शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारतीयत्व टिकविणे हाच धर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:49 IST

गुजरात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अस्ताचा काळ सुरू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर लोकसभेत ८० जागा कमी होतील असे राजकारण्यांना वाटू लागले, म्हणून भाजपाने नव्या नीतीने राजकारण करायचे ठरविले. शासन चालविण्यास भाजपाचे सरकार कुचकामी ठरले हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

- डॉ. कुमार सप्तर्षीगुजरात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अस्ताचा काळ सुरू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर लोकसभेत ८० जागा कमी होतील असे राजकारण्यांना वाटू लागले, म्हणून भाजपाने नव्या नीतीने राजकारण करायचे ठरविले. शासन चालविण्यास भाजपाचे सरकार कुचकामी ठरले हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. धोरणात्मक राजकारण दूर सारून केवळ ठरावीक जाती, समुदायात भेद निर्माण करून त्या ऐंशी जागा भरून काढण्याचा विचार सुरू झाला. मोंदीनी यापूर्वीही जातीय ध्रुवीकरणातून विजय मिळविला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाज आणि दलित वर्ग यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही गटांमध्ये द्वेष पसरविण्याचा कटू डाव रचण्यात आला आणि मुख्य म्हणजे द्वेष पसरण्यासाठी हिंसा महत्त्वाची असते. कारण हिंसा पसरली की, माणसांना त्याचा सहजासहजी विसर पडत नाही. या माध्यमातून समाजाचे तुकडे करण्याचे त्यांनी ठरविले, या संपूर्ण घटनेमागे गुजरात निवडणुकीच्या निकालाचा पॅटर्न आहे.गुजरातमध्ये मोंदीनी जेथे ओबीसी मतदार अधिक तेथे पटेलांविरोधात भाषणे केली आणि जेथे पटेल मतदार जास्त आहेत, तेथे याउलट प्रचार केला. त्यामुळे राज्यात सतेत्त असलेल्या अल्प मताच्या सत्ताधा-यांनी मराठ्यांना उचकवण्यासाठी कोरेगाव भीमाची घटना घडवून आणली. या घटनेत एका गटाने इतिहासाला आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. कारण मागच्या पिढीने काही तरी विचार करूनच समाधी बांधण्याचे निर्णय घेतले होते. मात्र त्या घटनेला शौर्य मानून दलित वर्ग ‘विजय दिन’ साजरा करत असेल तर ही भूमिका चुकीची आहे. कारण त्याच दिवशी परकीय शत्रूंनी आपल्या देशात आगमन केले होते आणि त्यानंतर कैक वर्षे आपली मातृभूमी त्यांच्या गुलामगिरीत होती. या घटनेतील सर्वांत मोठी विसंगती अशी होती की जेव्हा स्वकीय अत्याचार करू लागतात, तेव्हा परकीय जवळचे वाटू लागतात.या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन अतिशय गंभीर आहे. या सर्व घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभावी परिणाम दिसून येतो आहे. ज्या वेळी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्या वेळी देशात शांतता, सुरक्षितता ठेवायची अशी ठाम भूमिका पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. एखाद्या राज्यातील राज्यकर्त्यांना हे जमत नाही, तेव्हा केंद्राने जबाबदारी घेऊन पुढाकार घेतला पाहिजे. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी जाणीवपूर्वक कोणतीच भूमिका घेतली नाही. राज्यातील सद्य:स्थिती लक्षात घेता हे धार्मिक राजकारण नसून जातीपातीचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्म म्हणजे त्या - त्या काळात तिथले लोक जोडण्यासाठी जे सांगतात तो धर्म असतो आणि माणसाला माणसापासून तोडण्यासाठी जे केले जाते त्याला अधर्म म्हणतात.या घटनेचा सर्वसमावेशक विचार करता निळा, भगवा आणि हिरव्या रंगाचा वैयक्तिक विचार करण्याऐवजी सर्व रंगांना आपल्या तिरग्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. म्हणजेच, कोणत्याही एका रंगापुरते मर्यादित न राहता आपण भारतीय आहोत. भारतीय असणे आणि भारतीयत्व टिकवून ठेवणे हाच खरा धर्म आहे, हा विचार आजच्या समाजावर बिंबविला पाहिजे. या विचारांच्या व्यक्तींनी समाजात सक्रिय होऊन क्रियाशील पद्धतीने नव्या पिढीसाठी काम केले पाहिजे. जेणेकरून जात, धर्म, पंथ या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन समाज केवळ ‘भारतीय’ म्हणून विचार करण्यास सुरुवात करेल, त्या वेळेस ख-या अर्थाने तो ‘विकासा’कडे पाऊल टाकेल.(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

(शब्दांकन - स्नेहा मोरे)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी