी काहीही असो, राष्ट्रवादी पक्षाच्या व्हिपच्या जाहिराती झळकूनही शेवटच्या क्षणी माघार घेण्याचा अधिकृत निरोप राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याने दिला हे गुलदस्त्यातच आहे. एक मात्र खरे सोलापूर जिल्ह्याने या मोहिमेतून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा यांना राज्याच्या गणितात बेरजेचे ठरणारे व फुटण्यास सज्ज असे दोन आमदार दिले आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत माढ्यातून राष्ट्रवादीच्या विरोधात लढणारा उमेदवार दिला. शेवटी जिल्ह्याच्या राजकीय सारिपाटात नक्की ‘मामा’ फडणवीस-चंद्र्रकांतदादा बनले की धाकले-थोरले पवार हे काळच ठरवेल.- राजा माने