शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘टीम इंडिया’चे पानिपत

By admin | Updated: August 19, 2014 09:41 IST

गेल्या महिन्यात लॉर्ड्सवर ज्या दमाने धोनीसेना लढली, जिंकली आणि तिने इतिहास घडवला, तो पाहून भारतीय चाहत्यांची छाती अभिमानाने भरून आली होती

गेल्या महिन्यात लॉर्ड्सवर ज्या दमाने धोनीसेना लढली, जिंकली आणि तिने इतिहास घडवला, तो पाहून 
भारतीय चाहत्यांची छाती अभिमानाने भरून आली होती. कर्णधार असताना विजयी झाल्यावर टी-र्शट हवेत भिरकावणारा सौरव गांगुली प्रत्येकाला आठवला होता. क्रिकेटच्या मायभूमीवर इंग्लंडला हरविणे हा सुवर्णक्षण भारतीयांना अनुभवायला मिळाला. पण त्यानंतर सलग तीन कसोटींमध्ये जे घडले ते सारे भारतीय चाहत्यांना शरमेने, नामुष्कीने मान खाली घालायला लावणारे होते. लॉर्ड्स गाजवणारी ही धोनीसेना पुढील तीन सामन्यांत भुईसपाट होईल, याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. इंग्लंड दौर्‍यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत नामुष्कीजनक पराभव पत्करणार्‍या टीम इंडियाच्या क्षमतेबद्दलच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लॉर्ड्सवर जिंकणारा भारतीय संघ एक ‘टीम’ 
म्हणून खेळताना दिसला होता. त्यांची देहबोलीही जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात उतरलेल्या सैनिकांप्रमाणे होती. शांत आणि संयमी धोनीचे सर्व डावपेच कामी येत होते. मैदानावर प्रत्येक खेळाडू जिवाचे रान करताना दिसत होता. पण पुढील तीन सामन्यांमध्ये याच सार्‍या गोष्टींचा अभाव दिसला. जिंकण्याची जिद्द एकाही खेळाडूच्या चेहर्‍यावर, देहबोलीत दिसत नव्हती. सलामीलाच गौतम गंभीर, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, कर्णधार महेंद्रसिंह धोनी अशा दिग्गज फलंदाजांची फळी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर सपेशल लोटांगण घालताना पाहणे, भारतीय चाहत्यांसाठी लाजिरवाणेच होते. तिसर्‍या कसोटीत ज्या धावपट्टीवरून ४८६ धावांचा डोंगर उभा केला त्याच ठिकाणी भारताचे शेर दोन डावांमध्ये एकूण २४२ धावांच काढू शकले. एक काळ गाजवलेला अनुभवी गौतम गंभीर दुहेरी धावसंख्याही गाठू शकत नव्हता. अखेरच्या कसोटीत तर तो धावबाद झाला. कसोटीत चोरटी धाव घेण्याची बुद्धी त्याला कुठून सुचली असेल, तोच जाणो. मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजाराचीही तीच गत. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तर त्यांची चांगलीच भंबेरी उडवली. गरम रक्ताच्या विराट कोहलीला तर सारा भारत ‘नेक्स्ट कॅप्टन’ असे मानतोय. पण गेल्या तीन कसोटी सामन्यांतील त्याची देहबोली, एखाद्या नवख्या खेळाडूलाही शोभणार नाही अशीच होती. या तीन कसोटींमुळे भारतीय संघावर आपल्या क्षमतेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. टी-टष्‍द्वेंटी आणि एकदिवस प्रकारात मैदान गाजवणारे हेच खेळाडू कसोटीत मात्र नापास होत आहेत. डावपेचातही धोनी फोल ठरत आहे. क्रिकेटच्या प्रकारानुसार आपल्याला आपल्या खेळात बदल करता आला पाहिजे, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे. जंटलमन्स गेम म्हणून प्रसिद्ध असणार्‍या कसोटी प्रकारासाठी भारतीय खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करता आले पाहिजे. पण कमी वेळेत भरघोस प्रसिद्धी आणि भरमसाट पैसा मिळवून देणार्‍या अतिजलद क्रिकेटची भारतीय खेळाडूंना सवय लागली आहे. याच प्रकारांमुळे भारतीय खेळाडू कायम प्रसिद्धीच्या कळसावर राहिलेले आहेत. मोठमोठय़ा ब्रँडच्या जाहिराती मिळवून भरपूर पैसा कमावणारे हे खेळाडू जगात सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. सचिन तेंडुलकरसारख्या भारतरत्नालाही जाहिरातींतून पैसा कमावण्याचा मोह आवरता आलेला नाही. खरे तर या संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा आदर्श घ्यायला हवा. आठ वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळणार्‍या आणि आठ नवखे खेळाडू घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाने याच इंग्लिश भूमीवर तेथील महिलांना पराभूत करून इतिहास रचला. दुसरीकडे माध्यमांच्या पाठिंब्यामुळे कबड्डीसारख्या देशी खेळांनाही लोकप्रियता मिळू लागली आहे. भारतीय क्रिकेट संघ असाच पराभूत होत राहिला तर क्रीडा रसिक खेळाच्या आनंदासाठी इतर खेळांकडे वळतील, असे खेदाने का होईना नमूद करावेसे वाटते. अर्थात अन्य क्रीडा प्रकारांना नाहीतरी रसिकांच्या आश्रयाची गरज आहे. किमान यानिमित्ताने का होईना कबड्डी, खो-खो, कुस्ती अशा देशी खेळांना चांगले दिवस येतील.