शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

पवारांची साराबंदीची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:27 IST

शरद पवारांनी महाराष्ट्रात साराबंदीच्या आंदोलनाची केलेली घोषणा, १९२० च्या दशकात सरदार वल्लभभाई पटेलांनी बारडोलीच्या संग्रामात केलेल्या करबंदीच्या गर्जनेची आठवण करून देणारी आहे. सरकार कर्जे माफ करीत नाही.

शरद पवारांनी महाराष्ट्रात साराबंदीच्या आंदोलनाची केलेली घोषणा, १९२० च्या दशकात सरदार वल्लभभाई पटेलांनी बारडोलीच्या संग्रामात केलेल्या करबंदीच्या गर्जनेची आठवण करून देणारी आहे. सरकार कर्जे माफ करीत नाही. शेतक-यांचा सातबारा कोरा करीत नाही. त्यांना वीज बिलात सवलत देत नाही. त्यांना वेळच्या वेळी कर्जसाहाय्य करीत नाही. मात्र त्यांच्याकडील करवसुलीसाठी त्यांच्या विजेची कनेक्शने थांबविणे, कर्जावरील व्याजाचा भार वाढवीत नेणे. त्यांना सवलती देणे सोडा, उलट त्यांच्यावर ते नवनवे करभार लावते. ज्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल स्वीकारण्याचे भाजपने निवडणूक प्रचारात मान्य केले, तो अहवाल अंमलात न आणण्याचे प्रतिज्ञापत्रच त्याने सर्वोच्च न्यायालयात लिहून दिले. शेतक-यांची अशी फसवणूक करण्याच्या या धोरणाचा नुसता निषेध करू नका, सरकारला कर देणे थांबवा. त्याची विजेची बिले अडवा आणि त्याची आर्थिक कोंडी करून त्याला पायाशी आणा. सरकार असे वागले नाही तर ते आम्हीच मोडून काढू अशी जी धमकी पवारांनी नागपूरच्या विराट शेतकरी जनतेसमोर बोलताना दिली ती जेवढी गंभीर तेवढीच शेतकºयांच्या आजवरच्या मिळमिळीत लढ्याला आक्रमक बनविणारी आहे. त्यांच्या या घोषणेला काँग्रेस, शेकाप, आरपीआय, सपा, माकप व अन्य पक्षांनी आणि संघटनांनी एकमुखी पाठिंबा दिलेला दिसला. तेव्हा यापुढचे शेतकरी आंदोलन निर्णायक व अतिशय गंभीर होणार याची साºयांना कल्पना आली. शेतकरी वर्गाची ही फसवणूक गेली तीन वर्षे सातत्याने सुरू आहे. प्रत्यक्षात त्यांच्या सहकारी संस्था अल्पशा कारणांवरून बुडविल्या जातात व त्यावर आपल्या पक्षाची माणसे आणून बसविली जातात. बाप कास्तकार, मुलगा कास्तकार आणि नातूही कास्तकारच राहतो. त्याच्या वाट्याला चांगले, प्रकाशाचे दिवस कधी येत नाही. खेडी सुधारण्याचे व ती स्वच्छ झाल्याचे दावे दिल्लीत आणि मुंबईत केले जातात. प्रत्यक्षात कोणत्याही संध्याकाळी वा रात्री खेड्यात गेलो तर त्यांची स्थिती त्यातल्या घाणीसह तशीच दिसते आणि इकडे देशाचा पंतप्रधान ‘सी प्लेन’ मधून देवदर्शनाला जातो. ही विषमता आणि त्यातील लबाडी साºयांच्या लक्षात येते. त्यामुळे पवारांनी सरकारला दिलेला दणकेवजा इशारा महत्त्वाचा आहे. सरदार पटेलांनी बारडोलीत जेव्हा साराबंदीचे आंदोलन केले तेव्हा ब्रिटिश सरकारने ते मोडायला लष्कर आणले. पण शेतकरी ताठ राहिला. त्याने कर दिला नाही आणि सरकारने त्यांच्या जमिनी लिलावात काढल्या तेव्हा कोणताही इसम त्या घ्यायला पुढे धजावला नाही. शरद पवार हे शेतकरी आहेत आणि शेतकºयांचे नेतेही आहेत. देशाचे कृषिमंत्री असताना व त्याआधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ते चारवेळा राहिले असताना त्यांनी यातले प्रत्यक्षात काही केले असते तर त्यांच्या या वक्तव्याला वजनही आले असते. मात्र ती पुण्याई त्यांच्याजवळ आज घटकेला नाही. आताची आपली घोषणा आता थेट आंदोलनाच्या पातळीवर नेऊन त्यांनी ती मिळविली पाहिजे. त्यांना सारे पक्षच नव्हे तर महाराष्टÑाचा शहरी भागही साथ देईल. शेतकरी आत्महत्या का करतात, त्यांची तरुण मुले बेकार का राहतात, त्यांची शेती कोरडीच का राहते आणि त्यांच्या पिकांना आणि श्रमाला योग्य मोबदला का मिळत नाही हे आताचे खरे प्रश्न आहेत. ग्रामीण भागाच्या असंतोषावर शहरेही स्वस्थ व शांत राहू शकणार नाहीत हे अशावेळी साºयांनी लक्षात घ्यायचे असते. आपले आताचे प्रश्न धर्माचे नाहीत, जातीचे नाहीत, ते भुकेचे आहेत. स्वास्थ्याचे आणि समृद्धीचे आहेत. आरोग्य आणि समाधानाचे आहे. शिवाय त्यात जास्तीचा वाटा शेतकरी व ग्रामीण भागांना मिळवून द्यायचा आहे. पवारांनी घोषणा केली आहे त्यावर आता त्यांनी भक्कम राहिले पाहिजे व इतरांनीही त्यांना साथ दिली पाहिजे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार