मेहा शर्मामुक्त पत्रकार
ऑस्कर म्हणजेच अकादमी पुरस्कार हे मनोरंजन विश्वातील ग्लॅमरचे प्रतीक आहेत. दरवर्षी, हॉलिवूडमधील तारे-तारका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होतात. पण या सोहळ्यातील रेड कार्पेटच्या मागे वाद-विवाद दडलेले आहे जे जागतिक चित्रपटांसाठी सर्वात प्रतिष्ठित असलेल्या रात्रीलाही प्रभावित करतात. यातील काही वाद खरे आहेत, तर काही वाद वस्तुस्थितीपेक्षा जास्त प्रचारासाठी असू शकतात. मग प्रश्न पडतो कीः ऑस्करभोवतीचे नाटच किती खरे आहे आणि लक्ष वेधण्यासाठी किती रचले गेले आहे?
हॅशटॅग ऑस्करसोव्हाइट
खरी की अतिशयोक्तीपूर्ण? अलिकडच्या काळात सर्वात उल्लेखनीय वादांपैकी एक म्हणजे हॅशटॅग ऑस्कर सो व्हाइट चळवळ. २०१५ मध्ये ही चळवळ वेगाने सुरू झाली. ऑस्करमध्ये सलग दुसऱ्या वर्षी कोणत्याही कृष्णवर्णीय कलाकारांना नामांकन न मिळाल्याने, या हॅशटॅग चळवळीचा जन्म झाला. टीकाकारांचा असा आरोप होता की अकादमीची मतदान संस्था, ज्याचे सदस्य प्रामुख्याने गोरे आणि पुरुष होते, ते गोरे नसलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष करते. या घटनेनंतर जेड़ पिंकेट स्मिथ आणि स्पाइक ली सारख्या सेलिब्रिटींनी या समारंभावर सार्वजनिकपणे बहिष्कार टाकला, तर काहींनी अकादमीवर कारवाई करण्याची मागणी केली. काही टीकाकारांनी असा युक्तिवाद केला की हा गोंधळ वास्तविकतेवर आधारित नव्हता. तरीही, अकादमीने यानंतर अनेक बदल केले.
विल स्मिथने मारलेली थप्पड
२०२२ मध्ये, अभिनेता विल स्मिथने पुरस्कार सोहळ्यादरम्यान कॉमेडियन क्रिस रॉकला थप्पड लगावल्याने गोंधळ उडाला होता. रॉकने स्मिथची पत्नी, जेड पिंकेट स्मिथ हिच्या मुंडणावर विनोद केला होता. त्यामुळे स्मिथने स्टेजवर जाऊन रॉकला थप्पड़ मारली. अनेकांसाठी, ती थप्पड रागाचा खरा स्फोट होता. मात्र, तो क्षण धक्कादायक आणि आश्चर्यकारक दोन्ही होता. ही अभूतपूर्व घटना होती. तथापि, अनेक ऑस्कर क्षणांप्रमाणे, काहींनी रेटिंग वाढवण्याचा आणि व्हायरल कंटेंट तयार करण्याचा हा जाणूनबुजून केलेला प्रयत्न होता की तो खरोखर भावनिक प्रतिक्रिया होती? अशी विचारणा केली. तो मुद्दाम केलेला स्टंट होता किंवा भावनिक उद्रेक, या घटनेने तीव्र वादविवाद निर्माण केले आणि स्मिथला दहा वर्षांसाठी ऑस्करमधून बंदी घालण्यात आली.
२०१७ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा वाद
ऑस्करच्या इतिहासातील कदाचित सर्वात धक्कादायक क्षण २०१७ मध्ये ८२ च्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात घडला. या वेळी 'ला ला लैंड' चित्रपटाला चुकून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा विजेता घोषित करण्यात आले, खरा विजेता चित्रपट होता 'भूनलाईट. वॉरेन बिट्टी आणि फेय डचुनावे यांना चुकीचा लिफाफा देण्यात आला आणि त्यांनी 'मूनलाईट' ऐवजी 'ला ला लँड' वाचले. पण काहींसाठी, या वादामुळे शंका निर्माण झाल्या.
चुंबन वादः २०२५ च्या ऑस्करमध्ये ऑड्रियन ब्रॉडी आणि हॅले बेरी यांनी घेतलेले चुंबन वादग्रस्त ठरले. ब्रॉडी आणि हॅले बेरी यांचा २००३ चा आयकॉनिक किस चर्चेत आला.
२००३ मध्ये ब्रॉडी यांना द पियानिस्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला होता. त्यावेळी हॅले बेरी यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
बेरीने त्यांचे नाव जाहीर करताच, ब्रॉडी स्टेजवर आले आणि हॅलेला घट्ट मिठी मारली आणि अनपेक्षितपणे एक दीर्घ चुंबन घेतले होते, त्याची परतफेड हॅलेने या वेळी केली ही चर्चा या वेळी झाली. मात्र, ही चर्चा खरोखरीच फोल ठरली.
हॅशटॅग मीटू चळवळ, खरी की बनावट आक्रोश?: २०१७ मध्ये सुरू झालेल्या #Me Too चळवळीचा ऑस्करवरही लक्षणीय परिणाम झाला. हॉलिवूडमधील महिलांनी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पुरुषांकडून होणाऱ्या अत्याचारांबद्दल वाचा फोडली. अकादमीलाही त्याचा सामना करावा लागला. ऑस्करमधील प्रमुख व्यक्ती हार्वे वाईनस्टाईनवरील आरोपांमुळे अकादमीलाही वादामुळे झाकोळून टाकले. त्यानंतर ऑस्करने वाईनस्टाईन यांचे सदस्यत्व रद्द केले. आरोप करणान्या महिलांना पाठिंबा दिला. हा प्रतिसाद प्रतिष्ठा बचावाची पाऊल होते काय, हा अजूनही वादाचा विषय आहे.
ऑस्करमध्ये लिंगभेद अस्तित्वात आहे का?
ऑस्करमध्ये सुरू असलेला आणखी एक वाद म्हणजे महिलांचे अल्प प्रतिनिधित्व, विशेषतः सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या नामांकनांमध्ये आणि विजयांमध्ये महिला चित्रपट निर्मात्यांना ऐतिहासिकदृष्ट्या कमी प्रतिनिधित्व मिळाले आहे, या ट्रेंडमुळे लिंगभेदाचे आरोप होत आहेत. कॅथरीन बिगेलो (द हर्ट लॉकर), ग्रेटा गैरविग ('लेडी बर्ड') आणि क्लोए झाओ (नोमेंडलैंड) सारख्या महिला दिग्दर्शकांच्या यशानंतर ऑस्करने पुरुष दिग्दर्शकांना प्राधान्य दिल्याबद्दल टीका झाली आहे. काहींचा असा युक्तिवाद आहे की महिला दिग्दर्शकांसाठी स्वतंत्र नामांकनांचा अभाव हेच पक्षपाताचे लक्षण आहे, तर काहींचा असा विश्वास आहे की हा वाद अतिशयोक्तीपूर्ण आहे, ऑस्कर हे गुणवत्तेवर दिले जातात. तरीसुद्धा, हा वाद अजून मिटलेला नाही.