शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

पाकिस्तानची युद्धखोरी

By admin | Updated: January 6, 2015 23:17 IST

पाकिस्तान हे दहशतखोर राष्ट्र आहे आणि तसा शिक्का त्याच्यावर साऱ्या जगानेच आता उमटविला आहे.

पाकिस्तान हे दहशतखोर राष्ट्र आहे आणि तसा शिक्का त्याच्यावर साऱ्या जगानेच आता उमटविला आहे. तरीदेखील अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद रोखण्याचे यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल जाहीर प्रमाणपत्र द्यावे आणि बदल्यात वाढीव मदतही देऊ करावी, ही अमेरिकी सरकारची दुटप्पी परराष्ट्र नीतीदेखील येथे लक्षात घ्यावयाची आहे. पाकिस्तानने भारतावर तीन उघड व तीन छुपी युद्धे लादली आहेत. शिवाय त्याचे सैनिक भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेचा भंग करून त्यावर दरदिवशीच गोळीबार करीत आहेत. याच स्वरुपाचा गोळीबार सीमा प्रांतात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु आहे. त्यापायी तब्बल ५७ गावांमधील हजारो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. पाकिस्तानच्या आजवरच्या हिंसाचारात भारताची अनेक निरपराध माणसे व स्त्रिया ठार झाल्या. लष्कराचे आणि सीमा सुरक्षा दलाचे अनेक जवान शहीद झाले. भारताने या प्रकाराकडे गंभीरपणे पहायला सुरूवात केली आणि जशास तसे या धोरणाचा अवलंब केला तेव्हा भारतीय लष्करानेही पाकिस्तानी रेंजर्सचे आणि सैनिकांचे सीमेवर बळी घेतल्याचे दिसले. मात्र सीमेवरील मर्यादित गोळाबारी आणि तीत बळी पडणारी माणसे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना फारसे काही शिकवू शकत नाहीत असाच आजवरचा आपला अनुभव आहे. २६/११ या नावाने प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानी हल्ल्यात १६६ जण मुंबईत ठार झाले. भारतीय पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सारे हल्लेखोर मारले गेले. त्याआधी पाकिस्तानने भारताच्या संसदेवरच आपले हस्तक धाडून तिच्या आवारात मोठा हिंसाचार घडवून आणला. या साऱ्या घटना पाकिस्तानी सरकारच्या नियंत्रणात नसणाऱ्या टोळ््यांकडून घडतात हा त्या सरकारचा खुलासाही आता अविश्वसनीय व हास्यास्पद झाला आहे. काय वाट्टेल ते करून भारताच्या सीमा अस्वस्थ ठेवायच्या आणि जमेल तेव्हा त्यावर रक्तपात घडवून आणायचा हा पाकिस्तानचा आताचा इरादा आहे. त्या देशाचे पहिले अध्यक्ष बॅ. मोहम्मद अली जीना यांच्यापासून सुरू असलेला हा रक्तरंजित मामला आताच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजवटीपर्यंत अखंड सुरू राहिला आहे. १९६५ व १९७१ मध्ये झालेले समोरासमोरचे युद्ध हा याचा जसा एक पुरावा तसा अटलबिहारी वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत कारगीलवर झालेला हल्ला हा त्याचा आणखी एक पुरावा ठरावा. या सगळ््याच हल्ल्यात पाकिस्तानला म्हणावे तसे यश कधी हाती लागले नाही आणि त्या हल्ल्यांनी भारतही कधी नामोहरम झालेला दिसला नाही. तरीही पाकिस्तान या दहशतखोरीचा सातत्याने वापर करीत असेल तर त्याचा अर्थ त्याच्या भारतविषयक भूमिकेशीच जुळवावा लागतो. भारत हे आपले शत्रूराष्ट्र आहे आणि त्याच्यापासून आपल्याला धोका आहे एवढी एकच गोष्ट त्या देशाच्या सरकारने आपल्या जनतेच्या गळी उतरविली आहे. त्यासाठी सातत्याने तेथे भारतविरोधी प्रचार सुरू आहे आणि त्या प्रचाराचा एक दर्शनी भाग म्हणूनच सीमेवरचे त्याचे हे हल्लेही सुरू आहेत. या हल्ल्यांचा एकमुस्त बंदोबस्त करणे भारताला सहज शक्य आहे. मात्र भारत तशा आक्रमणाला अद्याप तयार होत नाही याची काही कारणे आहेत. पाकिस्तान हे लष्कराच्या नियंत्रणात असलेले युद्धसज्ज राष्ट्र आहे. शिवाय ते अण्वस्त्रधारी आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते आपल्या अणुबॉम्बचा उपयोग आपण कधीही करू शकतो असे उघडपणे सांगणारे आहेत आणि त्यांच्या त्या उद्दामपणाविषयीचा विश्वास वाटावा असेच त्यांचे वर्तनही आहे. भारतही अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. मात्र अण्वस्त्रांचे युद्ध कोणालाही विजयी होऊ देणार नाही आणि ते साऱ्यांचाच विनाश घडवून आणील असे मानण्याची यथार्थ भूमिका भारताची आहे. याच भूमिकेने भारताच्या आजवरच्या साऱ्या राज्यकर्त्यांची मानसिकता तयार केली आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते मात्र नेमक्या या मानसिकतेचा फायदा घेताना दिसत आहेत. एकेकाळी चीनचे राज्यकर्ते माओ-त्से-तुंग म्हणायचे, सारे जग नष्ट झाले तरी चीनची एक तृतीयांश जनता त्यानंतरही शिल्लकच राहणार आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते असे काही म्हणत नसले तरी त्यांचा भारतद्वेष तेवढ्याच टोकाचा आहे. पाकिस्तानचे लष्कर भारताच्या तुलनेत कमी आहे. त्याचे शस्त्रबळही भारताहून कमी आहे. मात्र त्याची अण्वस्त्रे भारताएवढीच विनाशकारी आणि क्षेपणास्त्रे लांब पल्ल्याची आहेत. भारतीय राज्यकर्त्यांना आपले पाकिस्ताविषयीचे धोरण आखताना नेमक्या या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. भारताच्या यासंदर्भातील धीमेपणावर अनेकजण नाराज आहेत व ते सरकारवर टीका करणारेही आहेत. अणुयुद्धाची भीषण परिणामकारकता लक्षात घेतल्याखेरीज सरकारी धोरणाचा एकांगी विचार करणारी ही माणसे फारशी गंभीरपणे घ्यायची नसतात. अखेर सरकारची पहिली जबाबदारी देशरक्षण व जनतेच्या जिविताचे रक्षण ही आहे. त्यामुळे आवश्यक तेथे बळाचा वापर आणि जरुर तेथे वाटाघाटी असेच आपले पाकिस्तानविषयक धोरण त्याला आखावे लागणार आहे. यात दुबळेपणा नाही. एक धीरोदात्त व सावध वाटचालच तेवढी आहे. दोन देशांत विश्वासाचे वातावरण हे अजूनही स्वप्न वाटावे असे आहे. मात्र ते वास्तवात उतरावे अशीच आता अपेक्षा आहे.